May 12, 2023:
ह्या आठवड्यात २०२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचे शिंग फुंकले गेले - अजून तब्बल अठरा महिने शिल्लक असताना!
तसं पहायचं तर ट्रम्प महाशयांनी अध्यक्षपदाची उमेदवारी कधीचीच जाहीर केलेली आहे. त्याशिवाय, निकी हेली, विवेक रामस्वामी आणि एसा हचिन्सन ह्या आणखी तीन रिपब्लिकन चिल्ल्यापिल्ल्यानीही आपली उमेदवारी जाहीर केली आहे. फिकर नॉट - तिघांनाही नॉमिनेशन मिळण्याची सुतराम शक्यता नाहीये. पहिले दोन भारतीय वंशाचे आहेत. हेली ह्यांच्याकडे चिमूटभर राजकीय भांडवल होते; जे त्यांनी ट्रम्प काळातील वक्तव्यांनी आणि वर्तणुकीने उधळून लावले. रामस्वामी ह्यांच्याकडे भांडवलशाहीत कमावलेल्या गडगंज डॉलर्सचे भांडवल आहे; दुर्दैवाने, पैशाने उरलेल्या सर्व गोष्टी - उदा. राजकीय ज्ञान, धोरणीपणा, लोकप्रियता इ. - विकत घेता येईल हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार आहे. हचिन्सन हे रिपब्लिकन पक्षाच्या जुन्या मूल्यांचे पाठीराखे आहेत; त्यातल्या त्यात सेन्सिबल बोलतात. पण सध्याच्या रिपब्लिकन पक्षामध्ये मूल्ये आणि सेन्सिबल ह्या दोन्ही शब्दांना मज्जाव आहे. त्यामुळे त्यांची धाव अर्कान्साच्या कुंपणापलीकडे जाणार नाही. ह्या तिघांच्या पलीकडे, आंतरपाटामागे नटूनमुरडून, मतदारांकडे सलज्ज कटाक्ष टाकत असलेले (न्यू जर्सीसहित) अनेक राज्यांचे गव्हर्नर्स, ट्रम्प मालक त्यांच्यावरील एका तरी खटल्यामुळे तुरुंगात जातील काय ह्याची आशाळभूतपणे प्रतीक्षा करत, अंगठ्याने जमिनीवर वर्तुळे रेखाटत आहेत.
डेमोक्रॅट्स पैकी अध्यक्ष बायडन ह्यांनी 'अवघे ऐशीचे वयोमान' हे पद गुणगुणत निवडणुकीच्या मंडपात पदार्पण केले आहे. काही साठ आणि सत्तरीचे तरणेबांड डेमोक्रॅट गब्रू जवान कदाचित मनामध्ये दंड थोपटत असले, तरी ह्या घडीला तरी त्यापैकी कोणी अध्यक्षांना आव्हान देत नाहीय.
एवढ्या लोकांनी आधीच आपल्या महत्वाकांक्षा जाहीर केल्या असतांना 'ह्या आठवड्यात शिंग फुंकलं' असं मी का म्हटलं? कारण, सी एन एन ने ह्या आठवड्यात ट्रम्प ची 'टाऊन हॉल मुलाखत' घेतली. ह्या फॉरमॅट मध्ये मॉडरेटर तर प्रश्न विचारतेच, पण खास आमंत्रित मतदारही त्यांच्या मनातील प्रश्न विचारू शकतात. गेल्या तीन-साडेतीन वर्षात, ट्रम्प महाशयांना काहीही उपरती होऊन, कृतकर्माचा काडीमात्रही पश्चात्ताप वगैरे झाला नाहीय ह्याची २००% ग्वाही देण्याचे कार्य त्यांनी जातीने पहिल्या पाचदहा मिनिटातच यशस्वीरीत्या उरकले. ते फार मोठे आश्चर्य नव्हतेच! फक्त, त्यांनी सहा जानेवारीच्या सशस्त्र उठावाच्या बाजूने, स्त्रियांविषयीच्या त्यांच्या वागणुकी- आणि मतांबद्दल, गर्भपाताविषयी धोरणाबद्दल, युक्रेन युद्धाबद्दल आणि स्वतःच्या दैदिप्यमान यशाबद्दल जी (प्रसंगी धादांत खोटी आणि त्यांच्याच स्टँडर्डने सुद्धा) आणखी अतिरेकी विधाने केली त्यामुळे भुवया थोड्या उंचावल्या एवढंच.
थोडंफार आश्चर्य होतं ते, सभागृहातील बहुतांश रिपब्लिकन जमावाने त्यांना दिलेल्या उत्स्फूर्त आणि जोरदार उत्तेजनाचं आणि प्रतिसादाचं! आश्चर्य म्हणण्यापेक्षा, डोळे सताड उघडवणारा धडा म्हणू हवं तर. त्या उत्साही प्रतिसादामध्येच, सगळे आशाळभूत रिपब्लिकन उमेदवार अजून प्रत्यक्ष नांव घ्यायला का लाजताहेत, सगळे सेनेटर्स आणि काँग्रेसमेन अजून तळ्यात-मळ्यात का खेळताहेत, चार घोषित उमेदवार असतांना सी एन एन ने एकालाच ह्या मुलाखतीला का बोलवावे - ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट आहेत. कुठल्या तरी खटल्याचा नतीजा म्हणून ट्रम्प तुरुंगात गेले नाहीत, तर ते रिपब्लिकन उमेदवार होण्याची दाट शक्यता ह्या घडीला दिसते आहे. समजा ट्रम्पऐवजी दुसरा कोणी रिपब्लिकन उमेदवार असेल, तरी तो/तीही ट्रम्पनी आखून दिलेल्या मार्गावरच चालणार अशी खात्री दिसते आहे (उदा. गव्हर्नर डी सॅन्टिस ह्यांची वक्तव्ये!).
डेमोक्रॅट्सना २०२४ साठी हा फार मोठा धोका आहे. ट्रम्पच्या ह्या टाऊन हॉल मुलाखतीमध्ये डेमोक्रॅट्सना, आणि एकूण अमेरिकेला, शिकून घेण्यासारखं बरंच आहे. क्षणभर, ट्रम्पची मुलाखतीमधील दादागिरी, बुलींग बाजूला ठेवू (डिबेटमध्ये त्यांच्यासमोर येणाऱ्या कोणाही प्रतिस्पर्ध्याला ह्या निरर्थक तोंडपाटीलकीला तोंड द्यायचे आहे ह्याची नोंद करून!). त्यांच्या यशाचे, बेताल वक्तव्यांनंतरही असंख्य मतदार त्यांच्या मागे उभे राहण्याचे, रहस्य सामान्य जनतेच्या नाड्या ओळखण्याच्या त्यांच्या निर्विवाद कौशल्यामध्ये आहे. इतिहासामध्ये वारंवार दिसून आलेले आहे, की अमेरिकन बहुमत कुठल्याच एका टोकाला नाही; ते उजवे रिपब्लिकन्स आणि डावे डेमोक्रॅट्स ह्यांच्या अचूक सुवर्णमध्यावर आहे. मात्र, सर्वसामान्य अमेरिकन जनता वाढती महागाई, ढासळते राहणीमान, वाढती गुन्हेगारी, बेकायदेशीर इमिग्रंटसची समस्या ह्या साध्या मर्त्य आणि कालातीत प्रश्नांनी गांजलेली आहे. तिला लिबरल वोक जमातीच्या जेंडर फ्लुईडीटी, कॉमन बाथरूम्स, डी-फन्ड द पुलीस, काळ्या-गोऱ्यांच्या दऱ्या करणे, प्रत्येक वाईट गोष्टीचे खापर गोऱ्यांच्या माथी फोडणे, आणि बेकायदेशीर इमिग्रण्टसना न्यू यॉर्क आणि कॅलिफोर्निया सारख्या 'सेफ हेव्हन्स' मध्ये अमेरिकन करदात्यांच्या जीवावर हॉटेलमध्ये रहायला पाठवणे असल्या हस्तिदंती मनोऱ्यातील कल्पना समजत नाहीत. ट्रम्प निवडून आल्यास ह्यातल्या कुठल्याही किचकट समस्येबद्दल काहीही करणार नाहीत; पण त्यांना आवाज देऊन, त्यांना उजेडात आणून, ते बरीच मतं खिशात मात्र घालू शकतील. ह्या समस्या डेमोक्रॅट्सनी निर्माण केलेल्या नाहीत; पण त्यांचा जाहीर उच्चार न करून, त्यांच्या अस्तित्वाकडे डोळेझाक करून, डेमोक्रॅट्स जनमताला ट्रम्पसारख्या तमासगिराच्या खिशात ढकलत आहेत.
आतापर्यंत तरी डेमोक्रॅट्सना ट्रम्पच्या डावपेचांना तोंड देण्याची युक्ती गवसली नाहीये ह्याचे उत्तम उदाहरण होते त्या टाऊन हॉलची मॉडरेटर केटलीन कॉलिन्स! ट्रम्प बेधडक नॉन-स्टॉप बिनबुडाचे आरोप, धादांत खोटी विधाने करत होते मान्य, बोलायचं थांबतच नव्हते हेही मान्य; पण केटलीन ने त्यांच्यावर आवाज चढवून बोलत राहण्याने, अनेक प्रसंगी ओबामा किंवा बायडनवरील टीकेला उत्तर देत बसण्याने, तिची 'लिबरल मीडिया' ची प्रतिमा जास्तच ठळक झाली, असं मला वाटलं. त्याऐवजी, त्यांना पुरतं (चुकीचं असलं तरी) बोलायला देऊन, नंतर ह्या विधानांना काही पुरावा नाही हे स्पष्ट करणे, डेमोक्रॅट्सची वकिली न करणे, कदाचित वाद घालत बसण्याऐवजी टीव्ही स्क्रीनच्या तळाच्या बॅनर्सचा विधान चुकीचे आहे हे दाखवण्यासाठी वापर करणे जास्त परिणामकारक होऊ शकलं असतं, असं मला वाटतं.
