एझेन्झेलेनीहून
परतल्यावर, कुमालोंनी त्यांच दुपारचं
जेवण मिशन हाउस
मध्ये घेतलं, आणि
गर्ट्रूडच्या मुलाबरोबर खेळायला ते
परत आले. मिसेस
लिथबींनी गर्ट्रूडच्या सामानासाठी एक गिऱ्हाईक
मिळवलं होत, आणि
जोरजोरात घासाघीस चालू होती. टेबल-खुर्च्या
भांडी-कुंडी सगळ
विकून तीन पौंड
मिळाले - मुळीच वाईट नाही,
कारण त्या टेबलाचा
रंग उडाला होता,
आणि त्याला बरेच
डाग पडले होते
- कसले, ते ते
विचारत बसले नाहीत.
खुर्च्या सुद्धा एवढ्या लेच्यापेच्या
होत्या, की बसतांना
जपूनच बसायला लागायचं.
खर म्हणजे ती
किंमत भांड्यांमुळे आली
होती. अल्युमिनम नावाचा
काही जिन्नस असतो म्हणे! आता, काळ्या
लोकांकडे सहसा असली
भांडी नसतात. पण
त्यांची बहीण म्हणाली काही मित्रांकडून
तिला ती भेट
म्हणून मिळाली होती. पुन्हा,
कुमालो फार खोलात
शिरले नव्हते.
ह्या पैशांनी तिला बूट
आणि रेनकोट घ्यायचा
होता; पावसाळ्याला सुरुवात
होत होती. कुमालोंना
मान्य होतं ते,
कारण त्यांनी आणलेल्या
नवीन लाल ड्रेस,
आणि पांढऱ्या टोपीबरोबर
तो जुना कोट
आणि बूट शोभत
नव्हते.
सगळं समान ट्रकात
भरून, पैशाची देवाण-घेवाण होऊन ट्रक
गेला. आता कुमालो
त्या लहान मुलाबरोबर
खेळायला लागणार, तेवढ्यात त्यांना
सिमांगु आणि तो
तरुण गोरा अधिकारी
त्यांच्या घराकडे येतांना दिसले.
भितीनी त्यांच्या काळजात धस्स
झालं. केवळ सवयीनी
त्यांनी स्वतःला घराच्या फाटकापर्यंत
ओढत आणलं. येत
असलेल्या दोघांचे ओढलेले चेहरे
आणि हलक्या आवाजातली
कुजबुज त्यांच्या नजरेतून सुटली
नाही.
-
गुड आफ्टरनून,
उम्फुन्डीस. मला थोडं खाजगीत बोलायचं होत तुमच्याशी.
-
आपण माझ्या
खोलीत जाऊ - त्यांना स्वतःचा आवाज ओळखेनासा झाला होता.
त्यांनी खोलीच दार बंद केलं
आणि त्या दोघांकडे
न बघता ते
निश्चल उभे राहिले.
-
मला बातमी
मिळाली, की तुमची भिती खरी ठरली आहे.
कुमालो मान झुकवून
तसेच उभे होते, ते त्यांच्या खुर्चीत जाऊन बसले - नजर जमिनीला खिळवून.
काय बोलणार आता? त्यांच्या
खांद्यावर हात ठेवायचा, का नुसतं हातानी थोपटायचं? काहीच समजत नसल्यासारखं सिमांगु
आणि तो गोरा मनुष्य हलक्या आवाजात बोलत राहिले - अंत्यसमाचाराला आलेलं असावं तसं. गोऱ्या
तरुणाने त्याचे खांदे उडवले.
-
सुधारणागृहाच्या
दृष्टीनी हे वाईट झालं. मोठ्याने, निर्विकारपणे तो म्हणाला.
कुमालोंनी नुसतीच मान
हलवली, एकदा दोनदा नव्हे; चार-पाच वेळा. जणू त्यांनाही एवढंच म्हणायचं होतं, हो सुधारणागृहाच्या
दृष्टीनी ते वाईट दिसेल.
