आकारमानाच्या
हिशेबाने टेक्सास हे अमेरिकेतलं दुसऱ्या
क्रमांकाचं राज्य –
अलास्काच्या पाठोपाठ!
सलग ४८ राज्यांपैकी तर
ते प्रथम क्रमांकाचंच!
जवळजवळ सात लाख स्क्वेअर किमी क्षेत्रफळाचं हे राज्य जगातल्या
कित्येक देशांपेक्षा मोठं आहे.
खरं तर तो स्वतःच
मुळी एक स्वतंत्र देश
होता –
मेक्सिकोशी भांडून वेगळा झालेला,
आणि नंतर अमेरिकेत राज्य म्हणून विलीन झालेला.
पूर्वी टेक्सास टुरिझमची '
इट इज अ
कंट्री!'
अशी जाहिरात मी बघितली होती.
तेव्हा मला ती अतिशयोक्ती वाटली
होती. मात्र नंतर जेव्हा
टेक्सासमधली डॅलस, ऑस्टिन,
वेको, सॅन अँटोनियो वगैरे गावं ड्रायविंग करून फिरून पाहिली, तेव्हा हे राज्य खरंच
किती राक्षसी अवाढव्य मोठं आहे ह्याची जाणीव झाली होती.
चारचारशे मैल ड्राइव्ह करूनही जेव्हा आपण त्याच राज्यामध्ये इकडून तिकडे थोडंसंच हललेले असतो,
तेव्हा समजतं हे केवढं मोठं राज्य आहे.
अमेरिकन इंग्रजीत '
प्रचंड मोठं'
ह्या अर्थाने '
टेक्सास-
साईझ'
हे विशेषण वापरतात.
अर्थातच
टेक्सासमधलं सगळंच '
टेक्सास-
साईझ'
असतं हे सांगायलाच नको.
ह्या भेटीमध्ये ह्यूस्टनचं मेडिकल सेंटर पहायची संधी लाभली.
त्याची नुसती आकडेवारी सुद्धा केवळ थक्क करणारी आहे.
पाच कोटी स्क्वेअर फुटांची व्याप्ती असलेल्या ह्या जगातल्या सर्वात मोठ्या मेडिकल सेंटरमध्ये २१ वेगवेगळी हॉस्पिटल्स
आहेत.
त्यातही,
हार्ट,
कॅन्सर आणि लहान मुलांचं हॉस्पिटल ही अमेरिकेतल्या सर्वोच्च
हॉस्पिटल्समध्ये गणली जाणारी!
दरवर्षी
इथे तपासणी अथवा उपचारांसाठी एक कोटी रुग्ण
दाखल होतात,
आणि पावणेदोन लाखांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या जातात.
अशा ह्या मेडिकल सेंटरची टूर आणि तपशीलवार
माहिती तिथे रेसिडेंट असलेल्या डॉ. मिहीर जोशींनी अतिशय कौतुकाने आणि अभिमानाने आईबाबांना
दिली – तो एक वेगळाच आनंद!
 |
| Texas Medical Center |
 |
| Texas Medical Center |
ह्यूस्टनमध्ये
पाहण्यासारखी दुसरी गोष्ट अर्थातच जॉन्सन स्पेस सेंटर.
अपॉलो-
१३ मुळे ('
ह्यूस्टन,
वी हॅव अ प्रॉब्लेम!')
प्रसिद्धी
मिळालेल्या ह्या केंद्रामधून अमेरिकेच्या सर्व अवकाशयानांचे नियंत्रण केले जाते.
ती सुप्रसिद्ध '
मिशन
कंट्रोल रूम'
पाहता येते.
सध्या तिथे आगामी मंगळ प्रवासाची तयारी सुरु असल्याने,
आम्हाला फक्त त्याची स्टँडबाय रूम पाहता आली. मुख्य मिशन कंट्रोलमध्ये काहीही अडचण आल्यास सर्व स्टाफ ह्या खोलीचा एक क्षणही न गमावता, विनाव्यत्यय
वापर करू शकतो.
