October 15, 2019:
* * * * *
October 1, 2019:
June 16, 2019:
* * * * *
January 6, 2019:
* * * * *
December 10, 2018:
* * * * *
July 23, 2018:
* * * * *
June 22, 2018:
June 15, 2018:
* * * * *
March 20, 2018:
November 12, 2017:
* * * * *
October 21, 2017:
* * * * *
September 28, 2017:
https://www.youtube.com/watch?v=04VYViT6Xys
September 20, 2017:
September 2, 2017:
शर्लाक घरे: (भिंगातून कागदाचा कपटा न्याहाळत) क्याय तो गोंधळ चालू आहे मागे?
सौ. घरे: अय्या गोंधळ काय! कित्ती च्छाॅन गाणै 'तरूण आहे रात्र अजुनी'!
शर्लाक: लग्नाच्या दुस-या किंवा तिस-या वर्षातलं असणार.
सौ. घरे: तुझं काहीतरीच, कशावरून रे?
शर्लाक: एवढ नॅगिंग दुसरं कोण करणार? दर वाक्याला, 'हे केलस का रे', 'ते केलस का रे'!
सौ. घरे: तसं नाही रे, दुसरं-तिसरंच वर्ष कशावरून?
शर्लाक: मत्प्रिय वात्सुते, अगदीच सोप्पं आहे! अजून ती रातराणीबद्दलच बोलते आहे. पाचव्या-सहाव्या वर्षी ओळी असत्या 'बिलं भरलीस का रे', 'दार लाॅक केलस का रे', 'गार्बेज बाहेर ठेवलस का रे'...
* * * * *
गेट टूगेदरमध्ये, गॉसिप वगैरे सगळं सगळं संपलं, की गाणी म्हणण्याची प्रथा आहे. त्यासाठी आग्रह होतो, आढेवेढे होतात. 'छे ग. मी कुठे? मला नाही येत गाताबिता!' ह्या सत्यवचनापासून सुरुवात करून, 'मला ना खोकला झाला होता गेल्या महिन्यात, त्यामुळे आवाज लागत नाहीये माझा' हा मधला स्टॉप घेऊन गाडी जेव्हा 'पण मला सगळे शब्द नाही बाबा आठवत' इथे पोचते तेव्हा मी आशा सोडून दिलेली असते. कारण 'सच्च्या गायकाने शब्दांसारख्या क्षुद्र गोष्टी लक्षात ठेवायच्याच नसतात' ही उत्कट सार्वजनिक श्रद्धा अशा ठिकाणी निश्चितपणे नांदत असते. पूर्वी, ह्याक्षणी 'चला; म्हणजे निदान सबंध गाणं तरी ऐकायचं नाहीय ' ही चिमुकली आशा माझ्या मनात तग धरून रहात असे; आजकाल मोबाईल आणि गुगलच्या जमान्यात तीही मावळली आहे.
एवढे आढेवेढे घेऊन तयार झालेल्या गानसरस्वत्या, बाल हनुमंताप्रमाणे झेप घेतात ती थेट सूर्यबिंबाला घशात घालायला (किंवा खरंतर, घशातून काढायला) - लता आणि मदनमोहनच्या 'लग जा गले' वर! ह्या बिचाऱ्या गाण्याचं गेल्या जन्मीचं काय पाप आहे माहिती नाही, पण या शमेवर आपल्याला जाळून घेण्याची ईर्षा सगळ्या होतकरू परवान्यांच्यात एवढ्या प्रकर्षाने का आढळते हा खरंच अभ्यासाचा विषय आहे.
मी काय म्हणतो, सुरुवातीला एखादं सोप्पंसं 'तित्तली उड्डी' वगैरे घेतलं तर नाही का चालणार? म्हणजे, लोकं कदाचित तात्काळ उठून जाणार नाहीत.
ओरिजिनल गाण्याएवढं तरी भितीदायक नसेल ह्या आशेवर!
October 1, 2019:
माझ्या ऑफिस मध्ये, लंच मिटिंगसाठी ऑर्डर देत असताना,
Saritha: No, I will have a veg sandwich only. (A sentence must always begin with either 'No' or 'Means'!)
John (‘He knows about Indians and their customs’): Oh, that’s nice! Are you a vegetarian?
Saritha (Offended at this unjust accusation): No, no, not like that; but today is my Tuesday.
John (Confused about the possessive 'my' part, trying to inject humor): It is my Tuesday too!
Saritha (Surprised): Means, you also do Tuesdays?
John (Now the poor soul is totally lost. What does 'also' and 'do Tuesday' mean? Still struggling to keep it light): Waddayamean? I do all days... sort of.
Saritha (Mighty impressed): OMG!
John (‘He knows about Indians and their customs’): Oh, that’s nice! Are you a vegetarian?
Saritha (Offended at this unjust accusation): No, no, not like that; but today is my Tuesday.
John (Confused about the possessive 'my' part, trying to inject humor): It is my Tuesday too!
Saritha (Surprised): Means, you also do Tuesdays?
John (Now the poor soul is totally lost. What does 'also' and 'do Tuesday' mean? Still struggling to keep it light): Waddayamean? I do all days... sort of.
Saritha (Mighty impressed): OMG!
Me (Mighty amused): OMG!
आजकाल इथे सरीथा जास्त आणि जॉन कमी असल्यामुळे असे विनोदही कमी होत चालले आहेत, याचेच दुःख आहे! फक्त नावांमध्ये बदल केला आहे.
* * * * *
June 16, 2019:
हॅपीनेस इज:
शुक्रवारी सहज बोलतांना तोंडातून निघून जावं, 'किती वर्षं झाली असतील कडबू खाल्ल्याला'; आणि रविवारी सकाळी जेवणात साक्षात कडबू असावेत!