-
हो! आमच्या
दृष्टीनी ते फार वाईट दिसणार आहे. लोक म्हणणारच, आम्ही त्याला सोडायला नको होतं. अर्थात
एक आहे, ते बाकीचे दोघं काही सुधारणागृहातले नव्हते; पण गोळी ह्याने झाडली ना!
-
दोस्त,
सिमांगु आवाज शक्य तेवढा संयत ठेवून म्हणाला, उरलेल्या दोघांपैकी एक तुमच्या भावाचा
मुलगा आहे.
कुमालोंनी परत मान
हलवली. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. आणि ते मान हलवतच राहिले. जणू त्यांना एवढंच म्हणायचं
होत, हो उरलेल्या दोघांपैकी एक माझ्या भावाचा मुलगा आहे.
मग ते उभे
राहिले आणि त्यांनी
खोलीत सभोवार बघितलं
- उरलेले दोघ त्यांच्याकडे कुतूहलानी बघत होते.
त्यांनी खुंटीवरून कोट काढला
आणि अंगात घातला,
हॅट डोक्यावर घातली.
चालायची काठी हातात
घेतली, आणि त्यांच्याकडे
वळून काहीतरी पुटपुटले.
त्यांना ऐकू गेल
नाही.
-
दोस्त,
बाहेर निघालात का?
-
उम्फुन्डीस,
तुम्हाला तुरुंगात यायचं आहे
का? मी त्याची
व्यवस्था करून ठेवली
आहे.
कुमालोंनी मान हलवली
आणि वळून पुन्हा
ते खोलीत बघू
लागले. मग त्यांच्या
लक्षात आलं की
कोट आणि हॅट
त्यांनी आधीच घातली
आहे. त्यांनी ते
दोन्ही चाचपून खात्री केली,
आणि हातातल्या काठीकडे
बघितलं.
-
पहिल्यांदा
माझ्या भावाकडे, ते म्हणाले.
मला नुसता रस्ता
दाखवा.
-
ठीक
आहे दोस्त, दाखवतो
मी.
-
मी
इथे मिशन मध्येच
थांबतो. तो गोरा
म्हणाला.
सिमांगु दार उघडायला
जाणार, तेवढ्यात कुमालोंनी त्याला
थांबवलं. मी हळू
हळू पुढे चालायला
लागतो; तुम्हाला त्यांना सांगायला
हव - त्यांनी नुसतं
खुणेनी दाखवलं.
-
सांगतो
मी त्यांना.
त्याने त्या बायकांना
बातमी दिली. त्या
रिवाजाप्रमाणे हंबरडा फोडून आक्रोश
करत असतांनाच त्याने
दरवाजा लावून घेतला. रस्त्यावरची
पार वाकलेली, मान
हलवत चाललेली आकृती
त्याला दिसत होती.
लोक वळून त्यांच्याकडे
बघत असलेले त्याला
दिसत होते. आता
वृद्धत्व त्यांचा असा झपाट्यानी
कब्जा घेणार का?
ते भयानक मान
हलवत राहणं असंच
चालू राहणार का?
मग लोकं म्हणणार
'ह्या:, सोडून द्या! वय
झालंय त्यांचं, आजकाल
काही आठवत नाही
त्यांना'! आणि तेही
मान हलवणार, जणू
काही म्हणताहेत 'सोडून
द्या! वय झालंय
माझ; आजकाल काही
आठवत नाही मला'!
पण कोणाला जाणवेल,
त्यांना म्हणायचंय 'आजकाल माझ्याकडे
फक्त आठवणीच राहिल्या
आहेत'?
सिमांगुने त्यांना टेकडीच्या माथ्यावर
गाठलं, आणि एखाद्या
लहान मुलाचा किंवा
आजारयाचा हात धरून
चालावं, तसा त्यांचा
हात धरून तो
चालू लागला. ते
त्यांच्या भावाच्या दुकानाजवळ आले.
तिथे कुमालो वळले;
त्यांचे डोळे मिटलेले
होते, आणि ओठ
थरथरत होते. मग
ते सिमांगुकडे वळून
म्हणाले
-
पुढे
येऊ नका तुम्ही.
मलाच हे करायला
हव.
आणि मग ते
दुकानात गेले. होय! तो
बुलंद, भसाडा आणि आत्मसंतुष्ट
आवाज होताच तिथे.