ह्या टाऊन हॉलचा एक फायदा, डेमोक्रॅट्सना पुढे काय वाढून ठेवलं आहे, आणि त्याला कसं तोंड देता येईल, द्यायला हवं, ह्याचा विचार करायला पुरेसा वेळ मिळालेला आहे. ट्रम्प जरी तुरुंगात गेले, तरी रिपब्लिकन्सच्या निवडणूक धोरणाचा आराखडा त्यांनी आखून दिलेला आहे तोच राहणार आहे.
मॅकेन, रॉमनी किंवा जॉन केसीक सारखे खरे रिपब्लिकन्स सध्या आऊट ऑफ फॅशन आहेत.
* * * * *
Jun 9, 2023:

अखेर ट्रम्प महाशयांनी त्यांच्या आजवरच्या कीर्तीला जागून, आणखी एक अभूतपूर्व गोष्ट घडवून दाखवली! अमेरिकेच्या इतिहासात आजवर कुठल्याही भूतपूर्व अध्यक्षांना फेडरल गुन्हेगारी आरोपांखाली कोर्टात खेचलं गेलं नव्हतं; ट्रम्प महाशयांनी हेही शिवधनुष्य उचलून दाखवले. केंद्र सरकारने, सहा जानेवारीचा सशस्त्र उठाव आणि गोपनीय कागदपत्रांची अवैध हाताळणी, ह्या दोन अतिशय गंभीर घटनांमधील ट्रम्पच्या जबाबदारीची तपासणी करण्यासाठी विशेष आयुक्त नेमलेला आहे. त्यापैकी, गोपनीय कागदपत्रांची हाताळणी ह्यासंदर्भात विशेष आयुक्ताने ट्रम्प ह्यांच्यावर सदतीस वेगवेगळे आरोप दाखल केले आहेत. ट्रम्पचे 'भूतपूर्व अध्यक्ष' हे उच्च स्थान, त्यांना अमेरिकन लोकसंख्येच्या एका मोठ्या लक्षणीय गटाचा अविरत अचल पाठिंबा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार असण्याची शक्यता हे मुद्दे लक्षात घेऊन, विशेष आयुक्तांचा हा निर्णय एका परीने धाडसी म्हणावा लागेल.
सगळ्याच वृत्तसंस्थांमध्ये, काल रात्रीपासून सध्या दाखल केलेल्या ह्या आरोपांची अखंड चर्चा आणि छाननी चालू आहे. ते आरोप प्रत्यक्ष खरे सिद्ध करता येतील का हा वादाचा मुद्दा आहे. अर्थातच अमेरिकेच्या अध्यक्षांवर कोर्टात आरोप दाखल करण्यापूर्वी त्यांच्या सत्यासत्यतेविषयी सरकारने पुरेशी काळजी घेतली असणार हे गृहीत आहे. जर काही कारणाने हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, तर ट्रम्प ह्यांच्या 'हे सगळे निव्वळ लिबरल कटकारस्थान आहे' ह्या दाव्याला खतपाणी मिळणार; आणि त्याचा निवडणूक निकालावर महत्वाचा प्रभाव पडणार हे 'नो ब्रेनर'! त्यामुळे, हे आरोप सिद्ध झाले (वरती सहा जानेवारीच्या उठावासंबंधीची तपासणी अजून बाकी आहेच), तर त्याचा प्रचारावर आणि निवडणुकीवर काय परिणाम होईल ह्यात मला जास्त रस आहे.
सर्वप्रथम, आणखी एक नो ब्रेनर म्हणजे ट्रम्प आयुष्यभराचा कोर्टाच्या पायऱ्या चढण्याउतरण्याचा अनुभव वापरून, हे खटले अपील करत कित्येक महिने धुगधुगत ठेवतील. हे खटले पार सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे, २०२४ च्या निवडणुकीच्या आतमध्ये त्यांचा निर्णायक निकाल लागणे कठीण. त्यात अमेरिकन घटनेप्रमाणे, आरोप सिद्ध झाले, किंवा ट्रम्प प्रत्यक्ष तुरुंगात गेले तरी तत्वतः ते निवडणूक लढू, आणि जिंकूही, शकतात. ते जर अध्यक्ष झाले, तर त्या अखत्यारीत ते स्वतःला माफही करू शकतात, वरती सध्याच्या अनेक उच्चपदस्थ लोकांवर उलट खटले भरू शकतात. ह्या सर्वच गोष्टी एवढ्या अकल्पनीय मानल्या गेल्या होत्या (हो, आपण अमेरिकेबद्दल बोलतो आहोत; पाकिस्तान किंवा आफ्रिकेतील काही देशांविषयी नाही!), की ह्याला काही पूर्वाधार किंवा पायंडा नाही. पण सध्याच्या राजकारणाच्या सप्तपाताळात, ट्रम्प है तो कुच्छभी मुमकीन है!
ट्रम्प ह्यांच्यावर अशी कायदेशीर संकटे येणार ह्याची जास्तजास्त खात्री होत असल्यामुळे, आजवर मूग गिळून गप्प बसून आणि डोळ्यावर पट्टी ओढून त्यांच्या आरत्या ओवाळत असलेल्या अनेक रिपब्लिकन श्रेष्ठींना आता अचानक उपरती होऊन आपला ह्या सर्व दुष्कृत्यांना कसा नेहमीच विरोध होता ह्याविषयी त्यांची जीभ चुरुचुरु बोलू लागली आहे. परिणामी दुर्दैवाने निवडणुकीच्या मंडपात आता रिपब्लिकन इच्छूकांची दाटी वाढताना दिसते आहे, आणि ह्याचा फायदा फक्त ट्रम्पनाच होण्याची शक्यता आहे. कारण, ह्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या अनेक उपवरांमध्ये एकही स्वतंत्रपणे देशव्यापी प्रभावी व्यक्तिमत्व नाही. म्हणूनच ट्रम्पचे ३५-४०% भरवशाचे मतदार फार वाटत नसले तरी अतिशय महत्वाचे ठरतात. त्या जोरावर, ट्रम्प रिपब्लिकन प्रायमरीज जिंकून पक्षाचे अधिकृत उमेदवार होऊ शकतात.
डेमोक्रॅट पक्षाचा अधिकृत उमेदवार बायडन असणे आत्ता तरी गृहीत धरायला हवे. विद्यमान अध्यक्षांना पक्षांतर्गत विरोध सहसा कमीच असतो; आणि डेमोक्रॅट्सकडे ट्रम्पशी लढत देऊ शकेल असा खंदा वीर दुसरा कोणी दिसत नाही. बायडन ह्यांचे वय, अ-प्रभावी सौम्य इमेज आणि काही बरेवाईट घडल्यास उपाध्यक्ष कमला हॅरीस अध्यक्षपदी चढण्याची शक्यता ह्या सर्व गोष्टी त्यांच्या विरोधात आहेत. पण शेवटी, प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कोणत्या दोन उमेदवारांपैकी निवड करायला लागते ह्यावरच निकाल अवलंबून राहील.
माझ्या मते, अमेरिकन लोकशाहीची पहिली अतिशय कठीण परीक्षा रिपब्लिकन प्रायमरीजमध्ये आहे; त्यात उत्तीर्ण झाल्यास शिक्षा म्हणून २०२४च्या इकडे आड आणि तिकडे विहीर धर्तीच्या निवडणुकीमध्ये मत द्यावे लागेल!
* * * * *
Aug 24, 2023:

तर, काल रात्री २०२४ अध्यक्षपदासाठी पहिलं रिपब्लिकन डिबेट पार पडलं. ह्या डिबेट्समध्ये आजकाल माझ्यासारखे अट्टल पोलिटिकल जंकीज सोडून कोणालाच फारसा रस नसतो. मला मात्र ह्यातले किती, कोण, कधीपर्यंत टिकताहेत; कोण कोणाला पाठिंबा देऊन बाहेर पडेल; कोण उपाध्यक्षपदावर डोळा ठेऊन आहे असल्या गोष्टींमध्ये सॉलिड इंटरेस्ट असतो. एवढी चांगली करमणूक टीव्हीवर फुकटात मिळणं दुरापास्त!
तर, पटांगणात असलेल्या चौदा मुलांपैकी (सॉरी, त्यात एक मुलगीही आहे! तिला इग्नोर करण्याचा इरादा नाही) नऊच मुलामुलींना डिबेटमध्ये प्रवेश मिळवण्यापुरते पाठीराखे मिळाले होते. त्या नऊ पैकी पयल्या नंबराच्या पोराने 'मी नाय जा!' करून इतरांना जीभ वेडावून दाखवली आणि डिबेटला टांग मारली. त्याला ह्या घडीला उरलेल्या सगळ्यांपेक्षा किमान ४०% जास्त पाठिंबा आहे म्हणून ही दादागिरी. शिवाय त्याला किनी आज चौथ्या गुन्हेगारी खटल्याला तोंड देण्यासाठी जॉर्जियाच्या कोर्टात दाखल व्हायचंय. तसा काय टरकत नाय तो; त्याच्यावर तीन खटले आधीच आहेत, त्यात हा चौथा! डेरिंग असेल तर तुरुंगात टाकून बघ, असा खुल्ला चायलेंज देण्यासाठी तो सरकार, वकील, न्यायाधीश, न्यायव्यवस्था ह्या सगळ्यांना मोजक्या (आणि त्याच्याकडे साठा भरपूर आहे!) शिव्या दिवसातून चार वेळा देत असतो.
