(२००० साली पु. लं.च्या मृत्युनंतर, न्यू जर्सीच्या 'मराठी विश्व' ने ठेवलेल्या पु.ल.गौरवसभेमध्ये मी वाचलेलं भाषण. त्यांना श्रद्धांजली म्हणून, त्यांची भाषाशैली अवगत करण्याचा प्रयत्न मुद्दाम केला आहे.)
पु.ल. ह्या विषयावर आतापर्यंत इतक्या विविध लोकांनी, असंख्यांनी, माझ्यापेक्षा अनेक अर्थानी मोठ्या लोकांनी, त्यांना जवळून ओळखणाऱ्यानी इतकं सुंदर लिहील आहे, किंवा वक्तव्य केल आहे; की त्या त्या वेळी अतिशय समरसपणे मान डोलवत, 'हो, मलाही हेच सगळ म्हणायचं होत' अस मनाशी म्हणत बसण्यापलीकडे नवीन भर घालण्यासारख माझ्याकडे काहीच नाही अस वाटत. अस वाटत, की पु.लं.ची वैशिष्ट्य, त्यांची थोरवी, त्याचं कौतुक नवनवीन उत्तमोत्तम विशेषणांमधून गवसण्याची शब्द्कामाठी करत बसण्यापेक्षा, त्यांचच एखाद, जीव ओवाळून टाकावा अस वाटणार पुस्तक घेऊन वाचत, त्यातला आनंद पुन्हा तितक्याच ताजेपणे अनुभवत बसाव. पण आपल्याला त्यांनी दिलेला हा आनंद योग्य रीतींनी व्यक्त करून इतरांना सांगावा ही उर्मीही अनावर असतेच ना! त्यातून, पु. लं. नी इतक्या क्षेत्रात इतक्या न बुजणाऱ्या खुणा उमटवल्या आहेत, की त्यांच्यावरच्या एका लेखात किंवा एका भाषणात हे सगळ सामावण अशक्यच आहे. म्हणूनच इतक्या लोकांनी त्यांच्यावर लिहील, तरी सांगण्यासारखं बाकी राहिलंय अस आपल्याला वाटत. हे माहिती आहे, की त्याचं माझ रक्ताच नात नव्हत, ओळख-सहवास काहीच नव्हत. आणि तरीही हजारो मैल लांब असतानाही, ते माझ्या मनी-मानसी सतत होते. काहीही सुंदर बघताना, वाचताना, ऐकताना आणि हो, खाताना सुद्धा, त्या सौन्दर्यानुभूती बरोबरच त्यांचा विचार मनांत येतो. ह्या गोष्टीवर त्यांची प्रतिक्रिया काय झाली असती, ह्याचा मनाशी खेळ सुरु होतो. जणू त्यांचा आणि माझा घनिष्ट परिचय आहे.
खर म्हणजे आहेच. त्यांची आणि माझी ओळख लहानपणापासूनची - म्हणजे माझ्या लहानपणापासूनची. आणि ओळख म्हणजे ते ग्रेट लेखक आणि मी त्यांच्या असामान्य शब्दसंपत्तिनी, भाषा आणि विचार सौंदर्यानी दिपून गेलेला एक सामान्य वाचक! 'चितळे मास्तर' मी सर्वप्रथम वाचल ते नवव्या किंवा दहाव्या वर्षी. त्या वेळी त्यांनी नुसत खळखळून हसवलं होत. त्यातली, 'दुसऱ्या कुठल्याही चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या' ही ओळ 'कारुण्याची झालर' आहे, हे ज्ञान अजून प्राप्त व्हायचं होत. कालांतरानी मी 'नंदा प्रधान' वाचलं. त्या लेखानी, त्याही वयात, सगळ न समजता सुद्धा, मनाचा ठाव घेतला होता. आज ही मला ते पु.लं.च सर्वोत्कृष्ट व्यक्तिचित्रण वाटत. मग कुठल्याही मराठी वाचकाप्रमाणे, हरीतात्या, बबडू, नाथा कामत अशी माझीही वाटचाल झाली. पुल ह्या लेखकाच व्यसन जडल. आम्हाला शाळेत मराठी शिकवणारे ('त्यात शिकवायचं काय असत हो?' हे न आठवणारा मराठी वाचक नसेल!) तमाम मास्तर प्रत्येक यत्तेत 'माझा आवडता लेखक' आणि 'मी कोण होणार' हे दोन(च) विषय निबंधासाठी देत. पैकी 'मी कोण होणार' माझ वर्षातून तीनदा बदलत असल, तरी 'आवडता लेखक' मात्र कायम राहिला - तेव्हापासून आत्तापर्यंत. त्याचं लिखाण जेवढ जास्त वाचत गेलो, तश्या त्यांच्या विनोदाच्या विविध छटा, शब्द्योजनेची विलक्षण अचूकता, त्यामागचे अतिशय प्रगल्भ विचार हे सगळ जाणवू लागलं. त्यांच्या 'हसवणुकिनी' पोटदुखीवर वैद्यकीय इलाज करून घ्यावा वाटावं इतक हसवलं. त्यांचा शत्रुपक्ष तो आमचा शत्रुपक्ष झाला. (नुकतच घर घेताना, ब्रिक फ्रंट साठी बिल्डरचा मनुष्य वीट आणणार भाषण देत असताना, मी मध्येच फिस्सकन का हसलो त्याला सांगण शक्य झालं नाही... 'कुळ्या' ची आठवण इंग्रजीतून कशी सांगणार!). पाळीव प्राण्यांविषयी, मुंबईतल्या छोट्याशा बिऱ्हाडामुळे उपजतच नसलेली आवड, आता अभिषिक्त 'नावड' झाली. ते जेव्हा त्यांच्या धंद्यावरच्या विलापिकेमध्ये 'विनोदी लेखकाला कोणीच सिरिअसलि घेत नाही' म्हणाले, तेव्हा मीही खदखदुन हसलो, त्यांच्या शब्दांच्या चमत्कृतीवर रेंगाळलो, पण हसू ओसरता ओसरता ह्या विदुषक म्हणवणाऱ्या विचारवंत लेखकाला मुखवट्याआडून काही सांगायचय हे जाणवल्यावाचून राहिलं नाही.
