कोणे एके काळी, पंचदशक संस्थानामधल्या सरदार गुणाजींना जेव्हा तडकाफडकी दूरदेशीच्या मलयप्रांती मोहीमेवर जाण्याचा त्यांच्या अन्नदात्या मायबाप शेटजींचा आदेश झाला, तेव्हा त्यांनी नेहमीच्या सवयीनी फक्त 'किती उंच' हा एकच सवाल पुसला. ह्या प्रश्नाने शेटजीही बुचकळ्यात पडल्याचे पाहून, त्यांनी भानावर येऊन त्वरित सावरून घेण्याचा प्रयत्न केला, 'आपलं, मला काय म्हणायचंय, की मलयदेशी जाणारे विमान किती उंचीवरुन जाते?' आपल्या ह्या जिव्हाचापल्याने शेटजी खुष होतील ही त्यांची अटकळ मात्र निमिषार्धात धुळीस मिळाली. 'नसत्या चांभार चौकश्या' एवढा भाव कानापर्यंत पोहोचल्यावर गुणाजींनी तेथून काढता पाय घेतला व तत्काल मोहीमेची तयारी सुरु केली.
गुणाजींच्या तत्परतेचे सुप्त कारण मात्र निराळेच होते. उपजिविकेसाठी काही दशके जरी ते पंचदशक संस्थानात वास्तव्य करुन असले, तरी मनाने ते वारंवार त्यांच्या मातृभूमीतच वावरत. ही मातृभूमी मलयदेशापासून काही थोडीच योजने दूर असल्याने, मोहीम संपताच मायदेशी भेट देऊन, आप्तेष्टसुह्रुदांच्या भेटीचा योगही घडवून आणता येईल, हा छुपा इरादा त्यांचे मनी तरळत होता. हा इरादा त्यांनी अनवधानाने प्रिय भार्येच्या कानी धालताच, तिने स्त्री-आणि-पत्नीसुलभ चतुराई तथा चौकसपणे एक प्रदीर्घ प्रश्नमालिका त्यांच्या गळ्यात घातली. 'प्राणनाथ, जायलाच हवं का?' ह्या व्याकुल प्रेमपुष्पाने सुरूवात होऊन, 'नक्की कोणाकोणाला भेटायचं आहे आणि का', 'मायदेशातील ग्रीष्मऋतुतील हवनकुंडात बसण्याचा, किंवा स्वेदगंगेमध्ये न्हाऊन निघण्याचा, किंवा तडिताघाती पर्जन्यवर्षावाने प्रकृतीला अपाय होण्याचा अनुभव (ह्या वयात) झेपेल का?' इत्यादी प्रेमयुक्त चिंतासत्राचा मध्य गाठून, 'आपली एवढी तीव्र इच्छा असेलच तर मी म्हणते, जातांना हे बारा मण सामान तरी घेउन जाच गडे!' ह्या विनंतीवजा आज्ञेवर ह्या मालिकेची सांगता झाली.
मायदेशी आप्त-मित्रांकडून अनंत कोडकौतुके करून घेण्यात दिवस व्यतीत करत असतांना, गुणाजींच्या तल्लख डोक्यात एक कल्पना तरळली. ह्याच मोसमामध्ये, मायदेशामध्ये, गुलबकावलीच्या अप्राप्य कुसुमासमान एक दैदीप्यमान, केसरयुक्त सुवर्णांगी, मधुरादपी मधुरं इदं अशी किर्ती असलेले फल बहरत असे. त्याच्या गुणांच्या यथायोग्य किंवा कपोलकल्पित अशा कथा दूरवर, अगदी पंचदशक संस्थानापर्यंत प्रसिद्ध असल्या, तरीही मायदेशाबाहेर बहुतेक स्थळी, हे फल नजरेस पडणेही दुरापास्त असे. गुणाजींना पूर्ण कल्पना होती, की त्यांच्या स्वामिनीच्या ब्रम्हानंदावस्था, अमृत, सप्तस्वर्ग, मोक्ष इत्यादी सर्व अत्युच्च आकांक्षा एकासमयावच्छेदेकरून ह्या एकमेव फलाच्या सेवनाने साकार होऊ शकतात. हे फल जर तिच्यासाठी घेऊन जाता आले, तर तिच्या आनंदाला पारावार रहाणार नाही. तेवढे नाही, तर किमानपक्षी निव्वळ आप्तेष्टसुह्रुदांच्या अत्याग्रहाखातर एकट्याने केलेल्या ह्या फलभक्षणाचे पापक्षालन कदाचित शक्यतेच्या कक्षेत येऊ शकेल. जटील समस्या फक्त एकच होती, की पंचदशक संस्थानाच्या सरहद्दीवर काळेकभिन्न धिप्पाड सशस्त्र पहारेकरी सदैव जागरुक पहारा देत असत, कोणीही संस्थानाबाहेरील फळफळावळ आत घेऊन येवू नये ह्याची दक्षता राखण्याकरिता! त्यांना चुकवून एवढे तीव्र सुगंधी फल आत घेउन जाणे हे येरागबाळाचे काम नोहे, ह्याची पूर्ण जाणीव गुणाजींना होती.