तर, उरलेले आठ जण 'समजा, कायतरी जादू होऊन पयला पोरगा अदृश्यच झाला तर... मग आपूनच' ह्या आशेवर वाद घालण्यासाठी डिबेटला उभे राहिले. त्यांची स्टेजवरील इ. तिसरी (फ) दर्जाची आपसातली भांडणे बघता, पयल्याने डिबेटमध्ये न येऊन स्वतःचा वेळ वाचवला हे पूर्णपणे पटलं; त्याच्या जागी कोणीही हेच केलं असतं. जादूटोण्यावर विश्वास ठेवणारी ही अल्पवयीन आठांची ग्यांग तिथे नसलेल्या उमेदवाराचा उल्लेख फक्त 'एक क्ष व्यक्ती' ('ही हू शाल नॉट बी नेम्ड') असा करत होती.
तर, आठही जणांनी मन लावून परीक्षेसाठी अभ्यासक्रमातील छोटीछोटी वाक्ये पाठ केलेली होती. उदा. 'बायडन वाईट', 'डेमोक्रॅट सोशालिस्ट', 'महागाई वाईट', 'न्यायव्यवस्थेचे राजकारण' इत्यादी. पण आयत्यावेळी परीक्षेत सिलॅबस बाहेरचे कठीण प्रश्न आले आणि गोंधळ सुरु झाला. आपसात बाचाबाची झाली, शाब्दिक झिंज्या उपटण्यात आल्या, गुद्दे मारले गेले; अगदी वर्ग डोक्यावर घेतला! उदा. युक्रेनला मदत करावी का नाही. ह्यावर बालक रामस्वामी (ह्याला मोठ्ठी डोनेशन परवडत असल्यामुळे शिशुवर्गातून तिसरीमध्ये ढकलण्यात आले होते) म्हणाला युक्रेन काय आपला देश नाही (शाब्बास!) त्यामुळे तिथे पाठवण्याऐवजी शस्त्रास्त्रे मी अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर पाठवेन (आणि ती कोणावर वापरणार रे?). क्ष व्यक्तीचे उपाध्यक्ष मॉनिटर पेन्स म्हणाले 'तसं नाही; आपण चिंगम खातखात चालूही शकतो की नाही? तसं आपण युक्रेनला मदतही करू आणि दक्षिण सीमाही सुरक्षित ठेऊ'. ह्यावर छोट्याशा निकी हेलीने जोरजोरात मान हलवून दुजोरा दिला. ती बिचारी सगळ्यालाच हो म्हणत होती. तिच्या डोळ्यातील स्वप्न एकच होतं - ह्या पोरांपैकी एकजण फायनल एग्झ्याम पास होऊन मास्तर झाला, की आपण त्याच्या वर्गात मॉनिटर व्हायचं. म्हणून ती क्ष व्यक्तीलाही जपूनच नावं ठेवत होती... न जाणो! आमच्या राज्याचा वजनदार गट्टूमल ख्रिस्टी सुद्धा होता स्टेजवर. क्ष व्यक्तीला टोचूनटोचून बोलण्यात त्याच्या जिभेला हाडंच नव्हतं; पण स्टेजवर क्ष व्यक्तीच नसल्यामुळे त्याला आता काय करायचं हे कळेना. त्यात पुन्हा त्याने किंवा इतर एकदोघांनी क्ष व्यक्तीला नांवे ठेवल्यावर उपस्थितांकडून त्यांची प्रचंड हेटाळणी झाली. दुसऱ्या नंबरच्या रॉन ह्या फ्लोरिडाच्या गव्हर्नरने एकंदरीत सहा वाक्ये घोकंपट्टी करून बरोबर आणली होती. कुठल्याही प्रश्नावर तो ती गरगरा फिरवून त्यातील प्रथम तोंडाला येईल ते उत्तर देत होता. संपूर्ण डिबेटभर आता माजाच पयला नंबर ह्या भ्रमात तो वागत होता. इतर कोणी त्याच्याकडे फार लक्ष देत नाहीय हेही त्याच्या लक्षात आलेले दिसले नाही. त्याने शिक्षणपद्धती मोडीत काढल्याबरोबर बालक रामस्वामी उसळून पुढे आला आणि शिक्षणखातंच नव्हे, तर आय आर एस, एफ बी आय, सी डी सी अशा सगळ्या तीन अक्षरी संस्थानांची तोडफोड करण्याची त्याची स्वप्ने रंगवू लागला. हे पाच जण मार्च-एप्रिलपर्यंत एकमेकांच्या उरावर बसून हैदोस घालणार असं दिसतंय. उरलेले तिघेजण जानेवारीतील आयोवाच्या पहिल्या चाचणीपर्यंत कसेबसे धावतील आणि नंतर हळूहळू आपापल्या घरी जाऊन गुपचूप झोपतील अशी अपेक्षा आहे.
तर, अजून तरी 'आयेगा तो क्ष व्यक्तीच' असं दिसतंय! पुढच्या आठदहा महिन्यात ह्या पोरांची वयं फार झपाट्याने वाढली नाहीत तर.
* * * * *
Nov 9, 2023:

२०२४ अध्यक्षीय निवडणुकीचं तिसरं रिपब्लिकन डिबेट काल पार पडलं.
माझी निरीक्षणे:
ह्यावेळी उपाध्यक्ष पेन्स आणि अर्कान्सा गव्हर्नर हचिन्सन स्टेजवर नव्हते. त्यांनी सूज्ञपणे आपले आणि लोकांचे पैसे आणि कष्ट वाचवले, आणि गोलगोल फिरत कुठेच न जाण्यापेक्षा, आयोवाच्या तीन महिने आधीच यशस्वी माघार घेतली.
साऊथ कॅरोलायना सिनेटर टिम स्कॉट ह्यांना हा सूज्ञपणा केव्हा बरे सुचेल? काल त्यांचे कौतुक एवढेच, की ते प्रश्नांची उत्तरे स्वतःच जांभई न देता पुरी करू शकले. हे कौतुक फार काळ टिकणे अपेक्षित नाही.
न्यू जर्सी गव्हर्नर ख्रिस ख्रिस्टी, ज्या न्यू हॅम्पशायरवर त्यांनी सर्व भिस्त ठेवली आहे, तिथल्या तोफा ऐकण्यापुरते तरी तग धरतील अशी अपेक्षा आहे. पण एकतर तोफांऐवजी तो फुसका बार निघण्याची जास्त शक्यता आहे, आणि दुसरं म्हणजे कुण्णीही त्यांना सिरिअसली घेत नाहीय. मला त्यांचा स्वतःचा कालचा आविर्भाव थोडा 'रिझाईन्ड' वाटला. ही दुःखाची गोष्ट; कारण ते खूपच मुद्देसूद आणि सुयोग्य बोलत होते. अर्थातच अशा माणसाची सध्याच्या ट्रम्प, सॉरी रिपब्लिकन, पक्षामध्ये अडगळ होते आहे.
बिलिअनेअर (ह्यांची ओळख एवढीच!) रामस्वामी हे, बाबांनी लाडकी व्हिडिओ गेम विकत घेऊन न दिलेल्या संत्रस्त टीनएजर कार्ट्याप्रमाणे स्टेजवर थैमान घालत होते. त्यांच्या नेहमीच्या 'मारो, तोडो, फोडो, जला दो' स्वप्नांमध्ये काल लक्षणीय भर पडलेली दिसली. ते अधिकृत उमेदवार होण्याची शक्यता फारच झपाट्याने शून्याच्या जवळ जात आहे. पण हा जुगार ते त्यांच्या पैशाने खेळत असल्यामुळे आपल्या दुर्दैवाने तो अजून काही काळ चालू राहू शकतो. जाण्यापूर्वी एकदा त्यांनी निकी हेलीवर त्यांचा एवढा खुन्नस का हे स्पष्ट केलं, तर मी वैयक्तिकरित्या त्यांचा आभारी होईन.
अमेरिकेच्या यु एन राजदूत निकी हेली ह्यांनी गेल्या वेळेपासून लक्षणीय उन्नती केलेली दिसली. आधीच्या डिबेटमध्ये इतरांच्या चांगल्या मुद्द्यांना त्या जोरात मान डोलावून दुजोरा देत होत्या; ह्यावेळी त्यांनी त्यातले बरेच मुद्दे स्वतःचेच म्हणून मांडले - निश्चितपणे यशस्वी नेतृत्वाची झलक! स्टेजवरच स्कॉटचा 'एनर्जी डॉमिनन्स' हा नवाकोरा मुद्दा त्यांनी क्षणार्धात आपलासा करून स्कॉटचा जबडा आश्चर्यातिरेकाने स्टेजवर पाडला. २०१६ च्या निवडणुकीपासूनच्या ट्रम्पविषयी त्यांच्या कोलांट्या उड्याही नेतृत्वासाठी आवश्यक जाड कातडीची आणि 'मी जिंकणाऱ्या पार्टीबरोबरची!' अशा यशस्वी नेतृत्वाच्या गुणांचीच साक्ष पटवतात. मात्र त्या इतर कित्येकांपेक्षा जास्त फोकस्ड, जास्त मुद्देसूद आणि जास्त प्रभावी बोलू शकतात. ह्यावेळी, आक्रस्ताळेपणा आणि किंचाळणे पूर्वीपेक्षा कमी जाणवले. प्रश्न फक्त रिपब्लिकन पार्टी एका स्त्रीला अध्यक्षपदासाठी उभे राहू देण्याएवढी प्रगत झाली आहे का हा होऊ शकतो.
शेवटचे, फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसॅन्टिस, पुन्हा एकदा आपल्या स्वसंतुष्ट रडतमुख दर्शनाने इतर उमेदवारांच्या आणि कित्येक मतदारांच्या मनात जास्त चीड निर्माण करण्यात यशस्वी झाले असावे. पुरुष असणे आणि तरुण असणे ही त्यांची दोन बलस्थाने; शिवाय सध्याच्या रिपब्लिकन मनस्थितीला पूरक असा अतिरेकी वाचाळपणाही त्यांचे अंगी पुरेसा आहे. सध्या तरी ते लोकमतामध्ये आघाडीवर आहेत. जानेवारीतील आयोवाच्या चाचणीनंतर चित्र थोडे जास्त स्पष्ट होईल.