ह्या सेंटरमधील बाकीचं स्पेस म्युझिअम अर्थातच वॉशिंग्टनच्या एअर अँड स्पेस,
किंवा फ्लॉरिडातल्या केनेडी स्पेस सेंटरच्याच बरोबरीचं आहे.
 |
Johnson Space Center
|
 |
| Mission Control Room - JSC |
डॅलसला
बृहन महाराष्ट्र मंडळाच्या द्विवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने ही ट्रीप घडत
होती.
अधिवेशन सुंदरच पार पडले –
डॅलससारख्या शहरात किती मराठी कुटुंबे असतील आणि संमेलन कसे असेल ह्याबद्दल थोडे कुतूहल आणि थोडी साशंकता होती.
पण मी पाहिलेल्या
काही संमेलनांमध्ये,
ह्याचा क्रमांक बराच वर लागेल.
उत्कृष्ट
जेवणे,
अतिशय दक्ष स्वयंसेवक कार्यकर्ते,
बहुतांशी चोख वक्तशीर कारभार आणि व्यवस्था –
आणि ३,
९०० पेक्षा
जास्त संख्येची बृहन्महाराष्ट्रीय
उपस्थिती –
ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी! (
ती नाटकाच्या थिएटरमधली
ध्वनियंत्रणा तेवढी जरा नीट चालली असती तर?...)
के बेली हचिन्सन
कन्व्हेन्शन सेंटर मात्र '
टेक्सास-
साईझ'
असल्याने एका कार्यक्रमाहून दुसऱ्याला जायचं,
तर हॉल शोधून
काढून तिथपर्यंत पोचायलाच दहा मिनिटे जात;
त्यात पुन्हा एकामागोमाग एक,
किंवा एकाच वेळी अनेक अशा अनंत आवडीच्या कार्यक्रमांची रेलचेल,
त्यामुळे काही कार्यक्रम पाहायचे असूनही निसटले.
प्रा.
अरुणा ढेरे ह्यांचं अध्यक्षीय भाषण आणि देवकी पंडित आणि विजय कोपरकर ह्यांचा '
स्वरनक्षत्र'
हा उपशास्त्रीय आणि
नाट्यसंगीताचा कार्यक्रम हे महाराष्ट्रातून आलेले
दोन अप्रतिम कार्यक्रम.
देवकी पंडितांचे गाणे मी ह्यापूर्वी फार
ऐकले नव्हते,
त्या अविस्मरणीय सुंदर गायल्या!
आणखी एक खास उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे,
डॅलसच्याच स्थानिक कलाकारांनी सादर केलेला '
ओपनिंग सेरेमनी' –
ह्या दीड दोन तासाच्या हलक्याफुलक्या रेव्ह्यू टाईप कार्यक्रमाचं लिखाण,
अभिनय,
गायन आणि नृत्य सगळंच कौतुकास्पद!
खरं तर,
ह्या ओपनिंग सेरेमनीजचा एक साचा ठरून
गेलेला असतो –
मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान,
त्याच्या आठवणी,
नॉस्टॅलजिया आणि अमेरिकेतील मॉडर्न,
धावपळीचा दैनंदिन जीवनक्रम ह्या दोन दगडांवर पाय ठेवीत चालणे हा ठरलेला विषय!
पण,
डॅलसच्या मंडळींनी खूप छान चिमटे काढत,
आपलीच थट्टा करत तो अतिशय रंजक
केला.