त्यांचा भाऊ जॉन
एका खुर्चीवर बसून
मुखियासारखा इतर दोन
माणसांशी बोलत होता.
त्याने भावाला ओळखल नाही,
कारण रस्त्यातला उजेड
त्यांच्या पाठीमागून येत होता.
-
गुड
आफ्टरनून, भाऊ.
-
गुड
आफ्टरनून, साहेब.
-
अरे,
मी तुझा सख्खा
भाऊ, तुझ्याच आईचा
मुलगा.
-
अरे,
दादा, तू होय!
वा वा वा!
बरं झालं तू
आलास. ये, आमच्याबरोबर
बस इथे.
कुमालोंनी पाहुण्यांकडे बघितलं आणि म्हणाले,
सॉरी, मी पुन्हा
कामासाठी आलो आहे.
महत्वाच्या कामासाठी.
-
ओह,
ठीक आहे; माझे
दोस्त समजून घेतीलच.
माफ करा हं,
दोस्त मंडळी!
ते सगळे उठून
उभे राहिले, रितीप्रमाणे
'जपून रहा, जपून
जा' झालं, आणि
ते दोघं गेले.
-
वा,
वा, वा! खूप
बर वाटल तुला
बघून, दादा. आणि,
तुझं शोधाचं काम
कसं चाललाय? भेटलं
का ते चुकलेल
कोकरू? बघ, बघ;
मी आपल्या लहानपणचे
धडे अजून विसरलो
नाहीय!
मग तो स्वतःच
हा हा करून
हसला, ते बुलंद
हास्य! नाही, आपण आधी
चहा घेऊ या.
त्याने दाराशी जाऊन मागच्या
बाजूला चहाचा हुकुम सोडला.
-
अजून
तीच आहे, बर
का! तो म्हणाला.
बघितलस, मला सुद्धा
समजत. ते काय
म्हणतात बरं, इंग्लिशमध्ये?
पुन्हा जोरजोरात हसला, तो
भावाची थट्टाच करत होता.
एकनिष्ठा - हां, एकनिष्ठा!
चांगला छान शब्द
आहे! आता मी
सहजासहजी विसरणार नाही. ते
तुमचे सिमांगु - फार
हुशार मनुष्य, बर
का! तर, ते
चुकलेल कोकरू! भेटलं का?
-
भेटला
तो, भाऊ. पण
शाळेतल्या धड्यांमध्ये होतं तसा
नव्हे. तो तुरुंगात
आहे. एका गोऱ्या
माणसाच्या खुनाबद्दल.
-
खून?
आता त्याच्या चेहऱ्यावरच
हास्य मावळलंय. खुनाबद्दल
चेष्टा-मस्करी नाही करत
कोणी. गोऱ्या माणसाच्या
खुनाबद्दल तर मुळीच
नाही.
-
होय,
खून. पार्कवॉल्ड परिसरात,
त्याने घरफोडी केली, आणि
जो गोरा माणूस
त्याला थांबवायला आला त्याचा
ह्याने खून केला.
-
हां
हां, आठवलं! एक
दोन दिवसापूर्वीच का?
मंगळवारी?
-
होय.
-
हां,
आठवलं.
अर्थातच त्याला आठवलं. त्याला
हेही आठवलं, की
त्याचा स्वतःचा मुलगा, आणि
त्याच्या भावाचा मुलगा मित्र
होते. त्याच्या जाडजूड
मानेवरच्या शिरा तरारून
उभ्या राहिल्या आहेत,
त्याच्या कपाळावर घामाचे थेंब
दिसायला लागले आहेत. शंकाच
नाही, त्याच्या डोळ्यात
भिती आहे. तो
खसाखसा कपाळ पुसतो.
त्याच्या मनात प्रश्नांचं
मोहोळ उठलंय. पण
तो म्हणतो फक्त
एवढंच - ओ हो
हो, मला आठवलं.
त्याच्या भावाचं मन भरून
येतं. ते हळुवारपणे
त्याला सांगायचा प्रयत्न करतात.
-
भाऊ,
सॉरी.
आता काय बोलणार?