अरे हो! ह्या पाचांच्या स्वप्नांवर, स्टेजवर दिसत नसलेला, एक भलामोठा ऑरेंज ढग लटकलेला आहे - भूतपूर्व अध्यक्ष ट्रम्प! एका कोर्टाने आर्थिक अफ़रातफरीबद्दल त्यांच्या विरोधात निर्णय दिलाच आहे, आणि फक्त शिक्षा काय द्यावी ह्याचा विचार चालू आहे. दुसऱ्या कोर्टात ६ जानेवारीच्या उठावातील त्यांच्या जबाबदारीची छाननी सुरु आहे. आणि तरीही ते सध्या इतर सर्व उमेदवारांपेक्षा किमान ४०% नी पुढे आहेत.
चर्चेसंबंधी म्हणाल, तर ह्या घडीला अमेरिकेपुढे पुढील काही महत्वाचे प्रश्न उपस्थित आहेत - इस्राएलच्या कुठल्याही मागणीला किती, आणि किती झटकन पाठिंबा द्यावा; चीनला जास्तीत जास्त शिव्यागाळी कोण करू शकतो; गर्भपातासंबंधी नियम ठरवायचा राज्यांचा अधिकार भांडून जिंकल्यावर आता ते नियम केंद्र सरकारनेच कसे करावेत; मेक्सिकोच्या हद्दीवर भिंत बांधावी (रामस्वामीला तर कॅनडाच्या हद्दीवरही भिंत बांधायची आहे. ती झाल्यावर तो कदाचित पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरही भिंत बांधण्याचा विचार करेल!) का नुसतेच सैन्य पाठवून लढाई जिंकावी वगैरे. बाकी, महागाई, सोशल सिक्युरिटी चे भविष्य, ड्रग ऍडिक्शन वगैरे काही क्षुल्लक प्रश्न होते; पण ते बायडन सत्तेवरून गेल्यावर आपोआपच सुटतील ह्यावर बहुतेकांचं एकमत होतं. तूर्तास ह्यावर उपाय म्हणून प्रमुख उमेदवारांनी आपापल्या हलाखीच्या बालपणाविषयी दर्दनाक कहाण्या सांगून मतदारांचे मन रिझवले.
जोपर्यंत ट्रम्प साहेबांची निवडणुकीतून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत ह्या सर्व चर्चा फक्त इतर उमेदवारांचे आणि फॅन्सचे केवळ स्वप्नरंजन किंवा फार तर बौद्धिक मनोरंजन राहणार!
* * * *
Feb 25, 2024:

अखेर काळ्या दगडावरच्या रेघेने रिपब्लिकन उमेदवार निवडीचे चित्र पुरे केले! अपेक्षेप्रमाणे, आतापर्यंतच्या चारही प्रायमरीज जिंकून ट्रम्पनी उमेदवारीच्या दिशेने आपली घोडदौड चालूच ठेवली आहे. त्यांच्या शेवटच्या प्रतिस्पर्धी निकी हेलींनी आधीचे तीन पराजय झटकून स्वतःच्या साऊथ कॅरोलायना राज्यावर (जिथे त्या दोन वेळा गव्हर्नर होत्या) बरीच मदार ठेवली होती - काल त्या तिथेही २०% मतांनी हरल्या. अजूनही त्या पुढे लढत राहण्याच्या गप्पा करत आहेत; पण आता त्यांच्या मागे किती लोक उभे राहतील ही शंका आहे. अजून ४६ राज्ये शिल्लक असली, तरीही ह्या क्षणी त्यांनी रिपब्लिकन उमेदवारी जिंकण्याची काही शक्यता दिसत नाही. ह्या पराजयाची जबाबदारी त्यांना स्वतःलाच घ्यायला हवी. त्यांनी ट्रम्प ह्यांच्यावर अतिशय सावधपणे, जपून, आडून टीका केली; ट्रम्प ह्यांच्यावरील गंभीर आरोपांचा, त्यांच्या रूपाने लोकशाहीला असलेल्या धोक्याचा कधीच उल्लेख केला नाही; त्यांच्या धोरणांचा कधीच विरोध, धिक्कार सोडाच, केला नाही. ह्या गुळमुळीत वक्तव्यांमागे ट्रम्प ह्यांच्या ४०% बांधील रिपब्लिकन 'मागा' जमातीला न दुखावण्याचा हेतू असावा; पण त्यामुळे सामान्य जनता 'मग ट्रम्पनाच मत का देऊ नये' ह्याविषयी गोंधळणे साहजिकच होते. अजूनही त्या, 'नोव्हेंबरमधील निवडणुकीमध्ये ट्रम्प बायडनला जिंकून देतील म्हणून' हा एकच कमजोर अशाश्वत मुद्दा घोळवत आहेत.
ह्यातील एक भाग, आता अध्यक्षपदासाठी झुंज, पुन्हा एकदा, ट्रम्प आणि बायडन ह्यांच्यामध्येच होणार, आत्ता तरी निर्विवाद खरा दिसत आहे. काही आशावादी लोक दोघांपैकी एक, किंवा कदाचित दोघेही, बाद होतील ह्या एका सूक्ष्म शक्यतेवर डोळे लावून बसलेले आहेत; पण मला तरी ती शक्यता, काहीतरी संपूर्ण अनपेक्षित न घडल्यास, फारच दूरची वाटते आहे. ट्रम्प ह्यांना राज्यघटनेच्या १४व्या दुरुस्तीच्या आधारे, निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवावे ही एक जुनी आशा आहे. माझ्या मते तो, दुरुस्तीच्या शब्दयोजनेमुळे, किमान अतिशय वादग्रस्त मुद्दा आहे. कोलोराडो राज्याने तसा प्रयत्न केलेलाच आहे. पण त्यांनी ट्रम्पच्या उमेदवारीवर आणलेली बंदी सध्या सुप्रीम कोर्टाच्या विचाराधीन आहे आणि ती चुकीची ठरवली जाण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या रिपब्लिकन पक्षाला ट्रम्पएवढ्या डागाळलेल्या व्यक्तीला आपला उमेदवार घोषित करण्यामध्ये काहीही शरमेची गोष्ट वाटत नाही, हे त्यांच्या सांप्रतच्या बौद्धिक दिवाळखोरीशी सुसंगतच आहे. त्यात, कोर्टातील दिरंगाई, अपील्स, फेरविचार वगैरे लक्षात घेता ट्रम्पवरील कुठल्याही गुन्हेगारी खटल्याचा अंतिम निर्णायक निकाल निवडणुकीच्या आत लागणे फार कठीण वाटते. त्यामुळे, 'दोषी ठरेपर्यंत निर्दोष' ह्या वल्कलाचा त्या पक्षाला लज्जारक्षणासाठी वापर करता येईलच. दुसऱ्या बाजूला, असंख्य डेमोक्रॅट्सना मनामध्ये बायडनना उमेदवार करण्याची भिती वाटत असली, तरी त्यांच्याकडेही निवडणूक जिंकू शकेल अशी नेतृत्वाची पुढची फळी नाहीय. खरं तर, बायडनच्या उमेदवारीमागील भीतीचे एक कारण, अध्यक्षांचे काही बरेवाईट घडल्यास कमला हॅरीस अध्यक्ष होतील हे आहे.
उपाध्यक्षांच्या क्षमतेविषयी अशी साशंकता पूर्वीही दाखवली गेली आहे (सिनिअर बुश आणि अननुभवी डॅन क्वेल!); ह्यावेळी ती भिती खूप साधार आहे ती बायडनच्या वयामुळे, आणि त्यांच्या दृश्य शारिरीक आणि बौद्धिक कमजोरीमुळे. ट्रम्प बायडनपेक्षा जेमतेम चारच वर्षांनी लहान असूनही खूपच जोरदार प्रभावीपणे बोलू-चालू शकतात. चुकीची विधाने दोघेही करतात, खरं तर ट्रम्प जास्त वेळा!; पण बायडनच्या विधानांमागे गोंधळलेल्या मनोवृत्तीची जाणीव होते, तर ट्रम्पच्या सत्याविषयीच्या बेदरकारीची. कुठले जास्त भीतीदायक हा वादाचा विषय होऊ शकतो.
पक्षनिष्ठ श्रद्धा बाजूला ठेवल्यास, बायडन ह्यांना अनेक चुकांचा जाब मतदारांना द्यावा लागेल ह्यात शंकाच नाही. अफगाणिस्तानमधील सैन्य मागे घेण्याच्या दुर्दशेविषयी - जरी तो चुकीचा करार ट्रम्प ह्यांच्या अध्यक्षतेखाली झाला होता तरी, बायडन सरकारला त्याची पूर्वसूचना आणि जास्त सुयोग्य तयारीसाठी अवधी होता. मेक्सिकोमधून लाखो निर्वासित, त्यामध्ये अनेक गुन्हेगारही, बेकायदेशीरपणे अमेरिकेत शिरू देणे, ह्या समस्येचे गांभीर्य वेळीच लक्षात न घेणे, ही बायडन सरकारची चूक आहे; आणि त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीत भोगावे लागतील. ट्रम्प, आणि त्यांचे काँग्रेसमधील भगतगण, ह्यांनी युक्रेन आणि इस्राएलच्या मदतीचे विधेयक लटकत ठेवून त्यांच्या निवडणुकीतील संभाव्य चालीची झलक दाखवलीच आहे. युक्रेन प्रकरणामध्ये रशिया पराभूत होईलच अशा भ्रमात राहून, अमेरिकन राज्यपध्दतीमध्ये आपण किती काळ मदत करू शकू ह्याचा विचार न करता, त्याच्या एन्ड गेम च्या योजना तयार नसणे, हे बायडन परराष्ट्र धोरणाचे अपयशच म्हणावे लागेल. तीच गोष्ट मध्यपूर्वेची. हमासला आळा घालायला अरब देशांना राजी करू न शकण्यात, हूती सारख्या सामान्य हिंसक जमावाला आळा घालू न शकण्यात, त्यांच्या इराणी सूत्रधारांना रोखू न शकण्यात, आणि इस्रायलच्या गाझामधील बेमुरव्वत आणि 'डे आफ्टर' चा काहीही विचार नसलेल्या हिंसाचाराला आळा न घालण्यात, आलेल्या अपयशाची. आंतराष्ट्रीय रंगमंचावरील अमेरिकेच्या जागतिक महासत्ता ह्या प्रतिमेला असे अपयश शोभत नाही; आणि निवडणुकीमध्ये ह्या अपयशाची वारंवार चर्चा होणारच.
