इकोपोहून पुन्हा
ती खेळण्यातल्यासारखी आगगाडी
हिरव्या पायघड्यांसारख्या, लुफाफा आणि इस्टवोल्ड्स आणि
डॉनीब्रुकच्या डोंगरांमध्ये चढते. डॉनीब्रुक पासून
ब्रॉड गेज रेल्वे
उम्कोमासच्या विस्तीर्ण खोऱ्यापर्यंत जाते.
ह्या भागात जमाती राहतात, आणि इथली
जमीन अगदी मरगळलेली
आहे, तिच्यात काही
तग धरणं आता
कठीण. खोऱ्यामधून निघाल
की आधी हेमू-हेमू आणि
मग एलंडस्कोप. मग
पुन्हा उम्सिंडूसीच खोरं, नंतर
एडनडेल सोडलं, की टुमदार
पीटरमरीत्झबर्गच्या भयाण काळ्या
झोपडपट्ट्या. इथे सगळ्यात
मोठ्ठी ट्रेन घ्यायची - जोहानसबर्गला
जायला. ही म्हणजे
गोऱ्या माणसाची अगदी अजब
करामत आहे - इंजिनाशिवायची
ट्रेन. नुसतं एक लोखंडाच
खोकं असत पुढे,
आणि वरून जाणाऱ्या
लोखंडाच्या तारांमधून म्हणे त्याला गती मिळते.
हिल्टन आणि सिंहनदी,
मग बाल्गोवन, रोझेटा
आणि मुई नदी,
मध्ये सगळे अवर्णनीय
सुंदर डोंगर. एकेकाळच्या
पुरातन समरभूमी मधून, रात्रीच्या
वेळी गरजत ही
ट्रेन धावत असते,
ड्रेकन्सबर्गपर्यंत. मग पुढे
नुसत पठार.
पहाटेच्या धुसर अंधुक
प्रकाशात जाग व्हाव,
गाडीचा डबा डोलत
असतो. इंजिनाचा धूर
निघत असतो, आता
गेल्या त्या डोईवरच्या
तारा. आता हा
नवीन प्रदेश. विचित्र
प्रदेश. नजर ठरेल
तिथपर्यंत नुसता उलगडत गेलेला.
इथे सगळी नवीन
नावं. फक्त इंग्लिशच
शिकलेल्या झुलू माणसाला
उच्चारायला सुद्धा कठीण. ही
'आफ्रिकान्स' भाषेतली नावं, त्यांनी
कधी ऐकलेलीच नसणार.
‘खाणी आल्या, खाणी आल्या’
- सगळेजण ओरडतात; कारण ते
खाणींमध्ये काम करण्यासाठी
जाताहेत. 'ते, तिथे
पांढरे चपटे उंचवटे
दिसताहेत, त्या खाणी?'
आता ते निश्चिंत
विचारू शकतात, काल त्यांचं
वक्तव्य ऐकलेल्यापैकी कोणी आता
इथे नाहीय.
-
ओ
आजोबा, ते खाणीतल्या
दगडाचे ढिगारे. सोनं आधीच
बाहेर काढून घेतलाय
त्यातलं.
-
तो
दगड बाहेर कसा
काढतात?
-
आम्ही
जातो ना खोल खाली
आणि खणून काढतो
तो आजोबा. खूप
कठीण असेल खोदायला,
तेव्हा मग आम्ही
लांब जातो. मग
गोरा माणूस येतो,
आणि त्याचे ते अजस्त्र फटाके वापरून स्फोट करतो.
मग आम्ही परत
येतो, आणि ते
सगळ साफ-बिफ
करतो, ट्रकात भरतो
आणि एका पिंजऱ्यातून
चिमणीमध्ये वर पाठवतो. ती चिमणी
म्हणजे एवढी उंच
असते, एवढी उंच
असते की... छ्या
सांगताच येणार नाही मला.
-
पण तो पिंजरा वर कसा जातो?
- तो ना, दोरीनी एका मोठ्ठ्या
चाकाला गुंडाळलेला असतो. थांबा,
दाखवतो हां तुम्हाला.
ते गप्प राहतात, त्यांच्या
हृदयाचे ठोके मात्र
जलद झालेत, अपार
उत्सुकतेनी. ‘ते बघा
चाक आजोबा, ते
बघा!’ एक प्रचंड
लोखंडी यंत्रणा दूर आकाशात
उभी दिसतेय. त्याच्याही
वरती एक मोठ्ठ
चाक आहे, एवढ्या
गरागरा फिरतंय, की त्याचे
काटे दिसत सुद्धा
नाहीत. प्रचंड मोठाल्या बिल्डिंगी,
धूर ओकत असलेले
पाईप, घाईगर्दीत चाललेली
माणसांची वर्दळ. आकाशात पार
उंचावर, एक मोठ
पांढर टेकाड, त्यावर
लागलेली ट्रकांची अथांग रांग.
