कुठच्याही पार्टी मध्ये राजकारण आणि क्रिकेटच्या खालोखाल, किंवा बरोबरीने चर्चिला जाणारा विषय म्हणजे सिनेमा!
पहिल्या दोन विषयांप्रमाणे सिनेमावर बोलायला सुद्धा काही खास ज्ञान असाव लागत नाही अशी एक सार्वजनिक समजूत आहे. त्याच समजुतीवर मी अनेक वर्ष सिनेमावर माझी ठाम आणि परखड मत सगळ्यांना ऐकवत असे; ते ऐकत नसत हा भाग वेगळा. पण अशाच एका पार्टी मध्ये मला एका विद्वानांना भेटण्याची संधी लाभली. ते विद्वान आहेत हे कोणी सांगायची गरजच नव्हती. त्यांच्याबरोबर सतत वावरणाऱ्या दोन दाढीधारी व्यक्तींकडून मी त्यांचा गाढ व्यासंग, त्यांचा महाराष्ट्रातला दबदबा, त्यांचा प्रचंड वाचक वर्ग वगैरे एवढ ऐकल, की ते विद्वान असणार ह्याबद्दल माझी खात्रीच झाली. हे विद्वान (आपण त्यांना संबोधनाच्या सोयीसाठी देशपांडे म्हणू.) त्या पार्टीमध्ये सिनेमांविषयी बोलत होते - एवढ समजल, बऱ्याच इतर गोष्टी कळत नव्हत्या. पण त्यांनी रे, घटक आणि सेन नावांच्या त्यांच्या बालमित्रांना खूप काही तरी सांगूनही त्यांनी ह्यांच ऐकल नाही आणि म्हणून 'व्हायचं ते (म्हणजे काय?) झाल' वगैरे भाग थोडा अंधुकच समजला.
'पथेर पांचाली' नावाच्या त्यांच्या आवडत्या सिनेमा बद्दल ते खूप वेळ बोलत होते. म्हणजे, खूप बोलत नव्हते; खूप वेळ बोलत होते. कारण बराच वेळ ते नुसत 'अपु' म्हणून दीर्घ श्वास घेऊन आढ्याकडे बघायचे, त्यामुळे वेळ खूप गेला. त्यातच मी 'ती रस्त्यावरच्या द्रौपदीची गोष्ट आहे का?' असा (बहुतेक चुकीचा) प्रश्न केला. या प्रश्नावर त्यांनी माझ्याकडे ज्या नजरेनी बघितलं, त्यामुळे मीच आपल आपल्या स्वतःला उद्देशून 'थू: तुझ्या जिनगानीवर' अस म्हटलं. त्यांचा श्वास बराच काळ रोखून राहिला होता. तो एकदाचा सोडल्यावर ते मला म्हणाले 'तुम्हाला सिनेमा मध्ये काय बघायचं ह्याचा काही अंदाज तरी आहे का?’
खर म्हणजे, हिंदी सिनेमांचा माझा अभ्यास कोणाच्याही तोंडात अगदी 'ढिशांव ढिशांव' मारू शकेन इतका पक्का होता. झालंच तर हॉलीवूडचेही बरेच सिनेमे (खरे इंग्रजीतून हं, नुसत्या हिंदी आवृत्त्या नव्हे) मी हौसेनी बघितले होतेच. पण ह्या प्रश्नात काही तरी गोम आहे हे मी अत्यंत चतुरपणे तत्काळ ओळखल, आणि नकारार्थी मान हलवली. त्यांनीही माझा नाद सोडला, आणि ते पुन्हा त्यांच्या वर्तुळामध्ये गोल गोल बोलायला लागले. त्यांच्या स्वतःच्याच बोलण्यामधून मला अस समजल, की ते एक प्रसिद्ध सिने-समीक्षक आहेत आणि जागतिक सिनेमाचा त्यांचा गाढ व्यासंग आहे. ते अमेरिकेमध्ये ‘Film Appreciation’ ('सिनेमा कसा पाहावा') या विषयावर शिबिरे घेण्यासाठी आले आहेत आणि त्यापैकी एक शिबीर आमच्याच गावात लौकरच आहे! माझा आनंद गगनात मावेना! एवढी वर्ष, एवढे सिनेमे बघून अजून आपल्याला त्यात काय बघायचं ह्या साध्या प्रश्नाच उत्तर देत येवू नये! छे! मी हे शिकणारच. शिबीर म्हटल्यावर बरेच दिवस पडून राहिलेली माझी खाकी हापप्यांट सुद्धा एकदा वापरता येईल याचाही एक सूक्ष्म आनंद झाला.
ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेच्या थोडा आधीच मी शिबीर स्थानी पोचलो. थोडे लोक माझ्याही आधी जमा होऊन राजकारण, क्रिकेट, नोकरीची परिस्थिती आणि stock market या विषयांवर बोलत होते. फक्त अभ्यासपूर्णच बोलायचं या माझ्या नवीन प्रतिज्ञेप्रमाणे, मी नुसता ऐकत राहिलो. आणखी थोडी मंडळी जमा झाल्यावर हे सर्व विषय संपवून, सर्वजण मराठी साहित्य आणि नाट्य कलेविषयी बोलायला लागले. खर तर “जे लिखाण केल्याच लेखक सुद्धा विसरू इच्छित असेल किंवा जे नाटक घडल्या ची साक्ष नाट्यगृहाच्या चोपड्याच केवळ दाखवू शकतील”, अस साहित्य किंवा अस नाटक बघितलं म्हणणारा जिंकला अशी ती चढाओढ होती. लोकप्रिय नाटक काय कोणीही बघत! आपल्याला अजून बरच वाचायचं आणि बघायचं आहे, एवढंच मला त्या स्पर्धेत 'उत्तेजनार्थ' बक्षीस मिळाल - म्हणजे, मीच मला दिल. प्रमुख पाहुण्यांना उशीर होत असल्याच शुभ वर्तमान पाउण एक तासानंतर मिळाल. मग चहा-चिवडा कार्यक्रम सुरु झाला. लोक जथ्या-जथ्यांनी सिनेमा आणि इतर कलामधला आपला रस खूप गाळून गाळून इतरांना पाजवू लागले. एकीकडे फक्त बर्गमन, कोपोला आणि स्कोर्सेझी अशी पाश्चात्य नावं, तर दुसरीकडे कुरोसावा, खलिलि नाहीतर फुंग-यीं अशी पौर्वात्य नावं आणि शेवटी चक्क 'मैने प्यार किया', 'मैं प्रेम की दिवानी हुं' वगैरे ओळखीच्या विषयांवर चर्चा चालू होती. मी गटा-गटामधून फिरून पाहिलं. शेवटी एका हिंदी उप-गटामध्ये गुलझार, बेनेगल वगैरे चर्चा चालू होती तिथे शिरलो. कालांतराने चर्चा अपर्णा सेनच्या '15 Park Avenue' वर आली. माझा हात पुन्हा शंकेसाठी वर! 'त्या सिनेमाच्या शेवटी, ती कोंकणा सेन त्या बंगल्यामध्ये शिरते काय, अदृश्य होते काय; तुम्हाला समजल का, त्यांना नक्की काय दाखवायचं होत?' हा प्रश्न मला सिनेमा बघितल्यापासून सतावत होता. म्हटलं, शाळेच्या फी मध्ये एवढ शिकता आल, तरी पैसा वसूल! पण मग लक्षात आल, कमीत कमी अर्ध्या लोकांनी तो सिनेमाच बघितला नव्हता; ते नुसतेच अपर्णा सेन कसे सिनेमे करत असावी, किंवा तिने कसे करावे यावर चर्चा करत होते. म्हटलं, ठीक आहे; monitor ला नसेल माहिती, मास्तर आले की त्यांनाच विचारू!
आणि एकदाचे देशपांडे साहेब आले! प्रत्येकाशी हस्तांदोलन, पूर्वी आपण कुठे भेटलो होतो, हवामान - अमेरिकेतलं आणि भारतातलं, रस्ते, गाड्या वगैरे वगैरे प्रचंड चर्चा झाल्यावर देशपांडे महाशय म्हणाले की प्रोजेक्टर त्यांना हवा तसा लागला नाहीय, बरोबर आणलेल्या फिल्म clips दाखवायला. मग चार तंत्रज्ञ तो प्रोजेक्टर नीट सुरु करायच्या मागे लागले. मधल्या काळात, देशपांडे साहेबानी व्याख्यानाला सुरुवात केली (हुश्श!). ते येणेप्रमाणे: ‘मित्रहो, आपल्या आजच्या कार्यक्रमाला चांगलाच उशीर झालाच आहे. खर तर हे माझ शिबीर तीन दिवसाचं असत; इथे तुम्ही लोक फार बिझी म्हणून मी ते तीन तासात संपवणार आहे (पण तीन दिवसाच्या पैशात - माझा आपला कोंकणस्थी विचार!). तर आपण आता सुरुवात करूया. तुमची ओळख करून घेण्याच्या दृष्टीनी, प्रथम मला सांगा, तुम्हाला विशेष रुची कशात आहे, साहित्य, चित्र, संगीत वगैरे. आणि दुसर मला सांगा, तुम्हाला आतापर्यंत सर्वात जास्त आवडलेला चित्रपट कोणता?'