शुक्रवारी सहज बोलतांना तोंडातून निघून जावं, 'किती वर्षं झाली असतील कडबू खाल्ल्याला'; आणि रविवारी सकाळी जेवणात साक्षात कडबू असावेत!
ते सुद्धा, 'कडबू म्हणजे काय?' ह्या प्रश्नापासून सुरुवात करून, मग चिकाटीने रेसिपी शोधून काढून ('कोंकणस्थांच्यात नाही असलं काही करत!'), डाळ भिजवून, शिजवून, घोटून - आणि हे सगळं सरप्राईज म्हणून गुपचूपपणे करून. नुसतंच गोड कसं जेवणात, म्हणून त्याबरोबर, ताजा घरगुती गोडा मसाला वापरून, लहानशी भरली वांगी घालून केलेला मसालेभात आणि टॉमेटो, गाजर, आलं-लसूण आणि तूप-जिऱ्याची फोडणी देऊन केलेलं सार!
'सुशी मेक्स फस्सक्लास जेवण' माहिती आहे. पण धिस इज म्हंजे अगदी टूच मच हं!
आता फक्त जवळपास कुठे वटवृक्ष आहे का पाहिलं पाहिजे, थोड्या फेऱ्या घालेन म्हणतो.
नाही, कडबू तसे पोटाला जडच हो!
😀
January 6, 2019:
भाई: व्यक्ती की वल्ली:
हे सिनेमाचं परीक्षण नाही; ती नेटवर झाली बहू आणि होतील बहू ह्याची खात्री आहे. तसाही, हा सिनेमा चाळीसेक वर्षे वयाच्या पुढचे जवळजवळ सर्वच मराठी प्रेक्षक बघतील असा माझा अंदाज आहे. त्यांनी तो अवश्य पहावा एवढा सुंदर तो नक्कीच आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते सागर देशमुख, इरावती हर्षे, पटकथा-संवाद लेखक मतकरीज आणि सर्वच टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
पुलंचा (असंख्यांपैकी) एक निस्सीम चाहता म्हणून फक्त काही थोड्या खटकलेल्या गोष्टी (बाकी सिनेमा एवढा सुंदर नसता, तर ह्या कदाचित दुर्लक्षित झाल्या असत्या) किंवा विशफुल थिंकिंग म्हणा:
- व्यक्ती आणि वल्ली मधली पात्रे वेगळ्या मिषाने सिनेमात दाखवण्याचा मोह टाळायला हवा होता. ते पुस्तक जरी साहित्य अकॅडमी पुरस्कारप्राप्त असलं, तरी त्याची सार्वजनिक पारायणं आतापर्यंत बऱ्याच रूपात झालेली आहेत. नाथा कामत कथाप्रवाहामध्ये अगदीच मिसफिट आणि कृत्रिम वाटला, आणि केवळ अंतू बर्व्याचे अस्सल कोंकणस्थी तत्वज्ञान ऐकवण्यासाठी घातलेला दारूचा प्रसंग फार ओढून ताणून आणल्यासारखा वाटला. मुळात वसंतराव देशपांडे पुलंच्या लग्नाला उपस्थित होते ही माहिती नवीन जाणवली - पुल आणि सुनीताबाई दोघांच्याही लिखाणात फक्त उमाकांत आणि बाळू नावाचा एक मित्र असल्याचे उल्लेख आठवतात.
- लहान किंवा तरुण पुलंच्याबद्दल त्यांच्या वडिलांनी 'हा पुढे फार मोठा होणार' भविष्य वर्तवल्याची नोंद आहे, पण इतर काहीजणांना सुद्धा त्या प्रकारचे वक्तव्य करताना पाहून ते अनावश्यक वाटले. गोविंदराव टेम्बे हयात असतांनाच 'आपल्या घरी टेम्बे जन्माला आलाय' हे वाक्य जरा विचित्र वाटतं.
- शेवटच्या सीनमध्ये पुल 'एखाद्या सामान्य संसारी नवऱ्याप्रमाणे' सुनीताबाईंना एवढे घाबरून असलेले दाखवणं जरा जास्त झालं - त्यामुळे तो सीन खूप स्टिरिओटाईप ताटाखालचं मांजर नवऱ्याच्या विनोदासारखा गुळगुळीत होतो. एकंदरीत हे दारूचे अनावश्यक सीन्स हा महेश मांजरेकर इफेक्ट म्हणावा का; नटसम्राट मध्येही एक ओव्हरडन अनावश्यक दारूचा सीन आठवला.
- सिनेमा तुकडा पडल्यासारखा फार खटकन संपतो असं वाटलं, शेवटाला थोडा गोलाकार देऊन पूर्वार्ध संपवता आला नसता का?
- व्यक्ती आणि वल्ली मधली पात्रे वेगळ्या मिषाने सिनेमात दाखवण्याचा मोह टाळायला हवा होता. ते पुस्तक जरी साहित्य अकॅडमी पुरस्कारप्राप्त असलं, तरी त्याची सार्वजनिक पारायणं आतापर्यंत बऱ्याच रूपात झालेली आहेत. नाथा कामत कथाप्रवाहामध्ये अगदीच मिसफिट आणि कृत्रिम वाटला, आणि केवळ अंतू बर्व्याचे अस्सल कोंकणस्थी तत्वज्ञान ऐकवण्यासाठी घातलेला दारूचा प्रसंग फार ओढून ताणून आणल्यासारखा वाटला. मुळात वसंतराव देशपांडे पुलंच्या लग्नाला उपस्थित होते ही माहिती नवीन जाणवली - पुल आणि सुनीताबाई दोघांच्याही लिखाणात फक्त उमाकांत आणि बाळू नावाचा एक मित्र असल्याचे उल्लेख आठवतात.
