मुंबईतल्या एका मित्राच्या मुलाला उतरून घ्यायला JFK ला गेलो होतो. अमित कुठच्या IT असाइनमेंटसाठी अमेरिकेत प्रथमच येत होता, इथे आमच्याकडे चार दिवस राहून मग त्याच्या कामाच्या गावाला जाईल असा बेत होता. कानाला जोडलेल्या इअरफोनच्या वायरी, पाठीवर बॅकपॅक, बरोबर एक सुटसुटीत बॅग आणि दोन्ही हात आणि डोळे व्यस्त ठेवणारा आय-फोन ह्या अवतारात सुद्धा मी त्याला ओळखला. त्याचा भारताबाहेर पहिलाच प्रवास असल्यामुळे रितीप्रमाणे रस्त्याला लागल्यावर मी नेहमीचा प्रश्न विचारला 'कशी होती फ्लाईट? ठीक झालं ना सगळं?'. आय-फोन बाजूला ठेवत तो म्हणाला 'ओ याह! जस्ट फाईन. फक्त लंडनला हॉल्ट होता तेवढाच.' मग थोडा थांबून अडखळत म्हणाला 'काका, तुम्ही पहिल्यांदा आलात ते प्लेननीच? म्हणजे, मी ऐकलंय, दोज डेज लोक स्टीमबोटनी वगैरे यायचे?' त्याने प्रश्नाची सुरुवात आजोबा शब्दाने केली नाही, ह्यातच धन्यता मानत मी म्हटलं 'हो, मीही प्लेननीच आलो होतो, ह्याच एयरपोर्टला.”
मला माझ्या पहिल्या अमेरिका प्रवासाची आठवण झाली. बैलगाडीच्या वेगानी आलं, एस. टी. सारखं थांबत (म्हणजे काय ते मला त्याला समजावून सांगायला लागलं) आलं; तरीसुद्धा आकाशात होतं म्हणून त्याला विमानच म्हणायला हवं, नाही का? माझं पॅन ऍमचं विमान मुंबईहून सुटल्यावर दिल्ली, दुबई, इस्तंबूल, फ्रँकफर्ट आणि लंडन एवढ्या शहरांत थांबल्याचं मला आठवतंय, मधलं एखादं तालुक्याचं गांव राहून गेलं असलं तर मला माफ करा हं पॅन ऍम साहेब! लंडन आणि न्यूयॉर्कच्यामध्ये जंबोजेट उतरवण्याएवढा मोठा भूखंड नाही ह्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचंही अंधुक स्मरतं.
कहाणीची सुरुवात कुठे झाली, तर प्राचीन काळी TCS ह्या आद्य कॉम्प्युटर सरदारांच्या (इन्फोसिस, सत्यम आणि इतर सगळ्यांचा जन्म अजून व्हायचा होता) जुलमी आणि मनमानी खंडणीला कंटाळून एका विदेशी वेठबिगार कंपनीने स्वतःच थेट भारतात येऊन लोकांना नोकरीसाठी घेऊन जाण्याची क्लृप्ती लढवली होती. त्यांची मुंबईच्या वृत्तपत्रात जाहिरात झळकली होती "न्यूयॉर्कमधील कॉम्प्युटर कंपनीसाठी अनुभवी प्रोग्रॅमर ॲनालिस्ट्सची तातडीने गरज". खाली पत्ता कफ परेड भागातल्या एका उच्चभ्रू नियतकालिकाचा असला, तरी चालक-मालक म्हणून टोनी आणि व्हिटो अशी शहाण्णव कुळी इटालियन नावं धारण करणारे दोन बंधू होते. शिक्कामोर्तब म्हणून आडनांव सुद्धा 'ई' कारान्त - म्हणजे शंकाच नको! निवडीच्या अंतिम फेरीसाठी ते जातीने स्वतः मुंबईला येणार असल्याचं जाहिरातीत लिहिलं होतं. ह्यांची एक गंमत म्हणजे पुढच्या चार-सहा महिन्यात ते म्हणे मुंबईत बऱ्याच वेळा येऊन गेले, तरीही संपूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस मध्ये मला ते काळे का गोरे कधीच दिसले नव्हते. फक्त ‘ते कालच परत गेले', किंवा 'फ्लाईट लेट आल्यामुळे आज ते भेटू शकणार नाहीत' अशा गूढ संशयास्पद अफवा त्यांच्या भारतीय हस्तकांकडून मला समजत. गूढ-संशयास्पदचं मला फार आश्चर्य नव्हतं, कारण माझा इटालियन व्यक्तिमत्त्वाचा सूक्ष्म आणि गाढ अभ्यास 'गॉडफादर' ह्या संदर्भग्रंथाच्या भक्कम आधारावर तयार होता. त्यामुळे फक्त त्यांना ह्याची देही बघायचं कुतूहल होतं. अखेर, ह्या बंधूंचं नखही दृष्टीस न पडताच, परिक्षांच्या सर्व - आणि कफ परेडच्या अनेक - फे-या पार पडून त्यांची जॉब ऑफर मला मिळाली.
