ह्या पोस्टचं घोडं वरातीच्या फारच मागून येतंय मान्य! बहुसंख्यांची 'ब्लॅक मिरर' ही सिरीज कधीच पाहून झालेली असेल. नवल नाही, कारण ह्या ब्रिटिश सिरीजचा पहिला सीझन दहा वर्षापेक्षा जास्त जुना आहे. मी मात्र ती नुकतीच पाहिली (पूर्वी एकदा ब्लॅक मिरर बघायला म्हणून गेलो, आणि त्याऐवजी ब्लॅक मिरर - बॅण्डरस्नॅच बघून निराशा झाली, म्हणून सोडून दिलं होतं). – आणि मला ती फार आवडली. म्हणून, जर न बघितलेले कोणी असतीलच, तर त्यांच्यासाठी ही पोस्ट.
सर्वप्रथम अधोरेखित शीर्षटीप – ही सर्वांनाच रुचेल अशी नाही. ग्रॅच्युईटस (अनावश्यक) न्यूडिटी, सेक्शुअल कन्टेन्ट, ग्राफिक व्हायोलन्स ह्याची आता सवय झाली आहे; मात्र ह्या सिरीज मध्ये क्वचित 'पुशिंग द आन्व्हलप' वाटणारे काही प्रसंग आहेत. दुसरं म्हणजे ही सिरीज फील गुड, वॉर्म अँड फझी वगैरे अजिबात नाही; नव्हे, असलीच तर ह्याच्या बरोबर उलट – अस्वस्थ आणि बेचैन करणारी आहे. आणि तरीही, माझ्या मते अतिशय बघण्यालायक आहे – किमान ती जे विचार करायला भाग पाडते तेवढ्यासाठी.
तर मग, आहे तरी काय ह्यात? मुख्यतः ह्या वेगवेगळ्या फ्यूचरिस्टिक, क्वचित सायन्स फिक्शनही म्हणता येतील अशा कथा आहेत. तंत्रज्ञानाची प्रगती ज्या झपाट्याने चालली आहे, ते पाहता जाणीवपूर्वक ह्या गोष्टींचा काळ नक्की दिला नसावा; कारण तो कदाचित पुढच्या पाच-दहा-पंधरा वर्षात सुद्धा येऊन ठेपेल. गोष्टी अतिशय रंजक आहेत, पण प्रत्येक गोष्ट संपतासंपता, पडद्यावर आपणच तर नव्हतो? बाकीची पात्रं आपल्याच मित्रमैत्रिणींपैकी, शेजाऱ्यांपैकी लोक तर नव्हते? गोष्टींमध्ये दाखवलेला हा भविष्यकाळ आहे, का वर्तमानकाळ फक्त थोडा भडक रंगवलाय? असे प्रश्न पडू शकतात. सध्याच्या युगातली शाश्वत सत्यांना अडगळीत काढण्याची, समाजमाध्यमांवरील परावलंबित्वाची, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची, 'परस्परं प्रशंसयन्ती' छाप 'लाइक्स' मिळवण्याची, त्यालाच सर्वस्व मानण्याची, रसातळाला पोचण्याची घाई झालेली जी रॅट रेस सुरु आहे त्यावर ह्यात खूप भेदक टिपणे आहेत. आणि तरीही, हे सगळे सखोल विचार आणि भाष्य अतिशय सुंदर रचलेल्या, थोड्याशा गूढ, रंजक आणि बांधून ठेवणाऱ्या गोष्टींच्या स्वरूपात केवळ सूचित केलेलं आहे. सीरिजच्या टायटलला सार्थ करणारा हा आरसा आहे. तो ब्लॅक आहे, स्विच ऑफ केल्यानंतर दिसणाऱ्या, आपलंच प्रतिबिंब दाखवणाऱ्या, टीव्हीच्या काळ्याकुट्ट स्क्रीनसारखा! रूढार्थाने डिस्टोपिअन – म्हणजे न्यूक्लिअर विध्वंस, बेचिराख पृथ्वी, वाताहात वगैरे – नव्हे; पण तरीही आपल्याला हे असं आयुष्य हवं आहे का हा प्रश्न विचारणारा हा आरसा आहे.

ह्या सगळ्या गोष्टी एका साच्यातल्या नाहीत. काही थोड्या विनोदी धर्तीने ('नॅशनल अँथेम', ‘वॉल्डो’) सांगितलेल्या आहेत, काही थरारक उत्कंठावर्धक ('व्हाईट बेअर') आहेत, तर काही अतिशय तरल ('बी राईट बॅक', किंवा 'फिफ्टीन मिलियन मेरिट्स') आहेत. 'नोजडाईव्ह' सारखी कथा तर ऑल्मोस्ट आपल्या आसपास आजही कुठे घडत असेल असं वाटतं. सगळ्या गोष्टींमधला सामायिक घटक म्हणजे अखेरची कारुण्याची झालर. सगळ्याच गोष्टींमधल्या कल्पकतेची कमाल वाटते. माणसांमधला तुटकपणा, एलिअनेशन, आंधळा स्वार्थ, अगदी क्रूरपणा सुद्धा फक्त वाढतच जाणार – आणि ह्या मार्गाला आपण ऑलरेडी लागलो आहोत का ह्या विचाराने सुन्न वाटू लागते.
आपल्याच काळ्याकुट्ट भविष्याचा हा आरसा आपण 'करमणूक' म्हणून बघतो आहोत, हा एक विचित्र सेल्फ-डेप्रेकेटिंग विनोद वाटायला लागतो.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...