अमेरिकेतील नॅशनल पार्क्स हा माझ्या खास जिव्हाळ्याचा विषय! ह्या प्रेमापोटी मी त्यातली बरीचशी प्रसिद्ध पार्क्स बघितली आहेत. एवढ्या मोठ्या टेक्सासमध्ये मात्र फक्त दोनच नॅशनल पार्क्स आहेत, 'बिग बेंड' हे त्यापैकी एक. ह्या अवाढव्य राज्याच्या नैऋत्य (मराठीमध्ये, साऊथवेस्ट) टोकाला ते आहे. ‘जवळपास’ (३०० मैल) म्हणावं असं फक्त एल पासो हे सरहद्दीवरचं छोटंसं शहर. नकाशामध्ये सुद्धा ह्याच्या जुळ्या शहराचा, मेक्सिकोमधल्या वारेझ (Juarez) गावाचाच उल्लेख जास्त ठळक असतो! अशा ह्या पार्कच्या अत्यंत आडनिड्या लोकेशनमुळे इथे जायचा कधी योग आला नव्हता, आणि येईल असं वाटलंही नव्हतं! ह्यावेळी टेक्सास ट्रीपमध्ये हे बघायचंच असा निश्चय केला. पण डॅलस ते बिग बेंड हे सव्वापाचशे मैलाचं अंतर ड्राइव्ह करण्यापेक्षा एल पासोपर्यंत विमानाने आलो. इथून न्यू मेक्सिकोमधील काही स्थळेही बघून होतील हा बेत होता. (एरवीही ह्या पश्चिम टेक्सास भागामध्ये ओसाड वाळवंट आणि तेलाच्या खाणी ह्यापलीकडे फार काही नाहीय.)
 |
| Western Texas - From the airplane |
सर्वप्रथम
पाहिलं ते न्यू मेक्सिको
मधील व्हाईट सँड्स वाळवंट!
इथे अमेरिका द ब्युटीफूल पेक्षा
'
अमेरिका द डायव्हर्स'
चा
साक्षात्कार जास्त होतो.
तसा टेक्सास –
न्यू मेक्सिकोचा हा सगळाच भाग
मुळात अतिशय रुक्ष आणि रखरखीत!
पण त्यामध्ये पसरलेलं
हे सुमारे २२५ स्क्वेअर मैलांचं,
पांढऱ्या शुभ्र वाळूचं वाळवंट एक अजबच!
कोट्यवधी
वर्षांपूर्वी ह्या सर्व भागात एक समुद्र होता,
तो कधीच नाहीसा झाला,
पण मागे हे
जिप्समचे प्रचंड डोंगर आणि वाळवंट ठेऊन गेला.
सुरुवातीला थोडी खुरटी का होईना वनस्पती
दिसते,
पण लवकरच तीही
दिसेनाशी होते,
आणि नजर ठरेल तिथपर्यंत फक्त प्रखर सूर्यप्रकाशात डोळ्यासमोर अंधारी आणणारी निर्मम पांढरीधोप वाळू असते.
खरं तर जून-
जुलै
ही मुळी ह्या प्रदेशात जाण्याची वेळच नव्हे.
१०५ फॅरेनहाईट (
४० सेंटीग्रेड) किंवा
अधिक तापमानात,
उत्तरेतल्या थंडीची सवय झालेल्या न्यू जर्सीच्या माणसांनी फिरायला जाणं हेच धाडसी!
तरीही,
संपूर्ण निरभ्र आकाशात सूर्य माथ्यावर तळपत असतांना, जीएंच्या मुशाफिराच्या चिकाटीने, ह्या वाळवंटामध्ये चालण्याचा मी वीसेक मिनिटे अनुभव
घेतला.
नजरेच्या आवाक्यामध्ये क्षितिजापर्यंत विखुरलेल्या काही खुरट्या शुष्क झुडुपांशिवाय जीवसृष्टीची एकही निशाणी नाही. फक्त सूर्य,
दिशाहीन अथांग वाळू आणि आपण, एवढे तिघंच असतो;
तो एक वेगळाच
युनीक अनुभव आहे.
पण डोक्याला टोपी
आणि डोळ्याला गॉगल असूनही जेव्हा पांढऱ्या भगभगीत उजेडामध्ये फोनवरचे
आकडेही दिसणं अशक्य झालं,
तेव्हा भान राखून वेळीच गाडीकडे परतलो.