त्या काळच्या गूगल-विरहित जगामध्ये न्यूयॉर्क अमेरिकेत नक्की कुठे येतं हेही मला माहिती नव्हतं, आणि खरंतर फारशी पर्वाही नव्हती. थोडी चलबिचल होती ही नोकरी घ्यावी का नाही ह्याबद्दल, पण शेवटी जग फिरून बघण्याच्या स्वप्नांनी आणि त्या वयातल्या दुर्दम्य आत्मविश्वासानी विजय मिळवला आणि it became an offer I couldn't refuse! कंपनी पहिला आठवडा रहायची सोय करणार हे ठरलेलं होतं. प्रश्न एकच होता, न्यूयॉर्क विमानतळाहून पुढे कुठे आणि कसं जायचं. त्या पॉश ऑफिसातली सेक्रेटरी (भारतीय साहेबांचं पहिलं नांव अजित असल्याने मी तिचं नांव मोना ठेवलं होतं) लडिवाळ इंग्रजीत उत्तरली 'डोंच्यू वरी डार्लिंग! दे विल मीट यू अँड बी कॅरिंग ए प्लॅकार्ड विथ योर नेम.' आता इतक्या सुंदर स्त्रीने डार्लिंग म्हटल्याने विद्ध जाहलेल्या मी, जेमतेम 'दे' म्हणजे नक्की कोण हे विचारायचं भान ठेवलं. ह्यावर ती बेफिकीरपणे म्हणाली 'टोनी माइट मेक इट, मेबी व्हिटो; डोन्ट वरी.' खरंतर डोक्यात संपूर्ण वीरकर आणि बराच टाइम्स ऑफ इंडिया भरून सुद्धा (किंवा त्यामुळे), प्लॅकार्ड शब्द खटकत होता - म्हणजे अमेरिकेतल्या पहिल्या पावलालाच निषेध मोर्चे? म्हटलं जाऊ दे, टोनी तरी सदेह भेटेल त्या निमित्तानी!
अमेरिकेचा व्हिसा - नोकरीसाठी - मिळवणं त्याही काळी किमान आताइतकंच कठीण होतं. कागदोपत्री मी एका छोट्या बिझनेस ट्रीप साठी जात होतो. व्हिसासाठी केव्हा जायचं, मुहूर्त, चंद्रबळ, ग्रहयुती वगैरेसंबंधीचे डावपेच आणि कारस्थानं अजितची गॅंग करत होती. मला फक्त अधून मधून मोनाचे आदेश येत 'उद्या कॉन्सुलेट मध्ये जायचं आहे, कागदपत्रं घ्यायला ये.', 'उद्याचं कॅन्सल, कधी ते नंतर कळवेन', 'पुढचे दोन महिने विचारच नको' वगैरे. प्रत्येक वेळी कॉन्सुलेटमध्ये जायच्या आदल्या दिवशी मला कंपनीच्या नावाची कागदपत्रं मिळत, प्रत्येक वेळी कंपनीचं नांव, माझ्या कामाचं स्वरूप, हुद्दा सगळं वेगळं; आणि कंपनी वेगळ्या देशातली असे. ह्या सर्वामुळे, माझ्या लेखी त्या अमेरिकेतल्या स्वप्नवत नोकरीचं रहस्य गडद होत होतं. माझा पहिला प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणाऱ्या संस्थेकडे असेल अशी माझी समजूत होती. ह्याविरुद्ध, हा सगळा निव्वळ इटालियन माफिया आणि अजितची गॅंग ह्यांचा मिळून मला अमेरिकेच्या नावाखाली लुटायचा डाव आहे असं माझ्या जवळच्या मित्रांचं ठाम मत होतं ('सिसिलीमध्ये पण एक न्यूयॉर्क आहे असं ऐकलय'). पण एकतर माझ्याइतक्या चिल्लर माणसाला लुटण्याएवढे वाईट दिवस त्यांच्यावर आले असतील हे पटेना; आणि दुसरं म्हणजे त्यांनी दिलेलं न्यूयॉर्कचं रिटर्न तिकीट खरं आहे हे मी तपासून घेतलं होतं. त्यामुळे कमीत कमी परत मुंबईला येऊ शकू असा मुत्सद्दी हिशेब होता. बाकी अर्थातच ऐन विशीतला उदंड आत्मविश्वास.