असं म्हणायचं, साहजिक
आहे तुम्हाला दु:ख झालंय?
असं म्हणायचं, बरोबर
आहे, तुमचा मुलगाच
आहे तो? असं
कसं म्हणणार, जेव्हा
आपल्याला माहिती आहे त्यांच्या
बोलण्याचा अर्थ? गप्प बसून
रहायचं? पण त्यांचे
डोळे रोखलेले आहेत...
आणि त्याचा अर्थ
उघड आहे.
-
म्हणजे
...? तो म्हणाला.
-
होय,
तो ही तिथे
होता.
जॉन पुटपुटतो 'परमेश्वरा' ... पुन्हा
एकदा 'परमेश्वरा'. कुमालो
त्याच्या जवळ येतात आणि त्याच्या
खांद्यावर हात ठेवतात.
-
मला
बऱ्याच गोष्टी म्हणता येतील
आत्ता, ते म्हणतात.
-
खर
आहे, तुम्ही बऱ्याच
गोष्टी बोलू शकाल.
-
पण
मी त्या आत्ता
नाही बोलणार. मला
समजतंय, तुझ दु:ख काय
आहे ते.
-
खरच,
तुमच्यापेक्षा जास्त कोण समजू
शकेल ते?
-
ती
एक गोष्ट मीही
म्हणेन. मिशन हाउस
मध्ये एक गोरा
माझ्यासाठी, मला तुरुंगात
घेऊन जाण्यासाठी थांबलाय.
कदाचित तो तुलाही
यायला देईल.
-
दादा,
थांब; मी माझी
कोट-टोपी घेऊन
येतो.
ते चहासाठी थांबत नाहीत,
सरळ मिशन हाउसच्या
रस्त्याला लागतात. सिमांगु त्यांची
आतुरतेनी वाट बघत
असतो. म्हातारे कुमालो
आता बरेच ताठ
चालताहेत, तरणे कुमालो
मात्र कंबरेत वाकले
आहेत आणि मोडून
पडल्यासारखे दिसताहेत. तो गुलाबी
गोबऱ्या गालांचा, इंग्लंडहून
आलेला प्रिस्ट कुमालोंचे
हात हातात घेतो.
काहीही, तो म्हणतो,
काहीसुद्धा. तुम्ही नुसतं सांगा
मला, काहीही करायची
माझी तयारी आहे
तुमच्यासाठी.
* * *
तुरुंगाच्या
कठोर आणि प्रचंड
भिंतीमध्ये असलेल्या मोठ्या दारारून
ते प्रवेश करतात.
गोरा तरुण तिथल्या
लोकांशी बोलतो, आणि सगळी
व्यवस्था होते. जॉन कुमालो
एका खोलीत जातो.
तो गोरा तरुण
स्टीफन कुमालोंच्या बरोबर दुसऱ्या
एका खोलीत जातो.
तिथे त्यांच्या मुलाला
आणलं जात.
ते दोघं हस्तांदोलन
करतात. खर तर,
कुमालो त्यांच्या मुलाचा हात
त्यांच्या दोन्ही हातांत घेतात.
त्यांच्या डोळ्यातून झरझर ओघळणारे
अश्रू हातांवर पडतात.
तो मुलगा तिथे
दु:खी चेहऱ्याने
उभा आहे, जरासुद्धा
आनंद नाहीय त्याच्या
डोळ्यात. ते ढगळ
कपडे जणू त्याला
फार काचत असावेत
अशा थाटात तो
सारखी मान अस्वस्थपणे
फिरवत असतो.
-
बाळा,
माझ्या बाळा!
-
बाबा?
-
भेटलास
रे एकदाचा मला!
-
हो,
बाबा.
-
फार
उशीर खाला रे.
मुलगा काही उत्तर
देत नाही, जणू
काय उत्तर न
देण्यानीच काही बरं
होईल. बाबा पुन्हा
विचारतात - उशीर झाला
ना फार? काहीच
उत्तर नाही. पुन्हा
एकदा, जणू एखाद्या
आशेनी - उशीर नाही
झाला खूप? मुलगा
नुसतीच मुंडी इकडून तिकडे
हलवतो. त्याच्या नजरेला गोऱ्या
तरुणाची नजर भेटते
- तो नजर चुकवतो.
