मे महिना मला नेहमीच थोडा जाचक असतो. त्याचं काय आहे, आमचा आंतरधर्मीय विवाह आहे. तिचा कोंकणस्थ धर्म, आणि माझा... नाही. त्यामुळे भात, कुळथाचं पिठलं, पोह्याचे पापड... फणस, आंबे ह्या गोष्टींकडे मी फक्त खाण्याचे पदार्थ (तेवढा फणस वगळून; तो निषिद्ध आहे माझ्या निधर्मात!) म्हणून बघतो; त्यांनी मला गहिवर वगैरे येत नाहीत. माझ्या डोळ्यात पाणी दाटतं ते फक्त कांदा चिरतांना! आता एवढ्यावरून लगेच 'कशाचंच काहीच नाही तुला!' ऐकायला लागणं योग्य आहे का? पण एकदा श्रद्धा, भावना, आणि आमची ही, ह्या बायकांची गाठ पडली; की कशाचंच काही सांगता येत नाही, एवढं खरं.
विशेषतः एप्रिल-मे ह्या काळामध्ये, ह्या देशात, आमच्या घरातल्या ब्राऊनिंगला 'ओह, टू बी इन मुंबई / नाऊ दॅट मॅन्गोज मस्ट बी देअर' असले उमाळे येत असतात. ह्यावर मी बेसावधपणे चटकन 'बघ की पटेल ब्रदर्सकडे जाऊन; आले असतील मेक्सिकन आंबे त्यांच्याकडे' अशा आशयाची काहीतरी पाखंडी मूर्तीभंजक कॉमेन्ट करतो. हे म्हणजे मशीदीपुढून 'गणपती बाप्पा ... ' ओरडत जाण्यापेक्षाही डेंजरस! ह्या पापाची फळं तात्काळ माझ्या पदरात पडतात. वेगळ्या अर्थाने तीही, गोमटी नसली तरी रसाळ असतात. रत्नागिरी हापूसच्या चवीच्या आठवणी जिभेवर, आपलं मनामध्ये, रेंगाळत असतांना कुठल्यातरी थिल्लर आणि फडतूस मेक्सिकन फळाचा उल्लेखही जिभेवर येऊच कसा धजावतो ह्याबद्दल मला भावभक्तीने ओथंबलेले एक प्रवचन ऐकावे लागते. त्याची परिणती 'हे आकाशातल्या बापा, ह्याला क्षमा कर; कारण की तो काय बोलत आहे त्याला समजत नाही.' अशा माझ्यातर्फेच्या याचनेमध्ये होते. एकदाचं हे प्रकरण निस्तरावं म्हणून मी 'आमेन' म्हणतो; त्यावर 'आम शब्द सुद्धा काढू नको तोंडातून! चवच नाही तुला खऱ्या भारतीय आंब्याची; तूच खा ते मेक्सिकन काय ते!' ही दटावणी ऐकावी लागते.

हे शेवटचं दूषणही संपूर्णपणे खरं नसतं; कारण खरं तर मला कुठल्याच देशातल्या आंब्याचं फार असं कौतुक नाही. पण हा सूक्ष्म फरक आत्ता समजावून देणं ह्या क्षणी माझ्या हिताचं नाही हे समजण्याएवढा सूज्ञपणा माझे अंगी आहे. म्हणजे चांगलं आहे फळ तसं, पण माझ्या सर्वाधिक लाडक्या सफरचंदाएवढं नाही, हे बोलायची ही वेळ नव्हे, मला समजतं! कदाचित त्याच्या त्या खुशालचंद शी साम्य असणाऱ्या नावाचा परिणाम असेल, कदाचित माझ्या लहानपणच्या मुंबईत सफरचंद तसं थोडं दुर्मिळ किंवा महागडं असण्याचा परिणाम असेल आणि अर्थातच रत्नागिरी हे कोंकणातील एकमेव स्थळ (जागा अशा अर्थाने!) लग्नानंतर प्रथम पाहिलं असण्याचा, मुंबईमधील लहानपण घरामागे नसलेल्या आमराईमध्ये खेळण्यात कधी न गेल्याचा परिणाम असेल - पण मला सफरचंद हेच फळ सगळ्यात जास्त आवडतं. इथे सफरचंद मिळतातही बारा महिने, आणि शिवाय वेगवेगळ्या प्रकारची! एकटा असतांना अनेक वेळा दोन सफरचंद, पीनट बटर आणि दूध हे माझं जेवण असे. द्राक्षं, ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, पेअर्स, प्लम्स ही सगळीच आवडती फळं; त्यातलाच एक आंबाही. पण आंबा, केळी, अननस ही सगळी फळं वासाची आणि चवीची फार दादागिरी करतात; 'माय वे ऑर हायवे' थाटाची! फ्रुट सॅलड मध्ये जर्रा जमवून घेत नाहीत दुसऱ्याशी. मीटिंगमध्ये दुसऱ्यांना तोंड उघडू न देणाऱ्या भसाड्या आवाजाच्या, स्वतःच्याच जोक्सवर खिदीखिदी हसत बसून दुसऱ्यांना गप्प बसवून ठेवणाऱ्या धेंडांसारखी. संत्री तशी बरी असतात, पण त्यांची सालं, दोरे आणि बिया काढण्याचे कष्ट फार - म्हणून मी त्यांच्या फार जवळ जात नाही. इथल्या चिन्यांना काय एवढं आवडतं त्या संत्र्यांमध्ये बुद्धच जाणे; जेवणानंतर सालासकटच्या संत्र्याच्या फोडी आणून ठेवतात बिलाबरोबर.
जाऊ दे; हे विषयांतर झालं! ह्यापुढचा प्रायश्चित्त विधी चांगलाच परिचयाचा आहे. लवकरच, घरात दुधी किंवा घोसाळ्याची भाजी होईल. 'हे काय?!? मी पोळी कशाशी खाणार!' ह्या भेदरलेल्या प्रश्नावर, 'महाभारत' मधल्या कृष्णाच्या स्निग्ध हास्यासमवेत 'सफरचंदाच्या फोडींबरोबर खाता येईल ना. चिरू का?' अशी प्रेमळ पृच्छा होईल. नंतर 'का त्या दिवशी रत्नागिरी हापूसचा आणि मेक्सिकन आंब्यांचा एका वाक्यात उल्लेख करण्याची दुर्बुद्धी झाली' असा माझा दीन-पतित-अन्यायी पश्चात्तापदग्ध चेहरा बघून, शेवटी करुणासागर उचंबळून येईल, आणि 'परवा पटेलकडे घोसाळी घेतांना रत्ना मँगो पल्पचा कॅन पण आणून ठेवलेला आहे. तेवढा उघडून दे जरा.' असा उ:शाप कानी पडेल. मग शंभर वेळा 'तूच गं, तूच!' हा धडा गिरवून, एकदाची दोन डाव भाजी कशीबशी संपवून, रत्ना आमरसाबरोबर पोळ्या खाता येतील. 'अडीनडीला उपयोगी पडणे' एवढा आंब्याचा एक गुण मान्य करायला हवा.
डोळ्याच्या कडेतून मी काऊंटरवरच्या सफरचंदाला धीर देत असतो, 'डरो मत! हमारी यारी तो उम्रभरकी है! तू तो मेरा पहला प्यार है.'
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...