वाढदिवसानिमित्त अमिताभला अनंत हार्दिक शुभेच्छा... आणि हा एक छोटासा कल्पनाविलास भेट!
* * * * *
- अगला प्रश्न है पचास लाख रुपयोंके लिए. इनमेंसे कौनसी फ़िल्ममें हमने, याने अमिताभ बच्चनने, मुख्य किरदार * नहीं * निभाया था? आपके सामने चार विकल्प हैं; ये चार फिल्मोंके नाम हैं; जिनमेंसे आपको वो फ़िल्म बतानी है जिसमे हमने काम - नहीं - किया था. आपके विकल्प रहें ये: ए आपकी कसम, बी जंज़ीर, सी त्रिशूल और डी मिस्टर नटवरलाल!
... हे भगवान! फारच विचारात पडलंय हे पोर! काय वय असेल ह्याचं? सतरा? अठरा? माहिती तरी असतील का ह्याला हे सिनेमे?...
- सर, सोच रहा हूँ मैं लाईफ लाईन लूँगा
... लाईफ लाईन? हुं:, फार बेभरवशाची असते रे बाबा ती! कुठे काचलेली असेल, कधी तुटेल, कोणाला माहित! एका फडतूस सिनेमामधला एक नेहमीचा बकवास शॉट... शेकडो वेळा केलेली ऍक्टिंग... पण सगळं बिनसायला फक्त एक क्षण लागतो. आणि काल होतो, उद्या असेन ह्याचाही भरवसा न राहण्यासारखी परिस्थिती होते. असण्यानसण्याची चिंता करायला आपल्याला शुद्धबुद्धही नसते. अस्सल नास्तिकालाही 'आज खूष तो बहोत होगे ना तुम!' म्हणावंसं वाटावं, असा एखाद्या दैवी शक्तीवर विश्वास बसायला लावेल अशी ती वेळ. आणि, लाईफ लाईन... अशी मागून मिळत नाही बाबा. कोट्यवधी चाहत्यांच्या प्रार्थना, नवस आणि कुशल डॉक्टर्स लागतात ती बळकट ठेवायला...
- सर... मैं लाईफ लाईन लूँगा!
... अं? हां, हो. ही ती खेळातली लाईफ लाईन नाही का! पण एवढ्यातच? हां, येते कधीकधी अशी परिस्थिती आयुष्यात. सगळी संकटं अगदी एकाच वेळी येऊन टपकतात! काय करावं कळेनासं होतं. मी नव्हती का घेतली एखाद दोनदा लाईफ लाईन? फोन-अ-फ्रेंड मला वाटतं. गंमत अशी, की जेव्हा खरी गरज असते, तेव्हा फोन उचलणारे फ्रेंड्स सगळे एकाएकी गायब झालेले असतात... नाही, पण तरीही, ह्या सोप्या प्रश्नावर लाईफ लाईन?...
- मान्यवर, आपके पास दो लाईफ लाईन अभी जीवित हैं. आप उनमेंसे कोई अवश्य इस्तेमाल कर सकते हैं. तो, आपको नहीं पता, की इनमेंसे कौनसी फिल्में हमारी हैं? आप फ़िल्म वगैरह में रुची रखते हैं या नहीं?
- सर, ज्यादा नहीं. मेरे पिताजी इस्कुल टीचर हैं. उनका पुरा विश्वास है, की सारा ग्यान किताबो और पढाईमेंही है. ग़लत मत समझिये सर, लेकिन फिल्में देखना हमारे घरमें ज्यादा पसंद नहीं है. फिर ये तो सारी बहुत पुरानी फिल्में हैं ना?
- सर, ज्यादा नहीं. मेरे पिताजी इस्कुल टीचर हैं. उनका पुरा विश्वास है, की सारा ग्यान किताबो और पढाईमेंही है. ग़लत मत समझिये सर, लेकिन फिल्में देखना हमारे घरमें ज्यादा पसंद नहीं है. फिर ये तो सारी बहुत पुरानी फिल्में हैं ना?