शेवटी एकदा मोनाचा संदेश आला 'ह्या आठवड्यात नक्की! ' ह्यावेळच्या पत्रात मी अमेरिकेला IBM मेनफ्रेम कॉम्प्युटर विकत घ्यायला जातो आहे असं लिहिलं होतं. नुकतीच जनता सरकारनी IBM आणि कोकाकोला सारख्या कंपन्यांवर बंदी आणली होती. तशात घरामध्ये, मी बाजारातून कोथिंबिरीची जुडी नीट निवडून आणू शकेन का ह्याबद्दल अविश्वास होता. ह्या बातमीमुळे घरात 'संगीत हास्यकल्लोळ' चा एक प्रयोग पार पडला. त्याहीपेक्षा, मला काळजी होती ती एअरपोर्टच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांची! पण मोना डार्लिंगकडे कुठच्याही प्रश्नाचं एकच उत्तर असे 'डोन्ट वरी'. ह्यावेळी तिनी मला नेहमीच्या कागदांबरोबर, एक वेगळंच जाडजूड पुडकं दिलं - 'हे टोनीला द्यायचं, तिथे पोचल्याबरोबर.'. हे एक नवीनच लचांड! त्यातल्या त्यात काळजी घेण्यासाठी, मी पुडकं चाचपून त्यात सोन्याच्या विटा नाहीत आणि वास घेऊन अंमली पदार्थ वगैरे नसावेत (त्यांचाही वास गोंदासारखाच येत असला तर पंचाईत; पण विचारणार कोणाला!) एवढी छाननी केली.
एवढ्या सगळ्या रामायणानंतर व्हिसा मात्र खूपच सहज मिळाला - गँगचा ज्योतिषी बरा असावा.
भारताबाहेर पहिलाच प्रवास, अमेरिकेत कोणीच ओळखीचं नाही (घरटी एक तरी मनुष्य अमेरिकेत असण्याचे दिवस अजून यायचे होते!), एवढ्या लांब एकटा जाणार; त्यामुळे घरी काळजीला महापूर. शेवटी शेजाऱ्यांच्या ऑफिसातल्या कोणाचा तरी काका विमान कंपनीच्या फुकट तिकिटावर काही वर्षांपूर्वी एकदा लंडनला जाऊन आल्याचं समजलं. त्याशिवाय, ह्या गृहस्थांची आतेबहीण अमेरिकेत ‘कुठेतरी’ रहात होती. एवढ्या भांडवलावर आमच्या ओळखीत त्यांना परदेश प्रवासावर पीएचडी देता आली असती. घरी चहापान चालू असतांना काकांनी डोळे मिचकावत सांगितलं 'अमेरिकेत चहा नाही, बरं का!'. कुठल्याही जातिवंत भारतीयाप्रमाणे मलाही तेव्हा चहा प्रिय होता. ताबडतोब आईच्या तीन लक्ष काळज्यांमध्ये आणखी एकीची भर पडली - कसं होणार बिचाऱ्याचं! तसं काका 'अमेरिकेत भारतीय पदार्थ मिळणार नाहीत हं, इथे काय ते खाऊन घे' असंही म्हणाले - पण स्वैपाकासंबंधी माझं 'गॅस पेटवता येणे' ह्यापलिकडचं अज्ञान पहाता, तिथे मिळेल तेच खायला हवं असं ठरलं. काकांनी आणखी एक सूचना केली 'तिकडे परदेशात कायम सूट आणि टाय