अखेर पंचदशक संस्थानी स्वगृही पुनरागमन झाल्यानंतर, जेव्हा गुणाजींनी सोबत आणलेली तीनही आम्रफळे स्वस्त्रीसमोर सादर सूपूर्त केली, त्या स्वर्गातून देवदेवतांनी पुष्पवृष्टी करावी अशा प्रसंगी, असंख्य चीत्कार, ताटाएवढे मोठे झालेले डोळे, त्यातून ओसंडून वाहणारे कौतुक, मुखाद्वारे उधळली जात असलेली स्तुतीसुमने इत्यादी चमत्कारांमुळे गुणाजींना आपण पुन्हा एकदा विवाहपूर्वकालामध्ये प्रवेश केला असावा, असा भास होणे स्वाभाविक होते. फलाचा शेवटचा रसबिंदू संपल्यावर आणि फलाचे अंमळ मोठे, दगडासमान बीज केवळ दंत-जिव्हाकौशल्याने लख्ख धुतल्याप्रमाणे स्वच्छ केल्यानंतर, त्यांच्या भार्येच्या मुखातून सादर सप्रेम कौतुक आणि अचंबाच शब्दरूप धारण करून ठिबकला, 'नाथ, हद्दीवरच्या जालीम पहारेक-यांच्या कचाट्यातून आपण ही फळे कशी काय सोडवून आणलीत?'.
शतजन्म शोधूनही विवाहित पुरुषांच्या भागधेयात क्वचितच अवतरणा-या ह्या पत्नीप्रेमादराच्या अनमोल क्षणी सुध्दा बढाई मारण्याचा मोह टाळून गुणाजींनी प्रामाणिकपणे उत्तर दिले. "प्राणसखे, ह्यावेळी सरहद्दीवर काळ्या कभिन्न पहारेक-यांऐवजी, एक सुबक साजिरी सुवर्णकुंतला गौरांगना होती. तिने मला 'आपण समवेत फल-पुष्प-जीवजंतु-धनधान्यादी ऐवज काय व किती आणला आहे?' ही पृच्छा करताच मी तिला, 'मी तीन आम्रफळे, त्याशिवाय आम्रफलखंड व आम्ररस, ह्या वस्तू सोबत आणल्या आहेत. ह्यापैकी आपणांस सर्वात जास्त रस कशात आहे?' ही प्रतीपृच्छा केली. ह्यावर अती संभ्रमित होत्साती ती सुवर्णकुंतला दिग्मूढपणे उत्तरली, 'मार्गस्थ व्हा.'. मीदेखील पडत्या फळाची आज्ञा घेऊन तत्काल तेथून प्रस्थान ठेवले." ह्या प्रदीर्घ स्पष्टीकरणाने गुणाजींची स्त्री संतुष्ट जाहली व वदली, 'कारण नसतांना संभ्रमित होणे हा ह्या सुवर्णकुंतला सुंदरींचा स्वभावधर्म असतो हे तर सर्वज्ञातच आहे! माझी ईशचरणी प्रार्थना आहे, ह्यापुढे प्रवासात आपणांस सदैव अशा सुवर्णकुंतला गौरांगिनींचीच साथ लाभो.'
अपार अचंबित आणि अपार संतुष्ट होत गुणाजी उद्गारले, 'तथास्तु प्रिये, तथास्तु!'.
ह्यानंतर प्रदीर्घ काळ, म्हणजे किमान एक सहस्त्र निमिषे, गुणाजीगृही सौख्य आणि शांती नांदत होते.

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...