जमिनीवर गाड्या, ट्रक, बसेस
... नुसता सावळा गोंधळ.
-
हे
आलं जोहानसबर्ग?
ते सगळेजण ऐटीत हसतात,
जुने जाणते आहेत
ते इथले. ‘छे,
हे काहीच नाही.
जोहानसबर्ग मधल्या बिल्डिंगी म्हणजे
तुम्हाला सांगतो येवढ्या मोठ्या
असतात’... पण प्रत्यक्षात
ते सांगू नाही
शकत. ‘अरे ह्ये,
तुला माहित्येय ना
ती माझ्या बापाच्या
गोठयामागची टेकडी, तेवढ्या तरी
उंच असतात का
नाय त्या बिल्डिंगी’.
त्याचा साथीदार मुंडी हलवतो;
पण कुमालोंना काही
ती टेकडी माहिती
नसते.
आता ह्या बिल्डीन्गींना
अंतच नाहीय... बिल्डिंगी,
त्या पांढऱ्या टेकड्या,
अजस्त्र चाकं, अगणित रस्ते,
गाड्या, ट्रक, बसेस... 'हे
तरी नक्कीच जोहानसबर्ग
असणार'. ते सगळे
पुन्हा हसतात. आता त्यांना
कंटाळा यायला लागलाय. हे
काहीच नाही, ते
म्हणतात.
आगगाडीचे रूळ, आणि
आणखी रूळ ... चमत्कारच
आहे.. डावीकडे, उजवीकडे...
त्यांच्या मोजण्याच्या आवाक्याबाहेरचे. एक
ट्रेन एका बाजूनी
धाडधाड करत जाते,
त्या गडगडाटांनीच ते दचकून
कोलमडणार, तेवढ्यात दुसऱ्या बाजूनी
तशीच आणखी एक
ट्रेन धडधडत येते,
पण ती हळू
हळू मागे पडते.
स्टेशनं , स्टेशनं कल्पनातीत स्टेशनं.
शेकडो लोकं तिथे
वाट बघत उभे.
पण ह्या ट्रेन्स धडाधडा निघून जातात, लोकांना
तसंच ताटकळत ठेवून.
आता बिल्डिंगी आणखी उंच
होतात, गल्ल्या आणखी अगणित
वाटतात. कसा ह्या
जंजाळातून कोणी रस्ता
शोधत असेल देव
जाणे. आता संध्याकाळ
होते आहे, दिवेलागणी
व्हायला लागली आहे.
एक माणूस बोट दाखवतो
'आजोबा, हे बघा जोहानसबर्ग!' ते बघतात.
अचाट उंच बिल्डिंगी,
लाल आणि हिरवे
दिवे, जवळजवळ त्या
बिल्डीन्गींच्या इतकेच उंचावर. दिव्यांची
उघडझाप चालल्येय. एका बाटलीमधून
पाणी काय येत
ग्लास भरेपर्यंत. मग
दिवे काय जातात.
आणि ते पुन्हा
आले की, ... अरेच्च्या,
बाटली भरलेली, उभी
आणि ग्लास मात्र
रिकामा! आणि हा
खेळ पुन्हा पुन्हा...
ब्लॅक अॅन्ङ व्हाईट
म्हणे! ब्लॅक अॅन्ङ व्हाईट!
पण रंग तर
लाल आणि हिरवे
आहेत!! छे! आपल्या
आवाक्याबाहेरच आहे हे
सगळं!
ते गप्प झालेत,
त्यांच डोक भणभणतय
... मनातून घाबरलेत. हे स्टेशन
म्हणायचं का काय!
ही प्रचंड इमारत,
एवढी सगळी भुयार
जमिनीखालून. आता ट्रेन
थांबली आहे... ह्या अवाढव्य
छपराखाली. हजारो लोक दिसताहेत.
जमिनीच्या पोटात जाणाऱ्या पायऱ्या.
काळे, गोरे, येणारे,
जाणारे... एवढे असंख्य
की सबंध भुयार
व्यापून गेलाय. ह्या गर्दीत
कोणाला धक्का नको लागायला,
म्हणून ते जपून
चालतात; ब्याग गच्च धरून.
ते एका मोठ्ठ्या
हॉल मध्ये येतात,
आणि गर्दीच्या प्रवाहाबरोबर
पायऱ्या चढून बाहेर
रस्त्यावर येतात. इथे असह्य
गोंगाट आहे. गाड्या
आणि बस - एकमेकाला
चिकटलेल्या. त्यांच्या कल्पनेपलीकडे असंख्य.