हवा, बरं का? अगदी कोपऱ्यावर सिगारेट आणायला गेलात तरी, सूट पाहिजेच. नाहीतर चक्क हसतात लोक!' सिगारेट ओढत नसलो तरीही त्यांचा भावार्थ कळल्यामुळे, मुंबईच्या उकाड्यात ह्या सूचनेनीच घाम फुटला मला. तिकडे अजित आणि मोनानी सुद्धा ऑफिसमध्ये सूट आणि टाय घालण्याची महती गायली होतीच. त्यांच्या आग्रहाखातर एक पिन-स्ट्राइप ग्रे सूट शिवून तयार होता. मुंबईच्या लेटेस्ट फॅशनप्रमाणे शिवलेला इंद्रधनुषी रंगांचा (मळखाऊ पण!) मद्रास चेक्सचा शर्ट प्रवासात घालायचा माझा बेत ठरलेला होता. आयत्या वेळी हे सुटाचं निघाल्यावर, नेहमीच्या पॅन्टऐवजी त्या शर्टावरच सुटाचा पॅन्ट-कोट घालायचं ठरवलं - कारण प्रत्येक वेळी विमानतळावर उतरलं की परदेशी माणसं असणारच ना, त्यांनी हसायला नको म्हणून. वरती, तज्ज्ञांचा स्ट्राईप्ड टायचा आग्रह असल्यामुळे घरातला एक जुना बाटीक प्रिंटचा रेघा-रेघांचा टाय. प्रत्यक्षात मी बघितलं, फ्रँकफर्ट आणि लंडन सारख्या विलायती ठिकाणी सुद्धा माझ्या सहप्रवाशांपैकी कित्येक लोक कोट सुद्धा न घालता उतरत होते. विमानतळावर बरेच लोक कौतुकाने माझ्याकडे बघताहेत मला जाणवलं. ते कौतुक माझ्या फॅशन सेन्सचं नसून, माझ्या रंगसंगतीच्या धाडसाचं होतं हे काही वर्षांनी लक्षात आलं.
नव्या नवलाईच्या पहिल्या फॉरेनच्या फ्लाईटमध्ये मजा होती. विमान कंपन्या आतासारख्या कद्रू नसल्यामुळे माझ्यासाख्या हाडकुळ्या (तेव्हाची गोष्ट आहे ही, ठेवा थोडा विश्वास) लोकांना भरपूर खायला-प्यायला देऊन, चांगलं गलेलठ्ठ धष्टपुष्ट करूनच विमानाबाहेर सोडायची वैयक्तिक जबाबदारी असल्यासारख्या वागत - मान वर उचलली की हातात ट्रे घेतलेली सुंदरी हजर! म्हणून मी बराच वेळ झोपूनच काढला. विमानातले मंतरलेले क्षण भुर्र्कन उडून गेले. फक्त, एका गोऱ्या शेजाऱ्याने मी मुंबईला चढलो हे कळल्यावर 'तिथे रस्ते आणि उंच बिल्डिंगी असतात का' हा प्रश्न विचारल्याचं आठवतं. त्यावर चिडून, 'नाही, जंगलांमध्येच आमच्या बैठ्या झोपड्या असतात. मात्र जिराफांची झुंड हल्ला करून आली, की आम्हाला गुहेत जाऊन लपावं लागतं' हे खरमरीत उत्तर सुचून सुद्धा, योग्य इंग्रजी शब्दांची जुळवाजुळव करण्यात वेळ गेल्याने देऊ शकलो नव्हतो. आता शब्द तयार आहेत, तो गोराच परत भेटायची वाट बघतो आहे.