ह्या तर अपयशाच्या गोष्टी, पण अर्थकारणामधील चीन, जपान आणि इंग्लंड सारख्या अनेक बलाढ्य राष्ट्रांना भेडसावणारे रिसेशन (अजूनतरी) अमेरिकेत थोपवण्याचे, कुठल्याही देशाला हेवा वाटावा असे अत्यल्प ३.७% बेकारीचे प्रमाण, हेल्थ केअरमधील सुधारणा ह्यामागील घवघवीत यशही बायडन सरकारला लोकांच्या गळी उतरवता येत नाहीय.
आता, बायडन सरकारच्या अपयशांबाबत ट्रम्प सरकार काही करून दाखवेल अशी शक्यता शून्यवतच आहे. ट्रम्प ह्या अपयशांना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी उगाळत राहणार; त्यांना, आणि त्यांच्या नाकर्त्या रिपब्लिकन पक्षाला देशाचा कुठलाही प्रश्न सोडवण्याची कुवत किंवा कदाचित इच्छाही नाहीय, हे त्यांनी ट्रम्प ह्यांच्या आधीच्या चार वर्षात, आणि काँग्रेसमधील गेल्या काही महिन्यात ठळक उदाहरणांनी दाखवून दिले आहे. नवीन राजवटीमध्ये ट्रम्प ह्यांनी, त्यांच्या विरोधकांवर सूड उगवण्याची इच्छा व्यक्त केलेलीच आहे. त्यांना कितीही नांवे ठेवली, तरी ते आपली धक्कादायक आणि हास्यास्पद विधाने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न तरी करतात एवढे मान्य करायलाच हवे.
२०२४ च्या निवडणुकीमध्ये भितीने थरथरत्या बोटाने, एका वृद्ध तरी किंवा अस्थिर तरी, पण थरथरत्या हातामध्ये राष्ट्राची धुरा सोपवावी लागणार असे दिसते.
* * * * *
May 30, 2024:

त्यांचा नारा होता (आणि आहे) 'मेक अमेरिका ग्रेट अगेन'!
ह्या अमेरिकेचं काहीतरी करायलाच हवं एवढं खरं. आता, ग्रेट करायला थोडा वेळ लागतो आहे, तर आपल्या कुवतीनुसार तूर्तास अमेरिकेला हास्यास्पद तरी करू; ह्या विचाराने त्यांनी ते करण्याचा वसा घेतला. एकहाती स्वतः सगळे ऐतिहासिक विक्रम मोडण्याचा चंग बांधला.
अध्यक्षपदी असतांना, काँग्रेसकडून दोनदा इम्पीच होण्याचा अभूतपूर्व अपमान त्यांनी प्रथम मिळवून दाखवला. चार वर्षाची दुसरी अध्यक्षीय टर्म गमावण्याचा दुर्मिळ अपमान, २८ वर्षानंतर पुन्हा, त्यांनी मिळवून दाखवला.
जे अध्यक्षपद ते (त्यांच्या मते) हरलेच नव्हते, तेच अध्यक्षपद जिंकण्यासाठी ते यंदा पुन्हा निवडणुकीला उभे आहेत. एका महत्वाच्या अध्यक्षीय उमेदवाराचा, एका भूतपूर्व अमेरिकन अध्यक्षाचा, आतापर्यंत कधी न झालेला, ९४ निरनिराळ्या आरोपांखाली चार वेगवेगळ्या कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याचा अभूतपूर्व अपमान त्यांनी मिळवून दाखवला.
आणि आज, न्यू यॉर्कच्या कोर्टात चौतीस आरोपांखाली ज्यूरीतर्फे 'गुन्हेगार' ठरवले जाऊन आपल्या दैदिप्यमान मंदिलात त्यांनी एक नवीन तुरा खोचला आहे. स्टॉर्मी डॅनियल्स ह्या पोर्न स्टारबरोबरचे संबंध लपवून ठेवण्यासाठी तिला दिलेल्या पैशांसंबंधीच्या आरोपांखाली ट्रम्प ह्यांना गुन्हेगार ठरवण्यात आले आहे.
फिकर नॉट! पिच्चर अभी बाकी है! ट्रम्प ह्या निर्णयावर अपील करत राहतील. आणि न्यू यॉर्क राज्याच्या सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल निवडणुकीपूर्वी हाती येणं आत्ता तरी कठीण वाटत आहे. ते कोर्ट कदाचित आजचा हा निकाल उलटवूनही लावू शकेल.
इतर तीन खटले खरं तर जास्त गंभीर स्वरूपाचे आहेत. पण, सुप्रीम कोर्टामध्ये ट्रम्पनीच नेमलेल्या न्यायाधीशांच्या कृपेने त्यात चालढकल आणि दिरंगाई सुरु आहे. म्हणून निवडणुकीपूर्वी त्यांचाही काही निकाल लागणं अपेक्षित नाही. एकदा (जर) अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ट्रम्प ह्यातील दोन खटले रद्द करू शकतात. तिसरा जॉर्जिया राज्याने दाखल केला असल्यामुळे त्याचं भवितव्य अनिश्चित आहे. तो खटला बहुधा त्यांच्या कारकिर्दीची चार वर्ष स्थगित करायला लागेल असा अंदाज आहे.
अर्थात, एवढ्याशा गोष्टींवरून अमेरिकेच्या जगाला लोकशाहीच्या गप्पा ऐकवण्याच्या स्वातंत्र्याला अजिबात बाधा येत नाही. लोकशाहीमध्ये काय करू नये एवढे तरी अध्यक्षमहाशय होतकरू देशांना दाखवून देतच आहेत ना!
* * * * *
Jul 12, 2024:

म्हातारपण हे दुसरं बालपण:
हुश्श! आटपली बाबा एकदाची परीक्षा. काय शॉट लावला होता डोक्याला माझ्या! 'जो, ही परीक्षा महत्वाची बरं का. ह्यात पास व्हायलाच पाहिजेस. परवाच्या परीक्षेत डॉन्याने पार झोपवलं तुला, आठवतंय ना? (नसायला काय झालं? सगळंच काय विसरून नाही जात मी.) आता ह्या परीक्षेत पास नाही झालास तर काही खरं नाही तुझं.' किती वेळा, केवढ्या जणांकडून ऐकलं असेल मी! ते गोळ्याचॉकलेट देणारे क्लूनी काका, त्यांनी तर दमच भरला मला.
खर्र सांगू, मला ना परीक्षा आवडत नाहीत. ल्हान आये ना मी! (तो विदूषक बिल मार म्हणतो मी डायपर सांभाळत चालणाऱ्या बाळासारखा चालतो. हॅट! येवडा छोटा बाळ नाहीय काय मी. आणि डॉन्या थोडासाच तर मोठा आहे माज्यापेक्षा. उग्गाच कायतरी!) आणि सारख्यासारख्या परीक्षाच ठेवतात माझ्यासाठी; बऱ्याचशा ओपन बुक एक्झॅम असतात हे तेवढं बरं. पण डॉन्याबरोबरची ओपन बुक नव्हती. डॉन्याची काय, मज्जाय! त्याला अभ्यास नाही करायला लागत. र ट फ काही न वाचता मनाला येईल ते बडबडतो, आणि त्याचा तो मवाली कंपू हा काय बोलेल त्याला टाळ्या वाजवतो. डॉन्याने दिवसभर नुसतं बागेत जाऊन उंडारायचं नाहीतर त्याच्या फोनवर ट्विट करत बसायचं. नशीब असतं एकेकाचं!
मला सगळे लोक नेहमी हुश्शार म्हणतात, कि S ती गो S ड मुलगा असं म्हणतात; डॉन्याला सगळे हिडीसफिडीस करतात. पण पाहुण्यांसमोर मला कायकाय येतं ते करून दाखवायला मला नाही आवडत (ते काय ओपन बुक नसतं!). माझ्या ना मोठमोठी नावं नीट लक्षात नाही रहात. आणि एका उत्तरात एकापेक्षा जास्त नावं आली, की थोडा गोंधळ होतो माझा. मग मी अहिल्याबाई होळकरांचं कुंकू अहमदशहा अब्दालीच्या माथी लावतो, चुकून हां चुकून! काल मी त्या युरोपातल्या पाहुण्यांसमोर चुकून युक्रेनचा अध्यक्ष पुतीन म्हटलं, झेलेन्स्की बाजूलाच उभा! मग काय, पटकन जीभ चावली; झेलेन्स्की पण हसला (कूल आहे तो!), फ्रेंच आणि जर्मन काकांनी सुद्धा माझीच बाजू घेतली (मला माहित्येय त्यांना दोघांना डॉन्या अजिबात आवडत नाही!).
असल्या फालतू गोष्टींवरून उग्गाच सगळेजण एकाएकी म्हणायला लागले आहेत 'जो फार लहान आहे नोव्हेंबरमधल्या स्कॉलरशिप परीक्षेला बसायला'. हॅट! येवडा काय ल्हान नाय मी. डॉन्याला धोपटून काढायला माज्याएवडा कोन पण शक्तिमान नाय. गेल्या वेळी मी त्याला झोपवला आणि ह्यावेळी पण मीच त्याला झोपवणार. कशावरून? मी सांगतो त्याच्यावरून.