- लहान किंवा तरुण पुलंच्याबद्दल त्यांच्या वडिलांनी 'हा पुढे फार मोठा होणार' भविष्य वर्तवल्याची नोंद आहे, पण इतर काहीजणांना सुद्धा त्या प्रकारचे वक्तव्य करताना पाहून ते अनावश्यक वाटले. गोविंदराव टेम्बे हयात असतांनाच 'आपल्या घरी टेम्बे जन्माला आलाय' हे वाक्य जरा विचित्र वाटतं.
- शेवटच्या सीनमध्ये पुल 'एखाद्या सामान्य संसारी नवऱ्याप्रमाणे' सुनीताबाईंना एवढे घाबरून असलेले दाखवणं जरा जास्त झालं - त्यामुळे तो सीन खूप स्टिरिओटाईप ताटाखालचं मांजर नवऱ्याच्या विनोदासारखा गुळगुळीत होतो. एकंदरीत हे दारूचे अनावश्यक सीन्स हा महेश मांजरेकर इफेक्ट म्हणावा का; नटसम्राट मध्येही एक ओव्हरडन अनावश्यक दारूचा सीन आठवला.
- सिनेमा तुकडा पडल्यासारखा फार खटकन संपतो असं वाटलं, शेवटाला थोडा गोलाकार देऊन पूर्वार्ध संपवता आला नसता का?
पुलंच्या आयुष्यातले मोजके प्रसंग निवडणं हे फार मुश्किल काम होतं, त्यामुळे वरील काही प्रसंगांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा इतर काही व्यक्ती अथवा प्रसंग घेणं जास्त आवडलं असतं - उदा. बाळ ठाकरेंवरील पाच मिनिटांऐवजी रामूभैया दाते! ह्या पात्राचा पुढे काकाजींचं स्फूर्तिस्थान म्हणूनही उल्लेख येऊ शकला असता. किंवा त्या प्रसंगातील सुनीताबाईंशी इंटरॅक्शन दाखवण्याऐवजी, त्या दोघांची कोर्टशिप कवितांच्या कॉमन आवडीमुळे कशी फुलली हे दाखवणं जास्त आवडलं असतं.
आणि तरीही, ह्या सगळ्यासकट, एकंदर सिनेमा सुंदरच आहे. भीमसेन, कुमार आणि वसंतराव ह्यांच्या छोट्याशा मैफिलीबद्दल बरंच लिहिलं गेलंय - त्या दृश्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. तसाच गदिमांबरोबरचा प्रसंग! माझ्या मते हा सिनेमा 'मस्ट सी' होतो तो अशा प्रसंगांसाठी! मराठी साहित्य, संगीत आणि चित्रसृष्टीचा अफाट वैभवशाली काळ, त्या दिग्गज कलावंतांच्या बैठकी आणि चर्चा, पडद्यावर का होईना, लुटूपुटूच्या का होईना, आपल्याला अनुभवता येणं हे आजच्या भाषेत लई भारी आहे. सागर देशमुखच्या कामाचा बोलबाला होतो आहे आणि व्हायलाच हवा - मला त्याच्या कामात एक उत्कृष्ट गोष्ट जाणवली, जे दिग्दर्शकाचं आणि पटकथेचंही श्रेय आहे, ती म्हणजे पुल हा काय चालताबोलता आनंदोत्सव होता हे त्याच्या देहबोलीतून, अभिनयातून पडद्यावरील वावरातून सबंध सिनेमाभर जाणवतं - ही कामगिरी दिव्यच!
December 10, 2018:
सुख़न - एक वेगळाच सुखद अनुभव:
'पुण्याच्या सात-आठ - मराठी - मुलांनी मिळून सादर केलेला उर्दू शेर-शायरी-गझल आणि कव्वालीचा कार्यक्रम' - ही जाहिरात काही फार आकर्षक नव्हती. मुलांच्या नांवांमध्ये सुद्धा काही प्रसिद्ध किंवा ओळखीची नावं नाहीत; पण शायर मात्र सगळे एकसे बढकर एक असे होते - त्या मोहाला आणि उर्दूच्या प्रेमाला बळी पडून ह्या कार्यक्रमाला गेलो. न्यू जर्सीचा हा कार्यक्रम त्यांचा अमेरिकेतला आठवा आणि शेवटचा होता.
पेटी, तबला, ढोलकी आणि सारंगी एवढाच वाद्यवृंद. तीन समर्थ गायक (पैकी एक गायिका). दोन उत्कृष्ट निवेदक. असा हा संच.
पुण्याच्या मराठी लोकांचे, उर्दू सोडा साधे हिंदीचे शब्दोच्चार 'तौबा, तौबा' असतात हा पूर्वानुभव पार विसरायला लावणारे दोन्ही निवेदक होते. प्रत्येक भाषेचा एक स्वतंत्र बाज असतो. नुसते शब्दांचे उच्चार नव्हे, बोलण्याची एक धाटणी असते, भाषेचीच एक 'ऍटिट्यूड' असते - उर्दूसारख्या भाषेला एक मिजास असते - ती जर बोलणाऱ्याला जमली नाही तर त्यातला सगळा मझा निघून जातो. ह्या कार्यक्रमात दोन्ही निवेदक अप्रतिम सुंदर आणि अतिशय सहजपणे उर्दू बोलत होते. प्रत्यक्ष गायन किंवा संगीत कमी होतं, मुशायरा टाईप शायरी पेश करणं आणि दास्तानगी हे जास्त होतं - पण तो माहौल त्यांनी इतका सुंदर सजवला की ते अभिवाचन कुठल्याही संगीताच्या मैफिलींपेक्षा कमी जाणवलं नाही. दोन्ही कव्वाल्या सुंदर झाल्या. खास उल्लेख करण्यासारखे आणखी दोघे म्हणजे सारंगिया-कम-ढोलकी वादक, आणि तबलजी - दोघांनीही अप्रतिम साथ दिली.