बाबा, तुम्ही काय
म्हणाल ते बाबा
- तो उत्तर देतो.
-
कुठे
कुठे शोधलं रे
मी तुला.
ह्यावरही काही उत्तर
नाही. म्हातारा त्याची
पकड सैल सोडतो
- आणि मुलाचा हात
निर्जीवपणे सुटून खाली पडतो.
एक अदृश्य भिंत
आहे, तटबंदी आहे
दोघांच्या मध्ये.
-
ही
असली भयानक गोष्ट
का केलीस रे
बाळा?
गोरा तरुण चमकून
बघतो, गोऱ्या वॉर्डनच्या
चेहऱ्यावरची रेषाही हलत नाही
- कदाचित ही बोलीभाषा
त्याला समजत नसेल.
मुलाचे डोळे ओले
आहेत, तो नुसतीच
मान इकडून तिकडे
हलवतो पण उत्तर
देत नाही.
-
सांग
मला, बाळ.
-
मला
माहिती नाही.
-
रिव्हॉल्व्हर
कशाला बाळगत होतास?
आता तो गोरा
वॉर्डनसुद्धा चमकतो. झुलु, इंग्लिश
आणि आफ्रिकान्स सगळ्याच
भाषांमध्ये हा शब्द
एकच आहे. मुलगा
सुद्धा थोडा चाळवतो.
-
संरक्षणासाठी.
हे जोहानसबर्ग फार
खतरनाक शहर आहे.
कधी तुमच्यावर कोणी
हल्ला करेल सांगता
येत नाही.
-
पण
ते ह्या घरात
कशाला न्यायचं?
ह्या प्रश्नाला उत्तर नाहीय.
-
बाळ,
त्यांना सापडलंय ते?
-
होय,
बाबा.
-
आणि
त्यांना शंका नाही
ते तुझं होत?
-
मी
सांगितलं त्यांना, बाबा.
-
काय
सांगितलस?
-
मी
सांगितलं, तो गोरा
माणूस आल्यावर मी
घाबरलो, म्हणून मी गोळी
झाडली. त्याला मारायचा माझा
हेतू नव्हता.
-
आणि
तुझा चुलत भाऊ?
आणि तो तिसरा
मुलगा?
-
सांगितलं
मी त्यांना. ते
माझ्याबरोबर होते. पण गोऱ्या
माणसावर गोळी मी
झाडली.
-
चोरी
करायला गेला होतास
तू तिथे?
पुन्हा, ह्या प्रश्नाला
उत्तर नाहीय.
-
बाळा,
सुधारणागृहात होतास ना तू?
मुलगा त्याच्या बुटाकडे बघतो
आणि जमिनीवर घासतो.
होतो मी तिथे.
त्यांनी नीट वागवलं
ना तुला? पुन्हा
त्याचे डोळे ओले
आहेत, पुन्हा तो
मान इकडून तिकडे
हलवतो. नजर बुटावर
खिळवतो आणि नुसता
पाय पुढे मागे
घासतो. चांगलं वागवलं त्यांनी
मला.
-
आणि
बाळा, अशी परतफेड
केलीस तू त्याची?
पुन्हा, ह्या प्रश्नाला
उत्तर नाहीय. आता
तो गोरा तरुण
पुढे येतो, त्याला
माहित्येय ह्यातनं काहीच निष्पन्न
होणार नाहीय, ह्याला
अंतच नाहीय. कदाचित
त्याला ते दोघं
एकमेकाला असे कुरतडतांना
बघायला नको झालं
असेल.
-
अब्सलम?
-
साहेब?
-
मी
मिळवून दिलेली नोकरी तू
का सोडून दिलीस?
समजून घे गोऱ्या तरुणा, तुलाही उत्तर मिळणार
नाहीय. असल्या प्रश्नांना उत्तरं
नसतात.
-
आणि
तुझी ती पोरगी?
तिच्यासाठी आम्ही तुला जायला
दिलं. तुला तिची
एवढी काळजी होती
म्हणून आम्ही दया केली
तुझ्यावर.