गर्दीचा लोंढा रस्त्यात जातो,
पण इम्पाझाच्या मुलाच्या
आठवणींनी त्यांना मागून जायची
भिती वाटते. दिवे
हिरव्याचे लाल होतात
आणि पुन्हा हिरवे
होतात. त्यांना ऐकून माहिती
होत, दिवा हिरवा
असला की आपल्याला
जाता येत. पण
ते चालायला लागले,
की नेमकी एक
मोठ्ठी बस झपकन
त्यांच्या रस्त्यात येते - हा
काय नियम आहे
त्यांना समजत नाही,
मग ते परत
मागे येतात. शेवटी,
भिंतीजवळ थोडी जागा
शोधून उभे राहतात;
जणू काय मुद्दामच
कसली तरी वाट
बघत थांबले आहेत.
लहान मुलाच्या वरताण
त्यांची छाती धडधडते
आहे. परमेश्वरा, माझ
रक्षण कर... ते
पुटपुटतात... परमेश्वरा, माझ रक्षण
कर.
एक पोरगेलासा तरुण त्यांच्याजवळ
येतो, आणि अगम्य
भाषेत काही तरी
बोलतो.
-
मला
समजत नाही तुम्ही
काय म्हणाला.
-
ओ,
म्हणजे तुम्ही कोसा आहात
तर आजोबा!
-
नाही
नाही, मी झुलु
आहे.
-
कुठे
जायचं, आजोबा?
-
मला
सोफियाटाऊनला जायचय.
-
चला,
मी दाखवतो तुम्हाला.
एकीकडे त्यांना ह्या पोराच्या
मदतीबद्दल कृतज्ञता आहे, आणि
एकीकडे थोडी भिती
पण वाटतेय. नशीब,
हा पोरटा ब्याग
घेतो नाही म्हणाला.
आणि बोलायला तसा
मवाळ वाटला, त्याच
झुलू थोड विचित्र
असलं तरीही ... दिवे
हिरवे झाले, आणि
त्यांचा वाटाड्या निघाला रस्त्यात.
पुन्हा एक गाडी
झपकन त्यांच्या वाटेत
आली. पण हा
बहाद्दर डगमगला नाही - आणि
चक्क ती गाडी
थांबली! हे असलं
बघितलं की थोडा
धीर बळावतो.
ते दोघ जेवढी
सगळी वळण घेत
चालत होते, ते
सगळ काही त्यांना
उमगल नाही. पण
हात तुटेपर्यंत दुखायला
लागला होता, तेव्हा
एकदाचे ते एका
बसच्या थांब्यावर पोचले होते.
'आता लायनीत उभ
राहायचं आजोबा. पैसे आहेत
का बसच्या तिकिटाला?'
ताबडतोब, आपण फुकटे
नाही हे दाखवायला,
त्या पोराच्या मदतीबद्दल
आभार व्यक्त करायला,
त्यांनी ब्याग खाली ठेवली
आणि पाकीट बाहेर
काढलं. तिकिटाचे पैसे किती
विचारायला अवघड वाटल,
म्हणून पाकिटातून एक पौंड
काढला.
-
मी
आणू का तुमचं
तिकीट काढून आजोबा?
म्हणजे, तेवढ्यात तुमची रांगेतली
जागा नको जायला.
-
हो,
बरोबर आहे.
त्या पोरानी तो पौंड
घेतला, आणि थोड्या
अंतरावर जाऊन कोपऱ्यावर
वळला. तो दिसेनासा झाल्यावर कुमालो
घाबरले. रांग पुढे सरकतेय,
आणि तिच्याबरोबर कुमालो...
ब्याग हातात गच्च
धरून...पुढे... पुढे... आता
बस मध्ये शिरायची
वेळ आली, पण
त्यांच्याकडे तिकीट नाहीय. एकदम
काहीतरी आठवल्यासारख करून, ते
रांगेमधून बाहेर पडले आणि
त्या कोपऱ्यापर्यंत गेले.
त्या पोराचा पत्ताच
नाही! सगळा धीर
एकवटून, ते एका
वयस्कर, धड स्वछ
कपडे घातलेल्या गृहस्थाशी
बोलले.
-
साहेब
तिकीट ऑफिस कुठे
आहे?
-
कसलं
तिकीट ऑफिस?
-
त्या
बसचं तिकीट काढायला.
-
बसचं
तिकीट बसमध्ये घ्यायचं,
त्याला तिकीट ऑफिस नाही
लागत.
मनुष्य दिसायला सभ्य दिसला...
पाद्रीबाबांनी त्याला सांगून टाकल,
मी आत्ता एका
पोराला एक पौंड
दिला, तो मला
तिकीट ऑफिस मधून
तिकीट आणून देलो
म्हणाला.