सुधारणा करण्यासारख्या काही गोष्टी जाणवल्या - शायरांना पुरेसं महत्व दिलं गेलं नाही असं वाटलं. त्यांच्या नावांचा उल्लेख असला तरी तो कित्येकदा फार ओझरता वाटला. प्रत्येक कलाम, शेर, नज्म, गझल नक्की कोणत्या कवीची आहे हे जास्त स्पष्टपणे सांगणं महत्वाचं वाटलं. हिंदी सिनेमातल्या, किंवा गाजलेल्या लोकप्रिय रचना टाळायचा अट्टाहास मान्य, पण तरीही फैझ, साहिर, इकबाल ह्या आणि अशा मातब्बरांच्या जास्त सुंदर रचना निवडता आल्या असत्या असं वाटलं. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, आधीच ऐकलेली काही शेरशायरी पुन्हा एकदा गायन स्वरूपात ऐकवणं अयोग्य वाटलं.
पण तरीही, दोनअडीच तासांचा हा एक वेगळ्याच धाटणीचा कार्यक्रम उर्दू शेरोशायरीच्या अनोख्या दुनियेत घेऊन जातो हे नक्कीच!
July 23, 2018:
पाठलाग ही सदैव करतील:
परवा संध्याकाळी मुसळधार पावसात, केवळ चायनीज जेवणाची जबरदस्त तल्लफ आली म्हणून पंधरा मैल ड्राईव्ह करून आमच्या लाडक्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. नेहमीचा चाकांखालचा रस्ता असल्याने गुगल मॅप वगैरे वापरण्याचा प्रश्नच नव्हता. सवयीचे, आवडते रेस्टॉरंट असल्याने, येल्पकडून शिफारस घेण्याचाही प्रश्न नव्हता. दोघांनीही आपापले फोन्स बंद करून ठेवले होते ते घरी परतेपर्यंत एकदाही उघडले नाहीत. दीड-दोन तास छान मजेत गेले होते. परतीच्या वाटेवर अगदी काळोखात, पावसात, गप्पात रस्ता चुकताचुकता वाचला, तर्रीही भांडण झालं नाही... लग्नाला एवढी वर्षे झाल्याची शंकाही येऊ नये.
घरी पोचल्यावर अर्ध्या तासात, फोनवर गुगलचा अनाहूत आगंतुक प्रश्नार्थक संदेश: 'मग काय, कसं होतं जेवण?'
बटाट्याच्या चाळीतले शेजारी कमी भोचक असतील!
नवरा-बायकोच्या दुरापास्त अनमोल डेटवर सुध्दा नजर ठेवणा-या गुगलला पुढचा जन्म नक्की सापसुरळीचा का काय तो मिळेल!
June 22, 2018:
ते हि नो दिवसा गता:
परवा कोणाचीतरी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारांच्या अतिक्रमणावरची पोस्ट वाचली आणि आमच्या माहीमच्या श्री सिनेमाची आठवण झाली. खरं तर 'श्री' हे सिनेमाच्या थिएटरचं नांव होतं - पण तिथे दाखवले जाणारे सिनेमे हा एक अभ्यासनीय विषय असल्याने त्या संपूर्ण पॅकेजला मिळून श्री सिनेमा असंच बोलीभाषेत म्हटलं जात असे. पॅरलल सिनेमा, आर्ट सिनेमा, बाजारू सिनेमा... तसा श्री सिनेमा!
काय होतं एवढं मोठं त्यात? एक तर तिथे सहसा तामिळ, तेलगू वगैरे खडाम्खुडूम भाषांमधले सिनेमे दाखवले जायचे - नाही तर... डायरेक हॉलिवूडचे. दुसरं म्हणजे तिकिटांचा दर अतिवाजवी असे - म्हणजे कॉलेजच्या खडतर दिवसात सुध्दा तिकीट विकत घेऊनही वरती मध्यंतरात चहा-बटाटवडा एवढी चैन परवडत असे. माझ्या काटकसरी स्वभावामुळे मी त्या काळात थोडेफार पाताळविजयम टाईप सिनेमेही बघितले होते - केवळ स्वस्तात आहे म्हणून, ओ का ठो कळत नसूनही. तिसरी गोष्ट म्हणजे सिनेमे बघायला माणसांनाच नाही, तर माश्या, ढेकूण, डास, झुरळं वगैरे प्राणिमात्रांनाही प्रवेश असे; कधी कधी त्यांचीच गर्दी जास्त असे.