दुनियेची बरीच सैर करून झाल्यावर ते पॅन ऍमचं विमान एकदाचं न्यूयॉर्कला उतरलं. तिथे रात्रीचे दहा वाजून गेले होते. इमिग्रेशन ऑफिसर कदाचित झोपेला आला असेल, त्याने फारसे प्रश्न न विचारता मला सहा महिने राहण्याचा परवाना दिला! आता विचार करता सर्वात मोठा सुखद आश्चर्याचा धक्का वाटतो म्हणजे एवढ्या सगळ्या एअरपोर्ट्सवर हरवायची संधी मिळून सुद्धा, एखाद्या लोचट मांजरासारखी, माझी ट्रंक इथवर पोचली होती. प्रवाशांच्या बॅगा हरवणं हा विमान कंपन्यांचा, विमानं उडवण्याच्या कंटाळवाण्या कामातला लाडका विरंगुळा आहे ह्याची तेव्हा जाणीव नव्हती. माझी सगळी जंगम मालमत्ता त्या एका ट्रंकमध्येच भरलेली होती; त्यामुळे ती हरवली असती तर अनवस्था प्रसंग होता. सगळ्या कचाट्यांमधून सुखरूप सुटून अरायवल लाउंजमध्ये बाहेर आल्यावर एकदाचं ते प्लॅकार्डचं कोडं उलगडलं - प्रवाशांची नावं लिहून घेतलेले मोठाले कार्डबोर्ड हातात धरून त्यांना आणायला आलेले लोक उभे होते. ही पद्धत मी प्रथमच पहात होतो. अशा पाट्या घेतलेल्या असंख्य लोकांच्या गर्दीतून माझं नांव शोधणं कठीण गेलं. एक कारण म्हणजे, माझ्या साध्या सोप्या नावाचं केलेलं 'Miland Josh' हे बारसं नवीन होतं. कडक सूट-बूट-टाय मधला तो माणूस बघितल्यावर, आता फक्त हा टोनी, का हा व्हिटो एवढाच प्रश्न उरला होता. मी जवळ जाऊन स्वतःची ओळख करून दिली, त्याने लगेच बॅग उचलून घेण्याचं औदार्य दाखवलं. कंपनीच्या मालकाला कशी बॅग घ्यायला लावायची, म्हणून मी नको म्हटलं. मी 'हॅलो टोनी' असा खडा टाकला, पण टोनीनी पार दुर्लक्ष केलं. काही वेळानी मी 'हॅलो व्हिटो' असं म्हणून बघितलं, तर त्यानी माझ्याकडे एक कटाक्ष टाकून घशातून 'घ्रुम्म' असा काहीतरी आवाज काढला. परदेशी लोक आपल्यासारखे बोलघेवडे नसतात हे ऐकलं होतं, पण हे साहेब उत्तरादाखल एक पूर्ण शब्द उच्चारण्याचीही तसदी घेत नव्हते. 'चला, हे व्हिटो साहेब तर! जाऊ दे; स्वतःच्या विचारांत गर्क आहेत, आत्ताच नको ह्यांना सतावायला' असं म्हणून मीही गप्पच बसलो. तो सहाफुटी महामानव ताडताड चालला होता, त्याच्या मागून माझी अवजड ट्रंक फरफटत मी. आंतरराष्ट्रीय विमानतळ एवढे मोठे असतात ह्याची पहिलीच प्रचिती होती ती. शेवटी एकदाची त्यांची लांबलचक काळी कुळकुळीत गाडी दिसली - अबबबब, हिला गाडी कसं म्हणायचं! बस ला जर गाडीची आई म्हणत असले, तर ही निदान धाकटी मावशी तरी होतीच! व्हिटो साहेबांनी माझी टरंक लीलया उचलून गाडीच्या मागच्या मैलोन्मैल खोल कप्प्यात ठेवून दिली, आणि माझ्यासाठी मागचं दार उघडून उभे राहिले. 'किती नम्र आणि सुसंस्कृत माणूस! माफियाचा असला, अशी गाडी ठेवण्याएवढा गडगंज अमीर असला तरी माणुसकी आहे हो ह्याला' हे सगळं माझ्या डोक्यात तरळून गेलं. मात्र मोनानी दिलेलं पुडकं मी विसरलो नव्हतो, ते सुपूर्त करायची हीच वेळ असं म्हणून मी गाडीत बसण्यापूर्वी ते व्हिटो साहेबांच्या हातात दिलं, अजित-मोना कंपनीने त्यांच्यासाठी पाठवलंय हे सांगितलं. व्हिटो साहेबांचा चेहरा त्रासिक वाटला, ते त्याला हात लावायला संकोच करत होते, पण मी अगदी आग्रहाने त्यांना ते घ्यायलाच लावलं. शेवटी त्यांनी ते घेतलं. आम्ही गाडीत बसलो. ती आतून बघून तर माझ्या आश्चर्याला पारावरच उरला नाही.