तरी बरं,
अमेरिकन सुखसोयींनुसार वेळोवेळी परतीच्या
मार्गाच्या लहानशा पाट्या होत्या;
एरवी सगळ्या दिशांनी सारखंच दिसणाऱ्या ह्या अजस्त्र वाळवंटामध्ये हरवून जाणं अगदी सहज शक्य आहे.
 |
| White Sands National Monument |
 |
| वाळवंटातील गलबत - 'पिकनिक' स्पॉट्स |
 |
| White Sands National Monument |
 |
| White Sands National Monument |
हा सबंध भाग एवढा रुक्ष आणि निर्जन आहे, की अमेरिकेचं मिसाईल टेस्ट सेंटर सुद्धा इथेच आहे. त्यासंबंधीचं म्युझिअमही इथे आहे, पण ते बघण्याऐवजी आम्ही जवळचा आणखी एक नैसर्गिक चमत्कार पाहायला – थोडी वाकडी वाट करून – जायचं ठरवलं होतं. थोडी वाकडी म्हणजे ३५० मैल राउंड ट्रीप वाकडी! सुदैवाने मला ड्राईव्हिंगची जबरदस्त हौस – वेड म्हणा हवं तर – आहे.
न्यू मेक्सिकोमधील कार्ल्सबॅडच्या कोट्यावधी वर्ष जुन्या गुहा अतिशय प्रसिद्ध आहेत; हेही एक नॅशनल पार्कच आहे.
ते संपूर्ण बघायला
आम्हाला पुरेसा वेळ नव्हता.
पण रोज सकाळसंध्याकाळ तिथे दिसणारा
एक चमत्कार मात्र ह्या संध्याकाळी बघायचाच असं ठरवलं होतं.
ह्या गुहांमध्ये सुमारे चार लाख वटवाघळं आहेत.
दररोज सूर्यास्ताबरोबर त्यापैकी हजारो लहानमोठी वटवाघळं थव्याने ह्या गुहांमधून शेजारच्या विस्तीर्ण पसरलेल्या अरण्यात भक्ष शोधण्यासाठी बाहेर पडतात.
आकाशाचा एक हिस्सा पूर्णपणे काळवंडून
टाकणारं ते एक अत्यंत
विलक्षण दृष्य! हीच वटवाघळं सूर्योदयाबरोबर पुन्हा त्यांच्या गुहांमधल्या घरट्यांमध्ये परततात –
तशीच हजारोच्या संख्येने!
त्यांचे थवे विचलीत होऊ नये म्हणून प्रेक्षकांनी निःशब्द शांतता –
कुजबुज सुद्धा नाही –
पाळायची असते,
फोटोग्राफीला सक्त मनाई आहे –
फ्लॅशच्या उजेडासाठी आणि साध्या '
क्लिक'
च्या आवाजासाठी सुद्धा;
श्वास घ्यायला जेमतेम परवानगी असते म्हणा!
नजरेच्या विस्तीर्ण आवाक्यात फक्त जंगल,
डोंगर आणि मावळतीचा धूसर प्रकाश.
आमच्यासारखे पाच-
पन्नास निसर्गवेडे सोडले तर क्षितिजापर्यंत कोठेही
मानवी संस्कृतीची काही निशाणी नाही.
सूर्य मावळल्यावर एकाएकी झपाट्याने वाढत जाणारा काळोख,
आणि त्या अंधारात,
मागच्या काळ्या पडणाऱ्या आकाशात बघताबघता मिसळून अदृश्य होणारे ते वटवाघळांचे थवे!
हे निःशब्द चित्र मनावर आता कायमचं कोरलं गेलं आहे.
ते
थवे पार दिसेनासे होईपर्यंत आम्ही
ते दृष्य बघत थांबलो होतो.
सूर्यास्तच मुळी नऊच्या सुमारास होत असल्याने निघायला जवळजवळ दहा.
आता सभोवताल चोहीकडे फक्त निर्जन घनदाट जंगल आणि डोळ्यात बोट घालूनही काही दिसणार नाही असा मिट्ट काळोख!
ह्या परिसरात रेस्टॉरंट वगैरे शोधण्याचा आणि मिळण्याचा
काही प्रश्नच नव्हता.
त्यामुळे बी एम एमच्या
सौजन्याने मिळालेल्या लाडू चिवड्याचे पार्टींग गिफ्ट बॉक्स उघडण्याची
ही उत्तम संधी होती. आमचं पुढचं
हॉटेल होतं तीनशे मैलांवर.