सेन्सॉरवरून श्री ची आठवण होण्याचं कारण म्हणजे, श्री सिनेमाचं स्वतःचं स्वायत्त सेन्सॉर बोर्ड होतं. त्याचा सरकारी बोर्डाशी फारसा संबंध नव्हता. इंग्रजी सिनेमा बघून निरागस एतद्देशीय लोकांच्या मनांवर वाईट परिणाम होऊ नये ह्याची श्री चं बोर्ड डोळ्यात तेल घालून दखल घेत असे. खुनाबिनाचे वाईट्ट सीन्स ते सरळ आपल्या अखत्यारीत कापून टाकत. तेव्हा ह्याची जाणीव नसल्यामुळे, माझ्या दुर्दैवाने तिथे मी - ऑफ ऑल द मुव्हीज - सायको बघितला होता. त्यामधला शॉवरचा सुप्रसिद्ध सीन केवळ त्या अविस्मरणीय पार्श्वसंगीतामुळे लक्षात राहिला - कारण पडद्यावर फार काही घडायच्या आतच श्री हिचकॉकने 'कट' अशी आज्ञा दिली होती. शेवटचा अतिसुप्रसिद्ध खुर्ची गर्र्कन वळण्याचा सीन संपूर्ण कापल्यामुळे त्या खोलीत नक्की काय घडलं ह्याचा आम्हाला पत्ताच नव्हता.
नंतर कित्येक वर्षांनी 'खरा' सायको बघितल्यावर हिचकॉक आणि अँथनी पर्किन्स दोघांबद्दलचाही आदर दसपटींनी वाढला - श्री च्या कत्तलीमधून बचावलेल्या सायकोनेच पूर्वी केवढं घाबरवलं होतं हे आठवून! पावसातून ड्राईव्ह करत जाणारी जॅनेट ली, बेट्स मोटेलचं दृश्य स्वरूप, पर्किन्सच्या डोळ्यातला इंटेन्स वेडसर भाव - विशेषतः शेवटच्या सीनमध्ये, हिचकॉकच्या बऱ्याच सिनेमांमध्ये दिसणारा अंधार / उजेडाचा आणि सावल्यांचा खेळ ह्या सगळ्यांनीच जिंकलं होतं.
सस्त्यात एवढ्या दिव्य सिनेमाची ओळख घडवल्याबद्दल खरं तर श्री चे आभारच मानायला हवे.
* * * * *June 15, 2018:
कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत:
एका फेसबुक मित्राच्या 'अमृततुल्य' पोस्टवरून झालेली आठवण. कॉलेजच्या दिवसात समोरच्या चहाच्या टपरीत बराच वेळ जात असे. स्वच्छ - अस्वच्छ असे क्षुद्र भेदभाव मानण्याचा तिथे प्रघात नव्हता. एका मित्राबरोबर चहा घेत असतांना त्याच्या कपात माशी निघाली. मी अवाक! त्याने शांतपणे ती चमच्याने बशीत काढून ठेवली, उरलेला चहा पिऊन टाकला आणि बशी घेऊन काउंटरपाशी गेला.
'उष्टी नाही; पुन्हा वापरता येईल तुम्हाला' असं म्हणून ती बशी तिथेच ठेवून बाहेर पडला.
अशा स्थितप्रज्ञ मित्रांचा कॉलेजच्या कोवळ्या वयापासून सहवास असल्यामुळे शिक्षण अर्थातच खूप चांगलं झालं.
March 20, 2018:
Thelma & Louise:
Some movies grip you right at the first viewing... and then they never let you go! "Thelma & Louise" was one such movie for me. Originally saw it around 1991 - wow, time flies! That is more than 26 years ago! - and then saw it many more times, enjoying it every time just as much. The spell is still not wearing thin. Initially, I admired the unusual tale of the two rebellious girlfriends. A different genre for Hollywood - women baddies. The Women's Lib crowd was going gaga over it. But, an 'agenda' movie in itself can not get on my favorite list.
Some movies grip you right at the first viewing... and then they never let you go! "Thelma & Louise" was one such movie for me. Originally saw it around 1991 - wow, time flies! That is more than 26 years ago! - and then saw it many more times, enjoying it every time just as much. The spell is still not wearing thin. Initially, I admired the unusual tale of the two rebellious girlfriends. A different genre for Hollywood - women baddies. The Women's Lib crowd was going gaga over it. But, an 'agenda' movie in itself can not get on my favorite list.
So, I started wondering about what attracted me so much about this movie!
For one, the superb acting by Geena Davis and Susan Sarandon is a major plus! The only question would be, who acted better! The interplay between the young, attractive, homely but ignored by her husband, trusting (one might almost say dumb) Thelma (Davis) and the more seasoned, pretending to be more worldly, wise and mature, but quite shaken at the gravity of what she has committed Louise (Sarandon) was beautiful. Brad Pitt is seen here in one of his early key roles - a charmer but shameless exploiter done very impressively. Harvey Keitel is his usual effective small town cop.
Two girlfriends, who have spent much of their adult life under the male chauvinist control, are out to spend a carefree weekend by themselves on a fishing trip at Louis's friend's cabin. A totally unforeseen incident right at the beginning of their trip changes not only their plans, but their lives!
More than the usual cocktail of script, characters, acting, incidents or dialogues, there is something else to this movie. The ambience! Much of the movie takes place driving in the car, on roads, motels, diners - all vistas that I love dearly. Maybe therefore, I thought the "Americana" in this movie was the palpable third important character. We are there with these two friends, on those roads, in those places... we experience their drive, treasure it forever in our minds - this is the director's credit... and the cinematographer's too! Rarely do we see the locales playing such prominent role as the main characters in a movie.
Over and above all of this, the 'spirit' or the mood of the movie is yet another important dimension! No doubt, by any logic, what these two do are unpardonable crimes! If this was a newspaper story, I would equally well pooh-pooh the stupidity of the ladies and see them go to jail with no more than a shrug. But this is where a piece of art differs from a news story! A good piece of art should show a face, an incident, a person in a different light and wake us to the new aspect of the object. That is exactly what this movie does. Clearly an out and out old fashioned women's lib fantasy - in a way - with two women who are subtly, continually oppressed in a male-dominated society one day rebelling beyond imagination, getting back at any men that happen to cross them during this particular ride! Their sense of freedom, exuberance, power and liberation is what makes the movie so interesting! No wonder their joy ride ends up the way it does over the cliff. Even in the last scene, I liked that the (in the original release version) last frame shows the car suspended mid-air - a crash would have been too unbearable for their dreams... and our sympathies!