बरं, आत्ता मात्र माझी झोपायची वेळ झालीय; आठ वाजून गेले ना? त्या परदेशी पाहुण्यांपुढचा कार्यक्रम, नंतर ह्या आजच्या परीक्षेसाठी घोकंपट्टी आणि मग तासभर ती परीक्षा! ह्या मोठ्या माणसांचे प्रश्न संपतच नाहीत मुळी; एक लहानसा गोड पोरगा आपला ऐकतोय म्हणून काय प्रश्न विचारतच जायचं का? झाल्या माझ्या दोनचार चुका आजच्या तोंडी परीक्षेत; पण काठावर पास होईन म्हणतायत घरातले सगळेजण.
पुढच्या वेळी ना मी बोटांवर नावं लिहून जाणार असल्या तोंडी परीक्षांना. कुठच्या बोटावर कोणाचं नांव तेवढंच कसं तरी लक्षात ठेवायला हवं.
* * * * *
Jul 22, 2024:

बायडन, आणि २०२४ ची निवडणूक:
तर, जूनमधील अध्यक्षीय डिबेटनंतर, ह्या निवडणुकीमधली दुसरी काळ्या दगडावरची रेष आम जनतेसाठी ठळक उमटली. एवढी, की अखेर वयोवृद्ध बायडन साहेबांना सुद्धा किलकिल्या डोळ्यांमधून ती वाचता आली - क्लिंटन, ओबामा, नॅन्सी पलोसी अशा ख्यातनाम नेत्रविशारदांनी डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यावर! जे डोळे वर्षभर आधीच तपासून घ्यायला हवे होते, ते निदान आता तरी झाले. बायडन साहेबांनी वाढते वय, आणि घटते मानसिक आरोग्य लक्षात घेऊन निवडणुकीच्या रिंगणामधून पाय काढता घेतला. छप्पन्न वर्षानंतर प्रथमच अशी घटना घडते आहे.
माणसाच्या कर्म आणि कर्तृत्वापेक्षा कधीकधी नशीब किंवा योगायोग जास्त महत्वाचे ठरतात, ह्याचा ह्या निवडणुकीमध्ये पुन्हापुन्हा प्रत्यय येतो आहे. रिपब्लिकन पक्षाला पदोपदी धादांत (व्हेरीफाएबल) असत्य, किंवा किमान अतिशयोक्त बोलणाऱ्या, ज्या लोकशाहीने त्याला निवडून दिला, त्याच लोकशाहीचे नियम-कायदेकानू धुडकावून लावणाऱ्या, 'तुमच्या डोळ्यावर विश्वास ठेवणार, का मी म्हणतो त्यावर?' हा प्रश्न अत्यंत गंभीरपणे विचारू शकणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त सुयोग्य अध्यक्षीय उमेदवार मिळू नये हे केवळ त्याचं नशीब!
सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नेमणुका हा अध्यक्षांच्या जबाबदारीचा एक मोठा भाग असतो. हे न्यायाधीश त्या पदावर आजन्म, किंवा त्यांच्या इच्छेनुसार कितीही काळ राहू शकतात, त्यामुळे त्यांच्या नेमणुकीच्या संधी वारंवार मिळत नाहीत. अशा परिस्थितीत, ट्रम्प अध्यक्ष होण्याआधीपासून अशी एक नेमणूक त्यांच्यासाठी राखून ठेवली असणे हे नशीब! रूथ बेडर गिन्सबर्ग सारख्या मरणोन्मुख न्यायाधीशाने शेवटच्या श्वासापर्यंत हट्टाने त्या पदावर राहून, आणखी एक संधी उपलब्ध करून देणे हे नशीब. अशात, तिसरी आणखी एक जागा मोकळी होणे हे आणखी मोठे नशीब! ह्या जागा भरताना ट्रम्पने काळजीपूर्वक निवडलेल्या न्यायाधीशांनी मोजक्या मुद्द्यांवर पक्षनिष्ठ निर्णय देऊन आपली नेमणूक सार्थ करणे हे नशीब. ह्यातल्या एका (गर्भपातासंबंधी) निर्णयामुळे, एका मोठ्या रिपब्लिकन गटासमोर आपल्या नेमणुकीचे 'कर्तृत्व' मिरवण्याची संधी मिळावी हे नशीब. अशा सहानुभूतीपूर्ण न्यायाधीशांमुळे, अध्यक्षांना किती गुन्हे माफ आहेत ह्याबद्दल गोंधळून टाकणारा निर्णय मिळून गंभीर खटल्यांची चालढकल होणे हे आणखी एक नशीब!
जो बायडन सारख्या पन्नासपेक्षा जास्त वर्षे वॉशिंग्टन मध्ये राजकारणातील सर्वोच्च वर्तुळात राहिलेल्या माणसाला तिसऱ्या प्रयत्नात, २०२० मध्ये डेमोक्रॅटिक उमेदवारी, आणि अध्यक्षपद सुद्धा एकदाचं मिळालं होतं, ते ट्रम्पच्या चार वर्षाच्या बेताल ड्रामेबाज अध्यक्षतेला कंटाळलेल्या जनतेमुळे! बायडननी अध्यक्ष म्हणून, करोनाच्या सामाजिक आणि आर्थिक वाताहतीमधून देशाला बाहेर काढणे, इन्फ्रास्टक्चर नूतनीकरण विधेयक, आवश्यक औषधांच्या किमतींवरील नियंत्रण, युक्रेनला मदत, नेटोचे नेतृत्व वगैरे काही बाबतीत चांगली कामगिरी केली; पण ते बऱ्याचदा डेमोक्रॅट पार्टीच्या जहाल डाव्या गटाच्या मागण्यांना शरण गेले हेही खरंच. त्यांनी काळ्या आणि स्त्री मतदारांचा अनुनय करण्यासाठी कमला हॅरीस ह्या काळ्या-भारतीय व्यक्तीला उपाध्यक्ष उमेदवार म्हणून निवडलं होतं. ज्या हॅरीसना, स्वतःची अध्यक्षपदाची अयशस्वी लढत अतिशय अल्प काळात मागे घ्यावी लागली होती, त्यांच्या पदरात ही देणगी अचानक पडली. नशीब, दुसरं काय!
उमेदवार म्हणून हॅरीस जेवढ्या सामान्य होत्या, तेवढ्याच त्या उपाध्यक्ष म्हणून अनुल्लेखनीय होत्या. एक तर, उपाध्यक्षांना सहसा चमकोगिरीची संधी क्वचितच मिळते. दुसरं म्हणजे, हॅरीसना सुरुवातीला दिलेली मेक्सिकोमधून येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी अतिशय कठीण होती. त्याविषयी त्यांनी काही कामगिरी केली असलीच, तर ती गुप्त स्वरूपाची असावी. कारण, एकतर गेल्या दोन-तीन वर्षात हा प्रश्न फारच जास्त चिघळला आणि त्याविरुद्ध त्यांनी सुचवलेल्या कुठल्याच उपाययोजनेची जनतेला काही माहिती नाही. हॅरीस ह्यांची वक्तव्ये सामान्य अमेरिकन जनतेमध्ये 'वर्ड सॅलड' - म्हणजे 'अर्थ निष्पन्न होईल ह्याची खात्री नसलेले शब्दसमूह' म्हणून ओळखली जातात! त्यात भर घालणारं, त्यांचं थेट जया भादुरी टाईप '१००% बेगडी खळखळणारं' हास्य. पण, आता प्रचारासाठी किती कमी वेळ उरला आहे हे पाहता, बायडन-हॅरीस टीमने उभारलेल्या निधीचा विचार करता, उपाध्यक्ष म्हणून हॅरीस नांवाची देशभरातील ओळख बघता, कमला हॅरीस ना उमेदवार करण्यापलीकडे गत्यंतर नाही. एवढ्या उशीरा रिंगणात येऊन तोंडघशी पडण्याचा, अंतर्गत भांडणांमधून ट्रम्पचा फायदा करून देण्याचा वेडेपणा कोणीच डेमोक्रॅट करणार नाही. पुन्हा एकदा, नशीब!
२०२४च्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचे असलेले काही राजकीय प्रश्न म्हणजे वाढती महागाई, बेकायदेशीर स्थलांतराचे नियंत्रण, गर्भपातासंबंधी कायदे आणि चीनच्या वर्चस्वाला आळा घालणे. ह्यापैकी महागाईची वाढ आता बरीच कमी होते आहे, तिची कारणे अनेक आहेत आणि सर्वच सरकारी धोरणांनी अल्पावधीत बदलू शकणारी नाहीत. बेकायदेशीर स्थलांतरांविषयी रिपब्लिकन मुद्दे बरोबर आहेत; पण त्यांना तो प्रश्न केवळ झोडपण्यासाठी वापरण्याची इच्छा दिसते, सोडवण्याची नाही. त्या मुद्द्यावरून डेमोक्रॅट्स, विशेषतः हॅरीस, बराच मार खाणार. ह्याउलट गर्भपाताचा मुद्दा, विशेषतः काही रिपब्लिकन राज्यांच्या अतिरेकी कायद्यांमुळे डेमोक्रॅट्सच्या बाजूने होता; पण सर्व नवीन घडामोडींमध्ये तो थोडा मागे पडू शकतो. कदाचित, ह्या मुद्द्यावरून आणि एक स्त्री अध्यक्ष होण्याच्या शक्यतेमुळे, स्त्री-मतदार मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी उद्युक्त झाल्याचा फायदा होऊ शकतो. चीन, आणि एकूण आंतरराष्ट्रीय धोरण, 'बलशाली अमेरिका' वगैरे मुद्दे सहसा रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने जातात. एव्हाना ट्रम्पच्या 'युक्रेन युद्ध चोवीस तासात थांबवू शकेन', 'चिनी आयातीवर कर वाढवून आयकर कमी करेन' वगैरे वल्गना सुरु झाल्याच आहेत; आणि एकूण जगातच (अर्जेंटिना, इटली, हंगेरी, भारत...) जी उजव्या गटाच्या आणि नॅशनॅलिस्ट विचारसरणीच्या पक्षांच्या विजयाची लाट आलेली आहे, त्यात अमेरिकाही सामील होणे कठीण नाही.