... हो ना, बाबूजींना सुद्धा मी सिनेमात येणं तेवढंसं पसंत नव्हतं. त्यांचा कल, त्यांच्या आवडी, त्यांचं वर्तुळ, घरातलं वातावरण सगळं पार वेगळं होतं. अर्थात, मला त्यांनी काही विरोध किंवा आडकाठी नाही केली कधी. आणि हां, बहुत पुरानी तर आहेतच रे पोरा! वयच ते काय तुझं! तुला रणबीर सिंग आणि दीपिका पदुकोण वयस्कर वाटत असणार; मी तर इतिहासकालीनच! मीही सिनेमात हिरो होतो हे माहिती असणं सुद्धा खूप म्हणायचं! आईबाबांना विचारून बघ; त्यांना कदाचित त्यांच्या लहानपणीचं आठवेल. काय दरारा होता माझा! नुसत्या एकट्याच्या नांवावर सिनेमे हिट जात होते, सिल्व्हर आणि गोल्डन ज्युबिल्या. बाकीचे सगळे रोमँटिक, चिकनेचुपडे हीरोज एकीकडे, आणि मी एकटा एका बाजूला, आणि तरीही माझंच पारडं जड! त्या आपकी कसम वाल्या हिरोची तर ऐसीतैसी छुट्टी करून टाकली होती. माझ्या सगळ्या फिल्म्सची यादी माझ्या चाहत्यांना मुखोद्गत होती. नांवं तर नांवं, माझे डायलॉग्ज तोंडपाठ असत लोकांना. आणि इथे तुला ह्या चारापैकी माझे तीन सिनेमे ओळखता येऊ नयेत...
- हां साहब, तो बताईये कौनसी लाईफ लाईन यूज करेंगे आप?
- सर, मैं ऑडियन्स पोल लेना चाहूंगा.
- सर, मैं ऑडियन्स पोल लेना चाहूंगा.
... ऑडियन्स पोल, हं? मी ही एकदा घेतलं... पण विरुद्ध गेलं ते माझ्या. एकेकाळी डोक्यावर घेणारा हा ऑडियन्स... एकाएकी मला खांद्यावरून फेकून देऊन मोकळाही झाला. एकेकाळी वाट्टेल त्या हास्यास्पद सिनेमांना मी हात लावल्याक्षणी त्यांचं सोनं होत होतं; आणि नंतर... दहा ठिकाणी चाचपडून पाहिलं तरी हाताला फक्त मातीच लागत होती. केलेली प्रत्येक गोष्ट चुकतच होती. आयुष्यात जेवढे पैसे मिळतील असं स्वप्नही पाहिलं नव्हतं, त्यापेक्षा जास्त कदाचित गमावून बसलो. कर्जबाजारी झालो. तुला तरी ऑडियन्स ची साथ मिळू दे बाबा! ...
- ठीक है. ऑडियन्स, आपकी बारी आ गयी है. और आपका समय शुरू होता है, अब्ब! ... - ओहो S! सेव्हन्टी एट पर्सेंट सिलेक्टेड ऑप्शन ए. याने, 'आपकी कसम' हमारी फिल्म नही है. क्या करना चाहेंगे आप?
- सर, मैं ऑडियन्स के साथ जाऊंगा. ऑप्शन ए, लॉक कर दीजिए.
- बिलकुल सही जवाब! आप जीत गए हैं पचास लाख रुपये!
- थँक यू सर! बहोत बहोत शुक्रिया आपका!
- अजी मैंने तो कुछ भी नहीं किया. सारी तारीफ़ तो ऑडियन्स की है. इन्होंने तो आपको जीतवाया.
- सर, मैं ऑडियन्स के साथ जाऊंगा. ऑप्शन ए, लॉक कर दीजिए.
- बिलकुल सही जवाब! आप जीत गए हैं पचास लाख रुपये!
- थँक यू सर! बहोत बहोत शुक्रिया आपका!
- अजी मैंने तो कुछ भी नहीं किया. सारी तारीफ़ तो ऑडियन्स की है. इन्होंने तो आपको जीतवाया.