At the very least, a thoroughly enjoyable movie.
* * * * *November 12, 2017:
श्यामची आई - अमेरिकन आवृत्ती:
आई: बाळ डॉनाल्ड, शाळेत जाऊन आलास, सगळी मुलं भेटली असतील. मी सांगितल्याप्रमाणे त्या द्वाड पुतीनला चांगला हडसून-खडसून जाब विचारलास का? गुदस्ता त्याच्या टोळभैरवांनी धूळफेक करून आपल्या दारातला आंबा चोरला, आठवतंय ना? सगळे राखणदार सांगत होते, चांगला घसघशीत पुरावा आहे त्यांच्याकडे. माहिताय ना?
डॉनाल्ड: होय, आई. मी पुतीनला विचारलं की ब्वा तुझ्या वर्गातल्या मुलांनी धूळफेक केली का? तू आमचे आंबे चोरलेस का? तर तो म्हणाला नाही बुवा, आम्ही काही धूळफेक केली नाही आणि आंबेही चोरले नाहीत. मी पुन्हा दोनदा विचारलं, आणि दोन्ही वेळी तो पुन्हा म्हणाला की त्यांनी असं नाही केलं. आपण तरी किती वेळा विचारणार ना? त्याला का मन नाही? त्याला का मान नाही?
निरागस डॉनाल्डच्या ह्या भाबड्या प्रश्नांनी आईच्या डोळ्यातून अश्रू झरझरा गालावर ओघळू लागले.
October 21, 2017:
हार्वी वाइनस्टीन आणि 'मी टू' च्या निमित्ताने:
हवामानाप्रमाणेच, आजकाल सामाजिक जीवनात सुद्धा 'क्लायमेट चेंज' ही खरी घडत असलेली वस्तुस्थिती आहे. एक पुरावा म्हणजे सध्या चौफेर कोसळून पडत असलेले जुने पुराणे भक्कम (मानले गेलेले) बुरुज! तसे हादरे बसत होते पूर्वापार. अधून मधून लाटा येत होत्या - क्लॅरेन्स थॉमसच्या सुप्रीम कोर्टाच्या नियुक्तीपासून, बिल क्लिंटनच्या राजवटीमध्ये भर दरबारात धुतल्या गेलेल्या लक्तरांपासून. पण ह्या ढासळण्याचा वेग झपाट्याने वाढायला लागला आहे. ह्यावेळच्या लाटेची सुरुवात झाली ती टीव्ही शो वरचा एक अत्यंत प्रेमळ, उतारवयीन, कुटुंबवत्सल बाप म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या, एके काळच्या प्रख्यात, अतिशय बोलक्या चेहऱ्याच्या विनोदकार बिल कॉसबीपासून. त्याच्या आरोपींमध्ये एवढ्या स्त्रिया, एवढ्या प्रमाणात पुढे येतील हे अपेक्षित नव्हतं - पण ते अघटित घडलं. त्यानंतर कॉलेज कॅम्पसवरचे बलात्कार, US ऑलिम्पिक टीमच्या डॉक्टरचे चाळे, फॉक्स टीव्ही चॅनेलच्या बऱ्याच वरिष्ठ धेंडांची लफडी आणि हकालपट्टी हे सगळं भर घालत राहिलं.
सध्या चालू असलेल्या हार्वी वाइनस्टीन तमाशामध्ये अगणित स्त्रिया पुढे आल्या आहेत - 'मी टू' अशी नवीन चळवळ सुरु आहे. दहा, वीस आणि पंचवीस वर्षांनी का होईना, पण आपल्यावर झालेल्या अन्यायाला त्या आता वाचा फोडत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. 'लोक काय म्हणतील', किंवा 'नको, उगाच जाहिरात होईल', 'जाऊदे, ह्यातून निष्पन्न काहीच होणार नाही' वगैरे पारंपरिक चिकटपट्ट्या त्यांची मुस्कटदाबी करत नाही आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. 'स्त्री-मुक्ती' वगैरे जमाव त्यातून जुने पुराणे घासून गुळगुळीत झालेले 'पुरुष जातच मेली हरामखोर' असले हेकट मुद्दे मांडत नाही आहेत - ही ही प्रगतीच आहे.
कारण, खरं म्हणजे ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे ती सत्ता - आणि ती गाजवण्याची वृत्ती! निरंकुश, सर्वंकष सत्ता - मी मनात येईल ते करू शकतो, आणि कोणी माझ्याविरुद्ध ब्र ही काढू शकत नाही, काढला तर मी त्यांना विकत घेऊ शकतो, गप्प करू शकतो किंवा निसटू शकतो - ह्या आत्मविश्वासामागची सत्ता. बलवंतांनी दुबळ्यांवर अत्याचार करणं ही अनादी कालापासूनची मानवी परंपरा आहे. लैंगिक अत्याचार हा ह्या सत्ता गाजवण्याचाच, दुसऱ्याला कमी लेखण्याचा, कमीपणा दाखवण्याचाच, लुबाडण्याचा आणि दादागिरीचाच एक भाग आहे. वाइनस्टीनच्या सुरस आणि चमत्कारिक कथांमध्ये डोळसपणे पाहिलं, तर ह्या अमानुष सत्तेची आणि मनमानीपणाचीच जाणीव जास्त तीव्रतेने होते. एका उघडकीला आलेल्या वाइनस्टीनवर सगळं जग कालच जाग आल्यासारखं आता 'कित्ती मेला नीच!' म्हणत तुटून पडतंय - पण सत्तेच्या अशा अगणित वर्तुळांमध्ये लहानमोठे वाइनस्टीन उद्याही वळवळत राहणारच आहेत. कित्येक बायकांनी त्यांच्या मर्यादित महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी त्याच्या मागण्यांना मान्यता दिली, किंवा त्याही पुढे जाऊन त्याच्याकडून आपलं तोंड बंद ठेवायची किंमत वसूल केली होती - हे ही मला लक्षणीय वाटतं. फक्त क्विंटन टॅरेन्टिनो आणि बेन ऍफ्लेकलाच गप्प राहिल्याबद्दल का दोषी ठरवायचं?