. पहिल्या रांगेत बसण्याचा तोटा आता माझ्या लक्षात आला, फार उशिरा! मी प्रामाणिक बाण्यानी खर ते उत्तर दिल, 'साहित्याची मला सर्वात जास्त आवड आहे, आणि सर्वात आवडता सिनेमा Godfather!' नंतर, इतर चतुरजनांची उत्तर ऐकल्यावर मला माझा बावळटपणा ध्यानात आला. बहुतेकांनी 'कला या नावाखाली जे येत ते सर्वच आम्हाला आवडत', अस सर्वोदयी गोलमाल उत्तर दिल. आवडते सिनेमे मात्र 'दो बिघा जमीन' पासून 'नालायक' (अशा नावाचा सिनेमा आहे ही माहिती काही कमी मौलिक नव्हे.) पर्यंत बरेच निघाले. सुमारे अर्धा तास या प्रश्नोत्तरावर खर्च झाल्यावर देशपांडे साहेब म्हणाले 'असो! (बस काय!) तर महत्वाचा मुद्दा काय, की सिनेमा हे एक सर्वंकष कलामाध्यम आहे. याच कारण, सिनेमा हा आपल्या आयुष्याला फार समांतर जातो सिनेमा हे आपल्या जीवनाच प्रतिबिंब आहे. आपली सुख, दु:ख, गीत, संगीत - हेच तर सगळ सिनेमामध्ये आहे. म्हणूनच सिनेमा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.’ वगैरे वगैरे अस सिनेमा विषयाच्या भोवताली बराच वेळ चर्वित-चर्वण केल्यावर (एकदाचा) प्रोजेक्टर सुरु झाला असल्याची शुभ वार्ता आली. येथवर दीड तास उलटून गेला होता.
मग देशपांडे साहेबांनी बरोबर आणलेल्या चित्रफिती दाखवायला सुरुवात केली. 'हा जगातला सर्वात पहिला सिनेमा.' या शीर्षकाखाली एक अत्यंत जुनी, घासून फाटायला आलेली तीन मिनिटाची (नशीब!) एक फिल्म बघायला मिळाली. त्या फिल्मच्या कपाळीच्या सर्व रेषा मलासुद्धा स्पष्ट वाचता आल्या असत्या. त्यात एक वाफेच्या इंजिनावर धावणारी आगगाडी तब्बल तीन मिनिट दाखवली होती. मला वाटत, तीन मिनिट आगगाडी आणि वाफेच इंजिन बघण जेम्स व्याटला सुद्धा कंटाळवाणच झाल असत! अगदी नव्या कोऱ्या हौसेचा क्यामकोर्डर असता तरीही! अर्थात, ही फीत बघितल्यामुळे, पुढचे अनेक सिनेमे 'appreciate' करणं सोप झाल हे मान्य! पुढची अशीच पौराणिक फीत दाखवण्याआधी देशपांडे साहेब फारच खुसू खुसू हसले, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता उंचावली. एवढ करून त्या चित्रफितीमध्ये काय होत, तर बागेमध्ये एक मनुष्य पाणी घालत असल्याच दृश्य! त्या पाण्याच्या धारेचा, आणि माणसाच्या उभा राहण्याचा कोन असा होता, की त्यातून त्या पाण्याच्या उगमाबद्दल शंका (!) निर्माण होऊ शकत होती. यावर प्रेक्षकामधल्या शिशुवर्गामध्ये ("प्रौढत्वी नीज शैशवास" जपणाऱ्या) खसखस पिकली. तेवढाच 'कॉमिक रिलीफ'! वरती देशपांडे साहेबांच विवेचन 'पाहिलत, विनोदी सिनेमांची परंपरा एवढी जुनी आहे' - मला फक्त हिंदी सिनेमामधल्या राजेंद्रनाथी विनोदाच्या परंपरेच मूळ सापडलं!