... यश जी मला हेच म्हणाले होते, मोहब्बतें च्या यशानंतर! त्यानंतरच दिवस पुन्हा पालटू लागले होते. मी तोच होतो; माझ्या भूमिका बदलायला लागल्या होत्या. मला वाटतं यश जीं च्याच बरोबर मी ती नुकतीच आलेली कुठली हॉलिवूड फिल्म पाहिली होती. एका माणसाचं दैनंदिन आयुष्य हेच कसं लाखो प्रेक्षकांचं मनोरंजन ठरतं. देशभर लोक त्याच्या आयुष्यातल्या लहानसहान घटनांवर, त्याच्या प्रत्येक प्रतिक्रियेवर, त्याच्या कुटुंबावर मतं व्यक्त करतात; उद्या त्याच्या आयुष्यात काय घडेल ह्याची उत्सुकतेने वाट बघतात. शो, शोमॅन आणि व्यक्तिरेखा ह्यातल्या रेषाच अस्पष्ट होत जातात. फार आवडली होती मला ती फिल्म! खैर… हिंदीत कुठे अशा फिल्म्स! मी मात्र मिळेल त्या कामांमधून पूर्वी पाहिले नव्हते असे पैसे मिळवत गेलो...
- क्या कीजियेगा इतनी सारी धनराशी लेकर? पचास लाख जीत गए हैं आप.
- सर, पहले तो पिताजीका जो कर्जा बाकी है, वो चूका दूँगा. थोड़े बाजूमें रख दूँगा, ताकि फिर कभी भूखे पेट सोनेकी नौबत न आये.
- सर, पहले तो पिताजीका जो कर्जा बाकी है, वो चूका दूँगा. थोड़े बाजूमें रख दूँगा, ताकि फिर कभी भूखे पेट सोनेकी नौबत न आये.
... शाब्बास; ते कर्ज सर्वप्रथम फेडून टाक! लोकांच्या प्रेमाचं, कौतुकाचं ऋण असावं; लोकांच्या पैशाचं कर्ज कधी नको! फार वाईट मनःस्थिती असते ती. मोहब्बतें नंतर मी ठरवलं, ताठ मानेने जगायचं. त्यासाठी लागतील ते कष्ट करायचे, पण काय वाट्टेल ते झालं तरी पुन्हा कधी कर्जबाजारी नाही व्हायचं. इथपासून फक्त एकच भूमिका मी निभावली - एका सभ्य, सुसंस्कृत फॅशन आयकॉनची, एका रुबाबदार आणि जबाबदार नागरिकाची! मिळतील ती कामं, प्रौढ भूमिका, स्पेशल अपीअरन्स, ब्रँड अम्बॅसॅडर, जाहिराती सगळं स्वीकारत होतो मी. पण आता पडद्यावरील व्यक्ती आणि अभिनेता, अभिनेता आणि अभिनय, ह्यातला भेदभावच नष्ट झाला. मी सिनेमांच्या पलीकडे जाऊन पोचलो. 'अमिताभ बच्चन' हाच एक सुपरहिट ब्लॉक बस्टर शो झाला! ...
- बहोतही समझदार सोच है आपकी! चलिए आगे बढ़ते हैं. अगला प्रश्न या तो आपको पचहत्तर लाख मिलवा देगा, या तो सीधा तीन लाख बीस हज़ार तक नीचे ले जायेगा. पचास लाख जीतनेके बाद क्या आप आगे खेलके रिस्क लेना पसंद करेंगे, या यहींपर रिटायर होकर यह पूँजी घर ले जायेंगे?
- सर, पचास लाख बड़ी रक़म तो जरूर है; लेकिन मुमकीन तो सात करोड़ हैं! और मेरे पास एक लाइफ़लाइन भी है. मैं आगे खेलना चाहता हूँ.
- सर, पचास लाख बड़ी रक़म तो जरूर है; लेकिन मुमकीन तो सात करोड़ हैं! और मेरे पास एक लाइफ़लाइन भी है. मैं आगे खेलना चाहता हूँ.
... वाह बेटा! लोक मला विचारतात, एवढे पैसे मिळवून, ह्या वयात आता आणखी काय करायचंय? त्यांना समजत नाही, ही पैशाची गरज नसते, हाव नसते. फक्त जोपर्यंत हातपाय चालतात, तोपर्यंत काम करत रहायचं एवढा साधा विचार असतो. कितीही टेकड्या ओलांडल्या, तरी डोंगरांना अंत नसतो. डोंगर आहेत, आणि पाय साथ देताहेत तोपर्यंत ते चढून जाणं, पार करणं आणि क्षितिजापलीकडे नजर ठेवणं - धर्म है मनुष्यका!...
- शाब्बाश! तो दोस्तों, एक छोटीसी ब्रेक के बाद जल्द ही हम ये अद्भुत खेल जारी रखेंगे, जिसका नाम है जीवन! कहीं भी जाइएगा मत!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...