जीपीएस जरी पाच तासाचा अंदाज देत असलं,
तरीही बऱ्याच भागात ८० मैलाचं स्पीड
लिमीट असल्याने ते कमी वेळात
पार पाडू मला खात्री होती.
रस्त्यामध्ये दोन-
तीन गावं लागली ती सोडली, तर संपूर्ण रस्त्यावर
बहुतांश वेळ आमची एकुलती एक गाडी –
आणि
तिच्या दिव्यांचा काय तो उजेड.
नाही
म्हणायला,
पौर्णिमेची रात्र होती;
त्यामुळे रस्ताभर पूर्णचंद्राची सुंदर साथ होती.
अशा एकाकी ड्रायव्हिंगमध्ये माझं हिंदी गाण्यांचं वेड मला नेहमीच साथ देतं.
स्वतःशीच गाण्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भेंड्या –
म्हणजे एकाच संगीतकाराची,
एकाच कवीची,
एकाच शब्दावर आधारित –
गाणी शोधून, आठवून म्हणण्यात वेळ खूप छान आणि पटकन जातो. कित्येक जुनी विसरायला झालेली गाणी अचानक आठवतात.
ह्या जंगलातल्या रस्त्यावर आणखी एक फायदा जाणवला,
तो म्हणजे माझ्या गायकीमुळे त्रस्त किंवा भयग्रस्त झालेली जंगली श्वापदं,
आणि कदाचित भूतखेतसमंधादी कोणी असलीच तर तीही,
सबंध
राज्य सोडून देऊन इतरत्र स्थलांतर करत असावीत.
एरवी बिग बेन्डमध्ये पुढचे दोन दिवस एकही मोठं श्वापद आमच्या नजरेस पडलं नाही ह्याचं काय कारण असणार!
आणि हॉटेलजवळच्या घोस्ट टाऊनमध्ये सुद्धा गिफ्ट शॉप चालवणारी माणसंच (दिसत तरी माणसासारखीच होती!)
होती फक्त.
पार्क रेंजर म्हणाला,
की उन्हाळ्यामध्ये शहाणे प्राणी (!)
फक्त पहाटे किंवा काळोख पडल्यावरच बाहेर येतात;
पण अंदरकी बात
मला माहिती होती.
ह्याला अपवाद फक्त (
बहुतेक कार्ल्सबॅडच्या)
वटवाघळांचा –
कदाचित इतर श्वापदांकडून आम्हाला घाबरवण्याची सुपारी घेऊन ती शब्दवेधी जनावरं
आमच्या गाडीच्या फार जवळ येऊन हूल देण्याचे
प्रयत्न करत होती.
काही वेळाने त्यांनीही ह्या हाराकिरीमध्ये हार मानली आणि कान बंद करून घेतले.
अशा रीतीने संपूर्ण रानावनाचा थरकाप उडवून आम्ही पहाटे दोननंतर हॉटेलात पोचलो.
 |
| चाँद और मैं और तू |
८
लाख एकरचं हे बिग बेंड नॅशनल पार्क,
मी पाहिलेल्या डेनाली
(
६० लाख एकर)
किंवा यलोस्टोन (
२२ लाख एकर)
सारख्या
पार्क्सच्या तुलनेत लहान आहे.
पण,
पार्कच्याही पलीकडे पसरलेलं शेकडो
मैल जंगल,
डोंगर आणि ओसाड रखरखाट ह्यामुळे ते नजरेला जास्तच
मोठं वाटतं.
अमेरिका आणि मेक्सिको ह्या देशांच्या हद्दीवर असलेली रिओ ग्रँडे (
शब्दशः महानदी)
नदी,
ह्या पार्कमधून जातांना एकदम कमरेत लचकते –
म्हणून त्याचं नांव बिग बेंड!
ह्या पार्कचा विस्तार सरहद्दीपलीकडे मेक्सिकोमध्येही आहे,
तिथेही सॅन्टा एलेना मेक्सिकन नॅशनल पार्क आहे.