झोपता येईल एवढ्या मोठ्या, मऊ-मऊ लेदर सीट्स, मंद दिवे, आजूबाजूला लाल मखमाली व्हेल्वेट आणि... त्या मंद उजेडात डोळे फाडफाडून बघितलं - एका ट्रेवर चक्क दोन सुंदर ग्लासं! मी थोडा सावरतो आहे, तेवढ्यातच मनकवड्या साहेबांचा आवाज आला 'पाणी छोट्या फ्रीज मध्ये आहे'! थँक्यू म्हणायच्या आत, त्यांच्या आणि माझ्या मधली कांच खाली सरकून बंद झाली, आणि गाडी सुरु झाली. आतमध्ये असं ऐश्वर्य, तर बाहेर 'नवलाख विजेचे दीप तळपती येथ, उतरली तारकादळे जणू नगरात' असा झगझगाट! भारताच्या तुलनेत इथली प्रत्येक गोष्टच - एअरपोर्ट काय, रस्ते काय, सबंध आसमंतच राक्षसी अगडबंब वाटत होता. ठाईठाई दिसत असलेल्या समृद्धी आणि संपन्नतेच्या खुणा, नुकत्याच भारतीय मध्यमवर्गातून आलेल्या अननुभवी डोळ्यांना दिपवून टाकत होत्या. झोप उडालेलीच होती, सताड उघड्या डोळ्यांनी सगळं नजरेत भरून घेत होतो. मात्र सभोवार सगळं निर्मनुष्य आणि चिडीचूप शांत असल्याने जास्त एकाकी वाटत होतं. आता ह्या अवाढव्य आणि परक्या देशात आपण एकटे आहोत ही जाणीव पहिल्यांदा तीव्रतेनी झाली. मुंबईला निरोप देतांना झालेला आई-वडील, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी सगळ्यांच्या मायेचा आणि कौतुकाचा वर्षाव ‘स्मरतो आणिक करतो व्याकुळ' चा प्रत्यय आला. मी गुंगून गेलो होतो.
व्हिटो साहेबांच्या आवाजाने दचकून भानावर आलो. ते वॉकी-टॉकी वर बोलत होते - हा जिन्नस आतापर्यंत फक्त पोलीस किंवा स्मगलर लोक वापरतांना सिनेमात पाहिलं होतं.
'पिक्ड अप द पार्टी'!
माझा - एकट्याचा - अजूनपर्यंत पार्टी असा कधी उल्लेख झाला नव्हता. ग्लासं असली, तरी आल्या-आल्या ही कसली पार्टी, नुसतं पाणीच तर आहे ना? मी पार चक्रावून गेलो. तेवढ्यात व्हिटो साहेब दबलेल्या आवाजात म्हणाले 'गॉट ए पॅकेज'; मग मात्र मी जीवाचा कान करून संभाषणाची इकडची बाजू ऐकायला लागलो - भाषांतरासाठी चटकन 'गॉडफादर' चा चष्मा नाकावर चढला.
...
'नो आयडिया!'
...
'ही डझन्ट सीम टू स्पीक इंग्लिश' (हां! ओ साहेब, हे मात्र फार झालं हां! तुमच्या 'घ्रुम्म' ला मी ठेवली का काही नावं? एकदा नीट इंटरव्यू तर घेऊन बघा!)
...
'व्हॉट चेंज ऑफ प्लॅन?' (माझा जीव कुठच्याही क्षणी कानाबाहेर पडणार होता!)
...
'बेल्व्हील, न्यू जर्सी?' (अरे देवा! त्या सनीला मारायला न्यू जर्सीतच घेऊन जातात ना?)
…
'ओके!'