-
आजोबा,
फ़सवलय तुम्हाला! दिसतोय
का कुठे तो
पोरगा? नाही ना?
आता कुठचा दिसतो
तुम्हाला तो! चला
माझ्याबरोबर. कुठे जायचय,
सोफियाटाऊन मध्ये?
-
हो,
तिथल्या मिशनमध्ये.
-
वा वा,
मी सुद्धा अॅंग्लिकन
ख्रिश्चनच आहे. मी
इथे एकाची वाट
बघत थांबलो होतो,
पण आता पुरे.
मी स्वतःच येतो
तुमच्या बरोबर. रेव्हरंड सिमांगुंना ओळखता का तुम्ही?
-
हो
तर, त्यांचं पत्र
आहे माझ्या जवळ.
ते दोघ पुन्हा
त्या रांगेच्या शेवटी
जाऊन उभे राहिले,
आणि यथावकाश बस
मध्ये बसले. आता
ही बस सुद्धा
त्या रस्त्यामधल्या गोंधळात
सामील झाली. त्या
कोलाहलात ड्रायव्हर पठ्ठ्या खुशाल
सिगारेट फुंकत होता - असल्या
अचाट धाडसाची कमाल वाटायलाच हवी, नाही का? रस्त्यांमागून रस्ते, सिग्नल मागून
सिग्नल - जणू काही
संपणारच नाहीत कधी. आणि
बस कधी कधी
अश्या वेगानी झुलत
होती, की इंजिनाच्या
रोरावण्यानी कानठळ्या बसत होत्या.
शेवटी एका लहानश्या
रस्त्यावर ते उतरले,
आणि तरीही तिथे
सुद्धा हजारो लोक होते.
त्या गर्दीच्या रस्त्यांवरून
ते बराच वेळ
चालत होते. ह्या
नव्या दोस्तानी त्यांची
ब्याग घेऊन चालायला
मदत केली, पण ह्याच्यावर
त्यांचा विश्वास बसला होता.
शेवटी एका दिवा
चालू असलेल्या घरापाशी
ते थांबले, आणि
त्यांनी दरवाजा ठोठावला. पाद्र्याचा
वेश केलेल्या एका
उंच तरुण माणसानी
दार उघडल.
-
मि. सिमांगु, तुमच्या मित्राला, इंडॉटशनीच्या
रेव्हरंड कुमालोंना घेऊन आलोय
मी.
-
अरे
वा वा, या
या आत
या. मि. कुमालो, खूप
आनंद होतोय तुमच
इथे स्वागत करताना
मला. पहिल्यांदाच येताय
का जोहानसबर्गला?
एवढ्या जपून त्यांना
इथे आणून सोडणाऱ्या
आणि प्रेमानी स्वागत
करणाऱ्या लोकांपुढे बढाया मारायची
कुमालोंची तयारी नव्हती.
-
पार
चकरावून गेलोय मी, ह्या
माझ्या नवीन मित्राशिवाय
इथे पोचण शक्यच
नव्हत मला.
-
नशीब
मित्र चांगला भेटला
तुम्हाला. हे मि.
मफ़ोलो, मोठा व्यवसाय
आहे ह्यांचा आणि
पुन्हा आपल्या चर्चच कामही
करतात.
-
नशीब
म्हणाल तर, आधी
एका लफंग्यानी लुबाडलं
त्यांना.
मग ती सगळी
कहाणी ... आणि सहानुभूती
... आणि सल्ले.
-
मि.
कुमालो, तुम्हाला नक्कीच चांगली
भूक लागली असणार
एव्हाना. मि. मफ़ोलो,
तुम्ही सुद्धा थांबता का
जेवायला?
पण मि. मफोलोंना
थांबायला वेळ नव्हता.
त्यांच्या मागे दार
लोटल्याबरोबर कुमालो एका मोठ्या
खुर्चीमध्ये विसावले. खर म्हणजे
ते सहसा सिगारेट
ओढत नसत, तरीही
आत्ता त्यांना देऊ
केलेली सिगारेट त्यांनी स्वीकारली.
खोली छोटीशी आणि
शांत होती, ते
गजबजाटाच, गोंधळून टाकणार शहर
बाहेर बंद केलेल
होत. एखाद्या लहान मुलाच्या
अधाशीपणाने ते सिगारेट
ओढू लागले. जोहानसबर्गचा
तो प्रदीर्घ प्रवास
संपला होता. त्यांना
हा रुबाबदार तरुण
पहिल्या भेटीतच आवडला होता. योग्य वेळी त्यांच्या ह्या एवढ्या
लांबच्या यात्रेच्या कारणाची चर्चा
होईलच. सध्या एवढी सुरक्षा
आणि स्वागतच पुरेसं
होत.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...