पुन्हा त्या डोळ्यांमध्ये
पाणी तरारत आहे.
कोणास ठाऊक, त्या
एकाकी सोडून दिलेल्या
मुलीसाठी तो रडतोय?
कोणास ठाऊक, मोडलेल्या
वचनांसाठी तो रडतोय?
कोणास ठाऊक, कुटुंबासाठी
कष्ट करून पैसे मिळवणाऱ्या,
कायदे पाळणाऱ्या, कर
चुकते करणाऱ्या, पैसे
वाचवणाऱ्या, मुलांवर माया करणाऱ्या
दुसऱ्याच एका जीवासाठी
तो रडतोय - असा
जीव, जो नेहमी हरतच आलाय.
का तो एकुलत्या
एका स्वतःसाठी रडतोय
- जाऊ दे, सोडून
द्या, असू दे
ना असंच, म्हणून.
ह्या सगळ्या निर्दय
प्रश्नांपासून – का, का, का
– च्या ओरड्यापासून सुटका व्हावी
म्हणून रडतोय? त्याला स्वतःलाच
माहिती नाही, का. त्यातलं
कोणी त्याच्याशी बोलत नाही, थट्टा-मस्करी
करत नाही, ते
बसत नाहीत, त्याला
एकटा सोडत नाहीत.
नुसतं सारख विचारत
राहतात – का, का,
का – त्याचे वडील,
तो गोरा, तुरुंगातले
अधिकारी, पोलिस, मॅजिस्ट्रेट –
का, का, का.
तो गोरा तरुण
खांदे उडवतो, निर्विकारपणे
हसतो. पण तो
निर्विकार नाहीय. त्याच्या डोळ्यांमध्ये
दुखावल्याची भावना आहे.
-
तर,
हे असंच चालतं
जग!
-
मला
एका प्रश्नाचं उत्तर
दे, बाळ. देशील?
-
हो
बाबा, देईन.
-
तू
कधी लिहिलं नाहीस,
कधी पत्रं पाठवली
नाहीस, असल्या मवाल्यांच्या संगतीत
राहिलास, चोऱ्या-घरफोड्या केल्यास
... हे सगळं... का?
तो मुलगा ह्यातल्या एका
शब्दावर झडप घालून
त्याला चिकटून बसतो. वाईट
संगत, तो म्हणतो.
-
मी
सांगायची गरज नाही,
की हे काही
उत्तर होऊ शकत
नाही, कुमालो म्हणाले.
पण त्यांना समजतंय
की ह्या मार्गांनी
दुसर काही उत्तर
मिळणार नाहीय. बरं, समजतं
मला, की ही
संगत वाईट होती.
पण तू! तू
स्वतः! तुझ्या हातून कसं
घडलं हे सगळं?
कसे कुरतडताहेत दोघं एकमेकाला!
तो मुलगा, घायाळ,
पुन्हा एकदा आवेगानी
म्हणतो. सैतान संचारला होता
माझ्यात!
अरे बाळा, त्या सैतानाशी
तू झगडलास का?
त्याच्याशी चार हात
केलेस का? रात्रंदिवस,
अंगातून घाम निथळेपर्यंत,
अंगातली सगळी शक्ती
नष्ट होईपर्यंत त्याच्याशी
झगडलास का? तुझ्या
चुकांबद्दल, पापांबद्दल रडलास का?
सुधारायची शपथ घेतलीस
का? ताठ उभ
रहायचा प्रयत्न केलास का?
अडखळून पुन्हा पडलास का?
ते बोल रे, ते सांग.
ह्या जखमी म्हाताऱ्या
जीवाला तो थोडा
तरी आधार असेल.
तो हताश होऊन
एवढंच विचारतोय की
तू झगडा का
नाही केलास. मुलगा
पुन्हा त्याच्या पायांकडे बघत
म्हणतो, मला माहिती
नाही.
म्हातारा थकलाय, आणि मुलगा
थकलाय, आणि भेटीची
वेळ
संपत आल्येय. गोरा
तरुण पुन्हा त्यांच्या
जवळ येतो. त्याला
त्या मुलीशी लग्न
करायची इच्छा आहे अजून?