एक महानदी,
चीहूवावन
वाळवंटी ओसाड प्रदेश आणि चिसोज डोंगर अशा वैविध्यपूर्ण निसर्गाने नटलेला हा प्रदेश आहे.
ह्या भागात नजरेला फार मोठ्या न भासणाऱ्या ह्या
रिओ ग्रॅण्डेने मात्र येथील दोनतीन हजार फूट उंच डोंगरांना दोन ठिकाणी चिरून वाट काढली आहे.
येथील वनस्पतींची आणि जीवसृष्टीची विविधता अतिशय लक्षणीय.
जिथे किंचितही शक्य आहे तिथे,
कमीत कमी पाण्यावर सुद्धा जीवसृष्टी कशी तग धरू शकते,
स्वतःचं संरक्षण करते,
जोमाने फुलायला पहाते हे बघणं अतिशय
मनोरंजक!
पावसाची महिने महिने,
क्वचित वर्ष सुद्धा वाट पाहून मगच बिया रुजू देणारी,
फुलणारी झाडंही इथे पाहिली.
लाखो वर्षांपूर्वी ह्या भागात डायनॅसोर वावरत होते.
त्यांचे अनेक अवशेष इथे सापडलेले आहेत.
डायनॅसोरची प्रत्यक्ष इथे सापडलेली हाडं,
किंवा त्यांचे काही पुनर्रचित सांगाडे इथे पाहायला मिळाले.
तसे डायनॅसोर सांगाडे अमेरिकेत बऱ्याच म्युझिअम्समध्ये पाहायला मिळतात,
नुकतेच ह्युस्टनच्या नॅचरल हिस्टरी म्युझिअममध्येही पाहिले होते,
पण हे प्राणी
प्रत्यक्ष ज्या परिसरात वावरत होते,
तिथेच हे सांगाडे बघणे
हा एक वेगळाच अनुभव
होता.
ह्याबरोबरच पृथ्वीच्या अनेक स्थित्यंतरांचे पुरावे इथल्या दगडामातीत आहेत.
केवळ पाऊस आणि मुख्यतः वारा ह्या दोन घटकांच्या लाखो वर्षाच्या करामतींनी घडवलेले अजस्त्र फत्तरांचे अजब नमुने इथे पाहायला मिळतात.
प्रखर उन्हाळ्यामुळे पाहायला मिळाले नाहीत ते फक्त प्राणी
–
अर्थात त्याच कारणासाठी मनुष्यप्राणीही फारच कमी होते ही आनंदाची गोष्ट!
 |
| Balanced Rock - 'Milind was here!' 😊 |
 |
| The vast wilderness |
 |
Life surviving among boulders
|
दोन
तीन भेटीत मिळून ह्या अवाढव्य राज्यामधील महत्वाची स्थळं तरी पाहून झाली!
सबंध टेक्सास पाहिलेले फारच थोडे असतील,
आणि ते पहाणं एवढं
महत्वाचंही नसेल बहुतेक.
प्रेक्षणीय म्हणाव्या अशा फारच थोड्या जागा टेक्सासमध्ये आहेत,
पण बिग बेंड,
व्हाईट सँड्स आणि कार्ल्सबॅड हे एवढं तरी
पाहायला मिळालं ह्याचा आनंद आहे!
ह्या राज्यामधील कायमचं मनात राहील असं दृश्य म्हणजे ७५ मैल स्पीड
लिमीट असलेले सिंगल लेन सरळसोट कधीच न संपणारे शांत रस्ते,
त्यावरील दोन्ही बाजूला असलेली हजारो एकर्स विस्तीर्ण रँचेस,
आणि क्षितिजावर दूर कुठेतरी टीचभर उंचीचे वाटणारे डोंगर!
अती दाटीवाटीच्या न्यू जर्सीसारख्या पिटुकल्या राज्यामधून आलेल्या लोकांचे डोळे सताड उघडे करणारं ते दृश्य!
Excellent writeup !
ReplyDeleteअफाट आहे हे 👌🏻
ReplyDeleteThank you! :)
Delete