एका वाइनस्टीनला नेस्तनाबूत करण्यापेक्षा, सध्याच्या तमाशामधल्या थोड्या ढोंगी 'कसं बुवा घडलं हे सगळं' आणि 'काही कल्पनाच नव्हती हा असला असेल' ह्या वगांपेक्षा, दुबळेपणाची, अगतिकतेची भावना नष्ट करणं हे महत्वाचं. फेसबुक आणि ट्वीटर सारखे सोशल मीडियाचे मेगाफोन वापरून ह्या सत्तेच्या तटबंदींना तडे पाडत रहाणं महत्वाचं.
एक स्वागतार्ह सामाजिक क्लायमेट चेंज होतो आहे - हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
September 28, 2017:
गाये लता, गाये लता:
लता जी, आज आपकी सालगिरह पर बहोत बहोत बधाइयां! आप तो सुरोंकी मलिका हैं, भारतरत्न हैं, हम आप को क्या तोहफा पेश करें!
हमेशा की तरह आज भी - हम तो बस आपही के गाये हुए गीतोंका रत्नभण्डार लुटते रहेंगे, आपके जनम दिनका एक और बहाना लेकर.
हमेशा की तरह आज भी - आपकी हर एक मुरकी पर, हर एक हरकत पर, आलापी पर, तान पर आपको सैकड़ों हज़ारों दुवाएं देंगे.
बस आज आप के जनम दिन पर, एक दुवा हमारी किस्मत के भी नाम देंगे, की हमें आपको देखने सुननेका सौभाग मिला!
आपके सैकड़ों गीत तो हमेशाके लिए दिलो-दिमाग में ही घर बसाये हुए हैं. अब उनकी रेकॉर्ड सुनते हैं तो बस, 'ओ सजना' या 'ओ निर्दयी प्रीतम' वाला एक 'ओ' अक्षर में समाया हुआ अनेक सुरोंका चमत्कार फिर से महसूस करनेके लिए, 'सांवरी सूरत मन भाई' की कबूली देनेवाली भोली मासूम आवाज़ सुननेके लिए, 'रसिक बलमा' वाली तार सप्तक में भी आसानीसे टहलनेवाली आवाज़ सुननेके लिए, शहद की मिठास को खट्टा बना देनेवाली मधुरतम मधुर आवाज़ में गाया हुआ 'मुझसे मत पूछ' फिर एक बार चखनेके लिए, 'फैली हुई हैं' वाला चहकता, उमड़ता, खिलखिलाता हुआ आनंद दुबारा लुटनेके लिए, 'जरासी आह्ट' वाली बिलकुल छोटीसी दिलकश तान को प्यार से गले लगानेके लिए, 'जा मैं तोसे नाही बोलूं' वाली तानोंकी आतशबाज़ी देखनेके लिए, या तो ‘जुर्म-ए-उल्फत' का शुरूवाला वह बिलकुल सच्चा, खंबीर और शुद्ध स्वर सुननेके लिए... ऐसे कईं दिनोंकी यादें अभीभी ताज़ा हैं, की कड़ी धूप - सूरजकी हो, या ज़िंदगीकी - से परेशान, घर आये और आपके 'हर आस अश्कबाऱ है' या 'तुम क्या जानो' के सुरोंने दिलको ठंडक और तसल्ली दे दी.
यह तो हुई आपके हज़ारों लोकप्रिय गीतोंमेंसे थोड़े गिने-चुने गीतोंकी बात! और कितने अनगिनत गीत ऐसेभी हैं, जिनके बोल न तो कुछ ख़ास थे, ना ही उनकी धुन कोई असाधारण - बस आपकी आवाज़की जादूने उनमें चेतना भर दी, उन कागज़ के फूलोंको अपने सुरोंसे महकाया... इन सबका शुक्रिया अदा करें भी तो कैसे, शब्दोंमें तो बयान नहीं हो पायेगा... खैर आपको तो पता है दिल से कही गयी कुछ 'ऐसी भी बातें होती हैं'.
हमारे लिए अच्छे दिनका सपना बस इतना है, गाये लता, गाये लता... और हम सुनते रहें... हमेशा की तरह!
* * * * *
September 20, 2017:
I used to honestly believe what was probably said in jest, that the only sport more boring than Golf is "Watching paint dry"!
But lately, it dawned upon me that there is an altogether ulterior motive behind this sport - Golf, that is.
More than the joy of hitting sticks at the ground and digging up dirt, the real lure here is for the management types to get together to coin new jargon and buzzwords to bamboozle the masses! Making new bottles for the old wine, you might say.