तो कुमालोंना विचारतो.
-
तुला
त्या मुलीशी लग्न
करायची इच्छा आहे अजून,
बाळ?
-
होय,
बाबा.
-
मी
बघतो मला काय
जमतंय, तो तरुण
म्हणतो. आपल्याला निघायला हव
आता.
-
आपण
परत येऊ शकू?
-
हो,
तुम्ही परत येऊ
शकाल. मी बाहेर
पडताना विचारेन, भेटीच्या वेळा
काय आहेत.
-
जपून
राहा, बाळ.
-
जपून
जा, बाबा.
-
बाळ,
मला वाटत तुला
इथे पत्रं लिहिता
येतील. पण मी
पुन्हा येईपर्यंत तुझ्या आईला
काही कळवू नको.
मी तिला आधी
लिहीन.
-
चालेल,
बाबा.
ते जातात; दरवाजापाशी त्यांना
जॉन कुमालो भेटतो.
तो धिप्पाड, बुलंद
माणूस आता चांगलाच
सावरला आहे.
-
वा,
वा, वा! तो
म्हणतो, आपल्याला लागलीच जाऊन
एक चांगला वकील
शोधायला हवा.
-
भाऊ,
वकील? एवढे प्रचंड
पैसे कशाला घालवायचे?
घडली ती गोष्ट
साधी सरळ आहे
ना, ह्यात तर
काही शंकाच नाही.
-
काय
गोष्ट घडली नेमकी?
जॉन कुमालोने विचारलं.
-
घडलं
ते? हे तीन
मुलगे त्या घरात
गेले, त्यांना वाटलं
होतं ते रिकामं
आहे. त्यांनी त्या
नोकराला मारून खाली पाडलं.
गलका ऐकून गोरा
मनुष्य जेव्हा बाहेर आला,
तेव्हा... तेव्हा... माझ्या मुलाने
- माझ्या, बरं का,
तुझ्या नव्हे - त्याला गोळी
झाडली. तो म्हणतो
तो घाबरला होता.
-
ओ
हो हो हो,
आहे खरी गोष्ट
तशी! त्याच्या जीवात
जीव आल्यासारखं दिसतंय.
नाही, आहे बुवा
खरी गोष्ट तशी.
आणि त्याने ही
गोष्ट सर्वांच्या समोर
तुम्हाला सांगितली म्हणता?
-
का
नाही, खरीच आहे
ना ती?
जॉन कुमालोचा जीव नक्कीच
भांड्यात पडलाय. नाही, मग
तुम्हाला कदाचित वकिलाची जरूर
नसेल. त्याने जर
त्या गोऱ्याला मारलं
असेल, तर मग
काय, बोलणच खुंटल,
नाही का?
-
तुला
अजूनही वकील हवा
आहे?
जॉन कुमालोच्या चेहऱ्यावर एक
स्मित तरळलं. हो,
मला बहुतेक वकिलाची
गरज लागेल. एक
तर, वकील माझ्या
मुलाशी खाजगीत बोलू शकेल.
तो थोडा विचार
करतो, मग भावाला
म्हणतो. हे बघ
दादा, माझा मुलगा,
किंवा तो तिसरा
मुलगा तिथे होता
ह्याला पुरावा काहीच नाही ना!
जॉन कुमालोच्या चेहऱ्यावर
त्याचं ते धूर्त
हास्य झळकत. तो
आता पूर्णपणे सावरला
आहे.
-
ते
तिथे नव्हतेच? पण
माझा मुलगा...
-
हो,
हो, बरोबर आहे.
जॉन कुमालो त्याचं
बोलण मध्येच तोडतो,
आणि पुन्हा हसतो.
पण विश्वास कोण
ठेवेल हो, तुमच्या
मुलावर? तो विचारतो.
त्याला त्यातला पूर्ण अर्थ
- दुष्ट आणि निर्दय
अर्थ - अभिप्रेत आहे. कुमालो
तिथे एकाएकी सर्वस्व
हिरावून घेतल्यासारखे, एकाकी उभे रहातात.