ओके काय! मी मागून न्यूयॉर्क, न्यूयॉर्क असं ओरडत होतो, पण व्हिटो साहेबांनी नुसतंच हात उंचावून एकदा 'येस' म्हणून मला गप्प रहायची सूचना केली. आणखी थोडा वेळ वॉकी-टॉकीवर ते काहीतरी अगम्य बडबडले आणि तेही बंद झालं. त्या गाडीच्या ऐश्वर्यसंपन्न बंदिस्त डब्यामध्ये मी मनातल्या मनात रामराम पुटपुटत होतो. मोठ्याने ओरडलो तरी होतं कोण त्या निर्जन रस्त्यांवर! हायवे संपला आणि गाडी काळोख्या लहान लहान रस्त्यांवरून वळणं घेत एका खेडेगावात शिरली. आणखी काही मिनिटांनी एका प्रचंड बंगल्यासमोर येऊन उभी राहिली. मग घरात एक दिवा लागला – आता लुका ब्रासी बाहेर येणार म्हणून मी अंगाचं मुटकुळं करून बसलो.
घराबाहेर येणारा मनुष्य तसा लहानखुराच होता, त्याच्याकडे बंदूक वगैरे नसली तर निःशस्त्र लढाईत मी त्याला हरवू शकेन अशी आशा ठेवायला जागा होती. व्हिटो साहेब उतरून त्याला भेटायला गेले, हातात ते रहस्यमय पॅकेज! मग दोघे काहीतरी बोलले आणि आमच्या गाडीकडे आले. दार कधी उघडलं मला नक्की कळलं नाही, कारण मी शस्त्र म्हणून काय वापरता येईल ह्याच्या शोधात होतो. तेवढ्यात हाक ऐकू आली 'मिलँ s ड?'. माणूस निदान हसतमुख होता. मी 'दक्ष' अवस्थेत बाहेर आलो, हस्तांदोलन झालं. 'हाय, आय एम ज्यो! वेलकम टू युएसए!' बऱ्याच वेळानी पहिला श्वास घेतल्यामुळे माझ्या तोंडून शब्द उमटायला थोडा वेळ लागला. एव्हाना व्हिटो साहेबांनी माझी बॅग बाहेर काढून ठेवली होती. मी काही बोलायच्या आतच ज्यो त्यांना म्हणाला 'थँक्स रॉजर!' ऑं! अरेच्चा, म्हणजे हा माणूस टोनी पण नाही आणि व्हिटो पण नाही?
ज्योनी मला समजावून सांगितलं, की महत्वाच्या कामासाठी टोनीला आयत्या वेळी मुंबईला जायला लागलं. (ह्या लपाछपीची एव्हांना सवय झाली होती). तो मला उतरवून घ्यायला येऊ शकला नाही ह्याचं त्याला अतिशय दुःख आहे, त्याने त्याबद्दल माफी मागितली आहे. म्हणून त्याने ही स्ट्रेच लिमो (आ: हां, मावशीबाईंचं नांव असं आहे तर!) माझ्यासाठी पाठवली होती. व्हिटो तर गेले काही महिने ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे, तिथला व्यवसाय पाहण्यासाठी. ज्यो माझ्याच कंपनीत काम करतो, तो मला आता त्याच्या गाडीने हॉटेलात घेऊन जाणार आहे. एवढ्या अदबशीर आणि प्रेमळ शब्दांनंतर माझ्या जीवानी भांड्याचा तळ गाठला होता. देश परका असला, तरी लोक वाईटच असतात असं नाही! एका अनोळखी देशात, परक्या संस्कृतीत सुद्धा नुसत्या हसऱ्या चेहऱ्याने, स्वागतपर चार गोड शब्दांनी सुद्धा दोन माणसातलं अंतर कसं निमिषार्धात अदृष्य होऊ शकतं; सभोवतालच्या ऐश्वर्य आणि समृद्धीचं संकोचून टाकणारं ओझं कसं पिसासारखं हलकं करता येतं - ह्याचा उत्कृष्ट अनुभव होता तो. आणि हो, ते पॅकेज? माझ्यानंतर येणाऱ्या पुढच्या उमेदवाराचे कागदपत्र सही करण्यासाठी पाठवले होते, मी येतच होतो म्हणून!

कॉन्ट्रॅक्टप्रमाणे मी त्या कंपनीत काम केलं, नंतर अनेक नोकऱ्या बदलल्या - पण टोनी आणि व्हिटोसाहेब मात्र कधीच भेटले नाही!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...