Gems like 'blue sky', 'green field', 'low hanging fruit', 'synergy', 'empowerment', 'articulate', 'theater' (these guys think they are still fighting WWII), 'hoteling' (not eating out, you dummy - this means not having a space of your own to work at the office!) ... don't just suddenly become colloquial... like, 'organically'!
A lot of small white balls have to be lost in the wilds before the commoners get to savor these nuggets in their daily language intake!
* * * * *
नेटफ्लिक्सवर सहज मिळाला म्हणून (हो, आधीच स्पष्ट करून टाकतो. म्या काय त्या शिणमे बगून तस्सेच उपदव्याप करायला जाणाऱ्या जमातीतला न्हाय बरं!) 'हाऊ टू स्टील अ मिलियन' बघितला. एके काळी ह्या सिनेमावर भारतात 'दुष्प्रवृत्तींना चालना देतो' म्हणून बंदी आली, किंवा येऊ घातली होती, असं काहीसं अंधुक स्मरतंय.
भारतीय चोर-दरोडेखोरांना नवीन शिकता येईल असं काही खास ज्ञान ह्यात जाणवलं नाही. मात्र हिंदी सिनेमावाल्यांना चोरायचा मोह टाळता येणार नाही एवढी छान सुटसुटीत आणि हलकीफुलकी ष्टोरी मात्र नक्कीच आहे.
स्क्रिप्ट लिहून हवं असेल, तर मैं इधरच बैठा है, बस हुक्म हो. गाण्यांच्या शिच्युशन्स सुध्दा तय्यार हायती. म्हंजी, आड्रीनं पीटरला ब्यांडेज लावायचा शीण थोडा लांबवून त्यवढ्यात तिला लाजत मुरकत यक गाणं बसंल. मग, रिट्झच्या बारमधं ढोसत बसण्याऐवजी, चांगलं गार्डनमधी दोघांना गातगात धावडवता यईल. ते दोघं जॅनिटर क्लाॅजेटमध्ये लपलेले असतात त्या प्रसंगासाठी, 'हमतुम एक कमरेमें बंद हो' आधीच रचून तयार आहे. बाॅबीमध्ये फुकट गेलं, पण इथे अचूक आहे, चाबी खो जाय सकट! झालंच तर, त्या ढेरपोट्या दारूड्या पोलिसाला एक तरी गाणं हवंच - कामीक रिलीफ! हाय काय आन न्हाय काय; कोनाला पत्त्या पन नाय लागनार फोर्जरी हाय म्हून! डिट्टो शिणमातल्याच सारकं.
आहे एक अडचण, ह्या सिनेमाची कापी करण्यात... आड्री हेब्बर्न यवडी गोड गोडुली भावली कुठून आणणार हो? डोक्यावर नुस्तं केसांचं टोपलं करून भावली न्हाय ना होत कोणी!
* * * * *
August 24, 2017:
This radio station usually has the level-headed sensible journalists asking pertinent questions; today was unusual.
The news was 'Every summer, about 37 toddlers or younger kids accidentally left inside a locked car in the parking lot, die due to extreme heat.' Yes, this is a shocking statistic; but, sad as it is, that's not my point here.
I was struck by the entire conversation between the reporter and the different people she interviewed:
Consumer Group Rep: The government ought to force the car makers to build safer (?) cars!
General Motor spokesperson: ‘Oh, GM is ahead of the curve already. Most our models are capable of detecting if the rear door was opened in the 10 minutes prior to starting the engine. If so, a tinkling bell will sound when the engine is shut off and driver door is getting closed!’ Then the reporter dove into the efficacy of tinkling sound vs. the loud car theft alarm.
The reporter also described a device to be put in the car that monitors the inside temperature and any breathing sounds from the back seat - no, I'm not kidding, the humor of the situation was lost on them! If detected, it immediately sends a text and a loud audio message to the owner’s smart phone alerting there may be someone inside their locked car. Of course, she pointed out the pesky issues like your phone battery may be dead or reception may be poor inside the mall etc.
An engineer lamented that the technology has not sufficiently advanced to detect this situation in time. Then of course, there were vexing issues like, upon detection, whether the car should call 911 or turn itself on and start AC… what if there is not enough gas… Problems, problems!
Finally, they all concluded there is not sufficient data to say which of these alternate techniques may work.
I was so carried away in the techno-razzle-dazzle utopia, that almost forgot about that adult who probably drove the car to the parking lot, and then was strolling in the mall, after safely locking the car! After all, the cars don't pick up the infants, put them in the car-seat and drive to the mall parking lots by themselves - not yet anyway!
* * * * *
March 3, 2017:
शर्लाक घरे: (भिंगातून कागदाचा कपटा न्याहाळत) क्याय तो गोंधळ चालू आहे मागे?
सौ. घरे: अय्या गोंधळ काय! कित्ती च्छाॅन गाणै 'तरूण आहे रात्र अजुनी'!
शर्लाक: लग्नाच्या दुस-या किंवा तिस-या वर्षातलं असणार.
सौ. घरे: तुझं काहीतरीच, कशावरून रे?
शर्लाक: एवढ नॅगिंग दुसरं कोण करणार? दर वाक्याला, 'हे केलस का रे', 'ते केलस का रे'!
सौ. घरे: तसं नाही रे, दुसरं-तिसरंच वर्ष कशावरून?
शर्लाक: मत्प्रिय वात्सुते, अगदीच सोप्पं आहे! अजून ती रातराणीबद्दलच बोलते आहे. पाचव्या-सहाव्या वर्षी ओळी असत्या 'बिलं भरलीस का रे', 'दार लाॅक केलस का रे', 'गार्बेज बाहेर ठेवलस का रे'...
* * * * *
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...