गोरा तरुण त्याच्या
गाडीत चढतो. कुमालो
त्याच्याकडे मदतीच्या आशेनी बघतात,
पण तो नुसते
खांदे उडवतो. निर्विकारपणे
म्हणतो, तुम्हाला करायचं असेल
ते करा. वकील
मिळवून देणं हे
माझ काम नाही,
पण तुम्हाला सोफियाटाऊनला
परत जायचं असेल,
तर मी जाईन
घेऊन तुम्हाला.
कुमालो त्याच्या थंड निर्विकारपणामुळे
जास्तच संकोचतात, आणि अनिश्चितपणे
बाहेरच उभे रहातात.
त्यांचा अनिश्चितपणा बघून गोऱ्या
तरुणाचा संताप आणखीच वाढतो
आणि गाडीबाहेर डोक
काढून तो मोठ्याने
ओरडतो.
-
वकील
मिळवून देण माझं
काम नाहीय. माझ
काम आहे सुधारणं,
मदत करणं, उद्धार
करणं.
रागारागानी
तो हात उंचावून उचलल्याचा आविर्भाव करतो. मग डोकं
गाडीत आत घेतो,
आणि गाडी सुरु
करायला लागतो. पुन्हा मन
बदलून बाहेर डोकावतो.
-
फार
छान काम आहे
हे, तो म्हणतो,
अतिशय सुंदर! उदात्त!
डोकं मागे घेतो,
पुन्हा बाहेर झुकून कुमालोंना
म्हणतो.
-
तुम्हाला
असं नको वाटायला,
की तुम्हा पाद्रीबाबांच
काम मोठ उदात्त
असत.
कदाचित त्याला जाणवलय तो
फार ओरडून बोलतो
आहे, मग तो
खालच्या आवाजात, घट्ट आवळलेल्या
ओठांमधून फिस्कारतो.
-
तुम्ही
म्हणे आत्म्याची काळजी घेता. तो
हे अशा थाटात
म्हणतो, जणू आत्म्याची
काळजी करणं हा काहीतरी भयानक विनोद
असावा. मी सुद्धा.
तुम्ही ह्या जगात
येताना आणि इथून
सोडून जाताना लोकांना
बघता. मी सुद्धा.
मी ह्या अब्सलम
कुमालोला एका नव्या
जगात जन्म घेताना
पाहिलं, आणि आज
त्याला हे सोडून
जाताना बघणार आहे.
तो कुमालोंकडे रोखून बघतो.
आपण, त्याला हे
सोडून जाताना बघणार
आहोत. त्याने पुन्हा
मान आत घेतली,
आणि गाडीच चाक
एवढ गच्च आवळून
धरल जणू तो
ते मोडणारच आहे.
यायचं आहे की
नाही तुम्हाला सोफियाटाऊनला?
तो ओरडून विचारतो.
कुमालो नकारार्थी मान हलवतात,
कारण एवढ्या परक्या
माणसाच्या गाडीतून कसं जायचं
ना? तो तरुण
डोकं बाहेर काढून
जॉन कुमालोकडे बघतो
आणि म्हणतो फार
हुशार आहात तुम्ही;
पण नशीब माझ,
की तुम्ही माझा
भाऊ नाही. तो
जोरात गाडी सुरु
करतो. आणि भर्रकन,
घसपटणाऱ्या चाकांचा कर्कश्य आवाज
करत ती गाडी
जाते. त्याची रागारागानी
बडबड चाललेलीच असते.
कुमालो त्यांच्या भावाकडे बघतात,
पण तो मात्र
नजरेला नजर भिडवत
नाही; नव्हे तो
त्यांच्याकडे पाठ वळवून
निघून जातो. अतोनात
थकून, ओढत ते
कसेबसे त्या तुरुंगाच्या
भिंतींपासून बाहेर रस्त्यात येतात.
देवा, परमेश्वरा, मला
सोडून नको रे
जाऊ; ते म्हणतात.
फादर विन्सेंटचे शब्द
त्यांना आठवतात, काही, काहीही,
ते म्हणाले होते,
मला नुसत सांगा.
ठीक तर मग,
फादर विन्सेंटकडे जाऊ.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...