बायडन-ट्रम्प लढतीमध्ये NOTA मत देण्याची भावना फार प्रबळ होत होती. एवढ्या उशिरा, निवडणुकीआधी जेमतेम तीन महिने, एका नवीन उमेदवाराच्या गळ्यात (हॅरीस ह्यांच्या सर्व त्रुटी लक्षात घेता) निवडणूक प्रचाराचे घोंगडे अडकवणे हा सरासर अन्याय आहे; तो डेमोक्रॅट पक्षश्रेष्ठींनी टाळायला हवा होता. अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीमध्ये सहसा व्यक्तीमहात्म्य फार मोठे असते. ह्या वेळी, ते बाजूला ठेवून, पक्षाचाही विचार करायला हवा एवढंच म्हणता येईल. काही झालं तरी शेवटी, एक पक्ष मेंढरांसारखा एक व्यक्ती म्हणेल ती पूर्व ह्या एकाच धोरणावर विश्वास ठेवतो आहे; तर दुसऱ्यामध्ये विचार करू शकणारे बरेच लोक अजून शिल्लक आहेत.
* * * * *
Jul 27, 2024:

संभाव्य डेमोक्रॅट उपाध्यक्ष:
डेमोक्रॅट अध्यक्षीय उमेदवार कमला हॅरीस ह्यांना फार घाईघाईने उपाध्यक्षाची निवड करावी लागते आहे. त्यांना मदत म्हणून, सध्याच्या चर्चेमधील नावांविषयी मी माझे खालील अनाहूत, पण अनमोल, सल्ले हॅरीस ह्यांना देऊ इच्छितो. ही माझी डेमोक्रॅट पक्षाला देणगी म्हणा, माझी भविष्यवाणी समजा, का माझं बेटींग म्हणा!
गेव्हिन न्यूसम, कॅलिफोर्निया गव्हर्नर - बाद! कॅलिफोर्निया तिसऱ्या क्रमांकाचं राज्य (तेवढी जास्त इलेक्टोरल कॉलेज मतं!) असलं, तरी ते नेहमीच डेमोक्रॅट खिशात आहे. एकाच राज्यातले दोघे उमेदवार बहुतेक अवैध असतील, आणि अनावश्यक नक्कीच. त्यात हॅरीसना स्वतःचं बॅगेज पुरेसं आहे; लिबरल वोक राज्यातल्या आणखी एकाच्या एक्सट्रॉ बॅगांचा चार्ज भरण्याची गरज नाही.
पीट बुटीजेज, ट्रान्सपोर्टेशन सेक्रेटरी - बाद. अतिशय चांगली निवड ठरली असती, पण... इंडियाना तसंही लहानसंच राज्य आहे; ते ह्यावेळी डेमोक्रॅट होण्याची शक्यता शून्यवत. एकाच वेळी महिला (त्यात पुन्हा काळी!) अध्यक्ष, आणि गे उपाध्यक्ष असा डबल डोस अमेरिकन जनतेला असह्य होऊ शकेल.
ग्रेचन व्हिटमर, मिशिगन गव्हर्नर - बाद. मिशिगन मस्ट विन राज्य आहे; व्हिटमर तिथे लोकप्रिय असेलही. पण एका तिकिटावर दोन बायका म्हणजे अमेरिकेच्या सहनशीलतेचा अंत असेल. दोघी बायकांनाही ते बहुधा मान्य नसेलच.
मार्क केली, ऍरिझोना सेनेटर - बाद. ऍरिझोना शूड विन आणि मेक्सिकोच्या हद्दीवरील राज्य असल्यामुळे, आणि केलीची बायको गोळीबारामध्ये गंभीररित्या जखमी झाली असल्यामुळे हॅरीसना ह्याची राजकीय मदत होऊ शकते. पण केली फारच मवाळ मानला जातो, आणि (त्यामुळे?) त्याला अमेरिकाभर ओळख नाही.
प्रीझकर, मूर, वॉल्झ आणि कूपर हे चारी गव्हर्नर्स - बाद. त्यांची देशव्यापी ओळख नाही, मतांच्या हिशेबात त्यांची राज्ये फार महत्वाची नाहीत, आणि त्यातली काही आधीच डेमोक्रॅट खिशात आहेत.
माझी निवड: जॉश शपीरो (पेनसिल्व्हेनिया गव्हर्नर), किंवा कदाचित... अँडी बशीर (केंटकी गव्हर्नर). दोघांची बलस्थाने - तरुण, गोरे, लोकप्रिय, पुरुष, उत्तम वक्ते, गव्हर्नरशिपचा अनुभव. पेनसिल्व्हेनिया राज्य मतांच्या दृष्टीने पुरेसं मोठं आहे, आणि मस्ट विन मानलं जातं; तर केंटकी 'मिडल अमेरिका' असल्यामुळे हॅरीसच्या इलिट लिबरल प्रतिमेचा तोल सांभाळू शकेल. शपीरो ज्युईश असल्याचा देशव्यापी निवडणुकीमध्ये थोडा तोटा शक्य आहे; पण बशीर रिपब्लिकन केंटकीचं डेमोक्रॅटमध्ये रूपांतर करू शकणार नाही. शिवाय त्याची देशव्यापी ओळखही बेताचीच आहे.
म्हणून, 'हॅरीस - शपीरो २०२४' असे बोर्ड मी थोड्याच दिवसात रंगवायला घ्यायचं म्हणतो आहे... फार वेळ उरला नाही ना आता!
* * * * *
Sep 12, 2024:

हायला, सगळी दुनियाच है ना, आपल्यावर खार खाते! चार वर्षांपूर्वी, मी जिंकलो असतांनाही खोटारडेपणा करून त्या म्हाताऱ्याला अध्यक्ष केला. ह्ये आमचं तवाचं उपाध्यक्ष, पेन्स, येक नंबर शेपूट घालनार बघा! बिंदास सांगायचं ना, ट्रम्पलाच अध्यक्ष करा नायतर मी ह्या निकालावर सहीच नाय करत, जा! पन नाय; आयत्यावेळी घाबरलं ह्ये xxx चं!
आता ह्यावेळी सुद्धा, पयल्या डिबेटमदी त्या म्हाताऱ्याला मी चांगली धूळ चारली होती. झोपेतून जागा झाला तवा त्याला समजेचना हाय कुटं त्यो. पब्लिक येवडी खूष आपल्यावर, हाय का, की मी तर २० जानेवारीच्या भासनाचीच तयारी करायला लागलो. आन ह्या वेळी आपल्याला ह्ये जंगी मोठ्ठाथोरला क्राऊड पायजेल बार का; त्या काळ्याच्या टिनपाट घोळक्यापेक्षा पन जास्त! तर, ह्या xxx च्या डेमोक्रॅट्सनी चालबाजी क्येली, आन त्या कामलाला उमेदवार क्येलं फाटकनदिशी. आसं कदी आसतंय का कुटं! मी येवड्या निगुतीनं तय्यारी क्येली व्हती म्हाताऱ्याला झोपवायची, आन तुमी साला उमेदवारच बदलून टाकता? ह्ये काय रितीपरमान जालं का?
तर दुसऱ्या डिबेटमदी, मी बोल्ला ठीक हाय, लेडी लोग हाय; जवा दे! थोडा आपन पन जंटलमनगिरी करूया; वो भी क्या याद रखेगी! म्हाताऱ्याला लोळवला; हिला पण लोळवू. ही तर म्हाताऱ्यायवडी पन स्मार्ट नाय. आमच्या ग्यांगमदली पब्लिक बोलली मला, थोडी तयारी करो बॉस. मी नुसता खुन्नस दिला त्येन्ला, काय! तय्यारी माला, ह्या डॉन्याला, करायला सांगता? आरे हाट! मी फकस्त तिला कम्युनिस्ट बोलनार, इमिग्रेशनबद्दल नायतर इन्फ्लेशनबद्दल बोलनार आन रडायला लागली की खिशात घालनार, काय!
मी हल्ला करायला एकदम तय्यार पन होता; पण हिनं आयत्या वेळी माज्या सभेतून लोक कंटाळून निघून जातात आसलं कायपन वंगाळ बोलायला सुरुवात क्येली. अपना एक सिद्दा उसूल हाये. साला काय पन बोल; पन आपल्या सभेतल्या आटेन्डन्सवर डाऊट नाय करायचा, काय? मग माजा तर भेजाच तडकला! हायला! वाट्टेल त्या देशातल्या लोकांना हिकडं यायला देते ही. त्ये लोक कसल्या भाषेत बोलतात त्ये पण म्हायत नाय, कुत्री-मांजरं खातात ना शेजाऱ्यांकडची! हां मग? मी बघितलं त्या क्यू अनॉन का कुठल्या चॅनेलवर दाखवलेलं. आता काम्पुटरवर बगितलं तर काय खोटं असनार काय ते? इन्फ्लेशनवरून पन सुनावलं तिला! बोललो किमती ३०-४०-... ७०-८० टक्के वर जाताहेत; आन सरकार कायपन करत नाय! साला आयत्या वेळी रागानं धाप लागली म्हणून, नायतर ८० च्या फुडं पन आकडे येतात की मला; पार २००-३०० टक्क्यापर्यंत गेलो असतो. पन ही अबॉर्शनची थोडी झंझटच हाय; येका क्राऊडसमोर एक, तर दुसऱ्यासमोर दुसरं बोलायचं मंजी कंफूजन होनारच ना. कदीकदी साला आपल्यालाच समजत नाय मी कोनाच्या बाजूनं हाय! बोललो ह्ये कम्युनिस्ट लोक कुटेकुटे तर नवव्या महिन्यानंतर पन, बेबी जाल्यावर पन, अबॉर्शन करायला देतात. तर, ती खोटारडी एबीसी ची रिपोर्टर बोलते, नाय, कुठल्याच राज्यात बेबी जल्मल्यावर अबॉर्शन कोन डॉक्टरपन करू नाय शकत; फालतू डिटेल नायतर! मी नुसता एक लूक दिला तिला. आन सारखी प्लॅन प्लॅन करून बोंब मारत होती, तर मी बोललो माज्याकडे पन आयडिया हाये एका प्लॅनची, मला पन समजते प्लॅन मंजी काय! येवडं बोलल्यावर तर कामला खूखू हसायला लागली. सॉलिड सटकते हां आपली, साला लेडी लोगकडून असली भंकस डोक्यात जाते आपल्या!