एवढ्या पाश्चात्य इतिहासानंतर, देशपांडे साहेब धाडकन एकदम हिंदी सिनेमावरच घसरले. ते सुद्धा 'श्री ४२०' वर, निवडून निवडायच तर हेच शीर्षक सापडलं? पडद्यावर 'प्यार हुआ इकरार हुआ' सुरु झाल, आणि इकडे देशपांडे साहेबांची टकळी! हे म्हणजे - सचिन तेंडुलकरला एक्शन मध्ये बघण्यासाठी, महागातली पुढच्या रांगेतली तिकीट काढून जाव, आणि कॉमेंटरी करणारा 'आता सचिनने ब्याट उचललेली आहे, व तो ती चेंडूला मारणार आहे' ही अत्यंत गूढ आणि मौलिक माहिती कानात ओरडत असावा - अशातला प्रकार होता. ‘नर्गिसच्या चेहऱ्याकडे पहा, ती सुंदर प्रकारे लाजत आहे. आता क्लोजअप वापरला आहे, ती स्वतः च्या विचारात गढली आहे हे दिग्दर्शकाला व्यक्त करायचं आहे, तिच्या मनातले भाव दाखवायचे आहेत; आता कॅमेरा लॉंग शॉट मध्ये वापरला आहे, ते दोघ कसे लोकांच्या जगापासून दूर दूर, त्यांच्याच विश्वात आहेत हे दिग्दर्शकाला दाखवायचं आहे' या टाईपची बरीच बाळबोध टिपण्णी, त्या अत्यंत कर्णमधुर गाण्याचा सत्यानाश करत होती. यानंतर काही काळ देशपांडे साहेब क्लोज अप, लॉंग शॉट, फ्रेम, मॉब, ट्रोली, indoor, outdoor, 'available light', 'low angle', ‘avant-garde’ अशा अनेक गोष्टींबद्दल फितीशिवाय आणि संदर्भाशिवाय नुसतेच बोल-बोल-बोलले. बहुतेक high angle वरून बोलले असतील, कारण बरंचस माझ्या डोक्यावरून गेल. अगदी डुलकी लागणार, तेवढ्यात टाळ्यांच्या आवाजाने जाग आली आणि लक्षात आल, की भाषण संपल आहे आणि प्रश्नोत्तराचा तास सुरु होत आहे.
कमीत कमी तो ’15 Park Avenue' चा प्रश्न धसाला लावायचाच या उद्देशांनी मी संधी मिळाल्यावर तो प्रश्न मास्तरांना विचारला. या प्रश्नावर त्यांच उत्तर होत 'मी विजय तेंडुलकराना फोन केला होता, अपर्णा सेनचा नंबर मिळवायला; पण ते काही भेटले नाहीत’. प्रश्न त्यांना नीट ऐकू गेला नसावा अस समजून मी पुन्हा विचारलं 'त्या सिनेमाचा शेवट जरा समजावून सांगाल का?' यावेळी त्यांच उत्तर होत 'नंतर काय झाल, मी कान्स आणि बर्लिनच्या फेस्टिवलच्या तयारीत होतो, त्यामुळे अपर्णा सेनशी काही संपर्कच साधता आला नाही'. यानंतर ते इतरांकडे वळले. मला मात्र 'गणिताच्या परीक्षेत हे आर्किमिडीज, न्यूटन वगैरे लोकांना प्लांचेटवर बोलावत असतील का?' या प्रश्नाने आता भंडावून सोडलं होत!
देशपांडे साहेबांची सिनेरसाकलन या विषयावरची पुस्तकं विक्रीला ठेवली आहेत अस समजल. पण माझा नम्र अंदाज असा होता, की आयुष्याप्रमाणेच सिनेमा वर सुद्धा आपल पुस्तकं आपणच लिहिण चांगल! ‘Mr and Mrs Iyer’ मध्ये राहुल बोस मुला-मुलींच्या घोळक्याला, कोंकणा सेन त्याला कुठे, कशी भेटली आणि त्यांच प्रेम कस जुळल याची जी संपूर्ण काल्पनिक गोष्ट सांगतो, आणि त्यावेळी कोंकणा सेनच्या डोळ्यात जे अविस्मरणीय भाव दिसतात; त्या दृश्याच सिनेमा मधल स्थान, त्यातली तरल कल्पकता, त्याच सौंदर्य समजायला कुठचेच पुस्तकी 'angles' कळण्याची गरज नसते; असावी लागते ती फक्त चांगल्या कलाकृतीची आवड! 'गरम हवा' मध्ये, एक राजकारणी टाईप पात्र बोलायला लागल, की मागे टाळ्यांच्या गजराचे पडसाद आहेत, 'महानगर' मधल्या शेवटच्या 'आमी आछी' या संवादातून, माधवी मुखर्जीच्या अभिनयातून, रे साहेबांनी एक सुंदर परिणाम साधला आहे, 'फिरसे आईयो, बदरा बिदेसी' या गाण्याच कथानकामधल स्थान, उत्कृष्ट अभिनय, हुरहूर लावणारी चाल आणि अप्रतिम दृष्यांकन - हे सगळ जर आपल्याला कुठेतरी स्पर्श करून गेल नाही, तर पुस्तकाची पन्नास पानं सुद्धा ते समजवू शकणार नाहीत अशी मला भीती वाटते. सिनेमामध्ये हे असल बरंच बघण्यासारख असत, असा माझा आपला समज आहे.

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...