डिबेटनंतर लग्गेच मीच जाऊन सगळ्या रिपोर्टरांना सांगितलं मी डिबेट जिंकलो ते; नायतर उगाच बोंबा मारनार कामला जिंकली म्हणून!
आता तर मी सिद्दा बोललो, पुढच्या डिबेटमध्ये मी काय येनार नाय. पुन्यांदा म्हाताऱ्याला, नायतर कोनतरी हरेल असल्याला आना, तरच आपण डिबेट करेल. कारण मी तर कवाच हरत नाय, पब्लिकला म्हायतीच हाय.
* * * * *
Oct 27, 2024:

निवडणुकीला जेमतेम एक आठवडा शिल्लक आहे. देश, किमान महत्वाची निर्णायक राज्ये तरी, दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये जवळजवळ समसमान दुभंगलेला आहे, असं ओपिनियन पोल्स ची आकडेवारी दर्शवते.
एकजण देशापुढील बऱ्याच महत्वाच्या समस्यांवर अचूक बोट ठेवतो आहे. दुसरीकडे बोलण्यासारखं फार नाही; किंवा असलं तर तिला असंख्य डगरींवर पाऊल ठेवायच्या कसरतीमध्ये ते बोलता येत नाहीय. तो दर अर्ध्या वाक्याला धडधडीत खोटं बोलतो आहे, तर ती प्रश्नांची तिच्याकडे नसलेली उत्तरं देण्याऐवजी तिसऱ्याच मुद्द्यावर बोलून विषय बदलते आहे. दोघेही कुबेराचा खजिना गवसल्याच्या थाटात, मतदारांना निवडून आल्याक्षणी मालामाल करण्याची वचने देताहेत.
आता फक्त सहा जानेवारीला त्याने काय केलं होतं ह्याची वारंवार स्वतःला आठवण करून देत, थरथरता अंगठा जोर करून तिच्या नांवावर टेकवायचा.
ती जिंकेल अशी आशा करायची. एवढ्या बहुसंख्येने, की त्याला पुन्हा एकदा आदळआपट आणि रडारड करायची, जगासमोर ह्या आत्ताही महानच असलेल्या देशाला लाज आणायची संधी मिळू नये... असं स्वप्न बघायचं.
अजून स्वप्न तरी बघता येतात, हे बरं आहे!
* * * * *
Nov 6, 2024:

अखेर निकाल लागला!
अनपेक्षित नक्कीच म्हणता येणार नाही. गेले काही दिवस जास्तजास्त अपेक्षित वाटायला लागलेला निकाल! डेमोक्रॅट पक्षप्रेमी, कुठल्याही गोष्टीवरून अमेरिकेला फक्त नावंच ठेवणारे जगभरचे प्रेक्षक वगैरे टोकाची जनता ह्या निकालामध्ये त्यांची ठरलेली कारणे शोधेलच - अमेरिकन अडाणीपणा, स्त्री-द्वेष, वर्णद्वेष इ. इ. वर्तमानपत्रे, न्यूज पोर्टल्स, टॉक शोज सगळीकडे काथ्याकूट काल रात्रीच चालू झाला. निकालाची दिशा स्पष्ट झाल्यावर मी झोपायला गेलो. कुठल्याच पक्षाचा झेंडा मिरवत नसल्यामुळे, ह्या आहेत मला जाणवलेल्या गोष्टी:
सर्वप्रथम, ट्रम्प ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! मला त्यांचे विचार, वक्तव्ये, त्यांची सूचित धोरणे पटत नसली तरीही एवढ्या प्रचंड संख्येने जिंकलेल्या राज्यांच्या बहुमताचा मान ठेवायलाच हवा. तेच प्रांजळ कौतुक त्यांच्या स्टॅमिनाचे! वयाच्या अठ्ठ्यातराव्या वर्षी, एवढी टीका, निंदा, टिंगल दररोज होत असतांना, डोक्यावर ऐशी-नव्वद गुन्हेगारी आरोपांची तलवार टांगती असतांना, खुनाचे दोन प्रयत्न झाल्यावरही, ह्या उत्साहाने निवडणूक प्रचार सभा लढवण्याची जिगर आणि शारीरिक ताकद देव सर्वानाच देवो! त्यांनी सामान्य जनतेच्या तक्रारींच्या नाड्या अचूक ओळखल्या होत्या, ह्याबद्दल वादच नाही. त्या बेसिक मट्रेल वर, त्यांचा स्वतःच्या प्रचारासाठी, आणि डेमोक्रॅट्सविरुद्ध अपप्रचारासाठी अत्यंत कुशल वापर करून घेणे, सत्य-असत्य भेदभावाची कणमात्र तमा न बाळगता, ज्वालाग्राही विधानांची रेलचेल करणे, ही सर्व मात्र ट्रम्प ह्यांची कलाकुसर! ह्या नक्षीचा भूलभुलैया त्यांनी एवढ्या यशस्वीरीत्या रचला, की ह्या समस्यांवर ते काय उपाययोजना करणार, त्या कशा सोडवणार असले किचकट प्रश्न श्रोत्यांच्या डोक्यात येऊच शकले नाहीत. आतापर्यंत त्यांच्याकडे 'डेमोक्रॅट्स बिनडोक, आणि मी सर्वज्ञ असल्यामुळे हे प्रश्न चुटकीसारखे सोडवेन' ह्यापलीकडे विस्तृत उत्तर नाही. आता पुढील चार वर्षांमध्ये काय होईल ते आपण पाहूच. त्यांच्या राजकीय विरोधकांविरुद्ध सूडाच्या धमक्या ह्या केवळ निवडणूक प्रचारातील शाब्दिक फुलोरा असेल असं धरूया.
दुसरीकडे, एवढ्या एकांगी निकालाची जबाबदारी बायडन आणि इतर डेमोक्रॅट पक्षश्रेष्ठींना घ्यायलाच हवी. बायडन ह्यांची शारीरिक आणि मानसिक दुर्बलता, त्यांच्या सान्निध्यात असलेल्या लोकांच्या लक्षात आली नसेल हे अविश्वसनीय वाटते. जर डेमोक्रॅट उमेदवार नेहमीच्या प्रायमरीच्या परंपरेप्रमाणे निवडला गेला असता, तर आयत्यावेळी हॅरिस एवढ्या कमकुवत उमेदवारावर भिस्त ठेवून प्रार्थना करत राहाव्या लागल्या नसत्या. २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन इतिहासातील सर्वाधिक सुयोग्य उमेदवार असतानाही हरणे, हे अमेरिकेच्या स्त्रीद्वेष्टेपणाचे लक्षण मानता आले; ह्यावेळी दोन प्रश्नांची धड सलग उत्तरे देऊ न शकणाऱ्या हॅरीसच्या बाबतीत तो बचाव पुरेसा वाटत नाही. तीच गोष्ट काळ्या वर्णाबद्दल. ट्रम्प ह्यांच्या पाठिराख्यांमध्ये गौरवर्णीय वर्चस्व मानणारे, वर्णद्वेषी लोक अनेक आहेत ह्यात शंकाच नाही; पण हॅरीसचा पराभव त्या एका कारणाने झाला नाहीय. तो पराभव जास्त करून त्यांच्या स्वतःच्या अतिरेकी डाव्या, लिबरल आणि सगळ्याच लहानसहान गटांना गोंजारत बसण्याच्या भोंगळ विचारांमुळे (त्यातले बरेच विचार त्यांनी ह्या निवडणुकीदरम्यान सोडून दिल्याचे दावे केले) झाला आहे. तो पराभव ट्रम्पनी गेल्या चार वर्षातील महागाई, बेकायदेशीर इमिग्रेशन चा डेमोक्रॅट्सनी डोळेझाक केलेला ज्वलंत प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय धोरणातील दुर्बलता हे मुद्दे यशस्वीरीत्या हॅरीसच्या माथी मारण्यामधून झालेला आहे. उपाध्यक्ष उमेदवार निवडणूक जिंकून देऊ शकत नसला, तरी जिंकायला मदत करू शकतो. कायमच डेमोक्रॅट असलेल्या मिनिसोटा राज्यातील टिम वॉल्स ची निवड त्या दृष्टीने चुकीची होती.
असो. वी आर हिअर नाऊ! ट्रम्प ह्यांच्या प्रचार सभांमधील भाषणांएवढाच खंबीरपणा ते प्रत्यक्ष परराष्ट्र धोरणांमध्येही दाखवतील, त्यांना कुशल अनुभवी आणि जाणकार सहकारी लाभतील, ते त्यांचा सल्ला ऐकतील अशी आशा करायची. जगातले वेगवेगळे ताणतणाव पाहता, पुढची चार वर्षे सुखरूप पार पडतील अशी आशा करायची.
A man lives in hope!

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...