अत्र्यांच्या 'झेंडूची फुले' च आपण विडंबन काव्य म्हणून कौतुक करतो, तेव्हा पु. लंनी ही अप्रतिम सुंदर विडंबन लिहिली आहेत हेही आपण लक्षात घ्यायला हव. पु. शि. रेग्यांच्या छंदात्मक भाषेची थट्टा करणारं, पु. लंच 'शांभवी - एक घेणे' हे छंद काव्य मला विडंबनाचा एक उत्कृष्ट नमुना वाटतो. सौंदर्यमीमांसा ह्या नावाखाली शब्दांची चिरफाड करणाऱ्या लेखनाची पु.लंनी इतकी झकास टिंगल 'एक नवे सौंदर्यवाचक विधान' ह्या लेखात केली आहे! त्यांच्या भाषा प्रभुत्वाच प्रतीक म्हणून आणखी एक लेख चटकन आठवतो, तो म्हणजे 'भाईसाहेबाची बखर'. जनता राजवट आल्यानंतरच्या काळाच अतिशय मार्मिक विश्लेषण त्यांनी ह्या लेखात ऐतिहासिक बखरींच्या थाटात फार सुंदर केल आहे. ७७-७८ सालामधल्या घटनांच वर्णन, सतराव्या शतकातल्या मराठीमधून वाचतांना ह्या माणसाच्या शब्दभांडारानी थक्क व्हायला होत!
भाषांतर ही खर तर एक अतिशय अवघड गोष्ट. कुठचीही भाषा, तिच्या मागच्या संस्कृतीचा, आचार-विचार-विश्वासाचा भक्कम आधार घेऊन उभी असते. त्यामुळे, एका भाषेतलं उत्कृष्ट साहित्य दुसऱ्या भाषेत, त्याला धक्का न लावता आणण ही महाकर्मकठीण जबाबदारी! पण हे शिवधनुष्यही पु.लंनी सहजपणी हाताळल ह्याची साक्ष 'एका कोळियाने' आणि 'अंमलदार' ही तर आहेच; पण भाषांतरापलीकडे जाऊन असामान्य रुपांतर कस कराव ह्याचा जणू धडाच 'ती फुलराणी' ने घालून दिला.
बटाट्याची चाळ आणि असामी असामी ह्या दोन्हीमध्ये त्यांनी चाळकरी माणसांची, वृत्तीची आणि संस्कृतीची यथेच्छ थट्टा केली आहे. मी थट्टा म्हणतो आहे, टिंगल नाही. कारण, त्यांच्या वागण्यातल्या विसंगतींची चेष्टा केली, तरी ही सगळी माणसं पु.लंची घरची, ओळखीची-परिचित-मित्र असावी असा जिव्हाळा त्या लेखनामागे ओथंबून आहे. त्यांच्या ह्या वेगवेगळ्या लिखाणातून त्यांचा खास पु.ल. टच जाणवत असला, तरी त्यावर नेमक बोट ठेवता येत नव्हत. आणि मग मी 'तुझे आहे तुजपाशी' वाचलं. ह्या नाटकानी आणि त्यातल्या विचारांनी माझ्या मनाचा जो ठाव घेतला, तो अजून सुटत नाही. मला तर वाटत, पु.लंनी ह्या नाटकाव्यतिरिक्त एक अक्षरही लिहील नसत, तरीही लेखक म्हणून अजरामर होऊ शकले असते. काकाजी आणि आचार्य ह्या नुसत्या दोन प्रभावी व्यक्तीरेखा नाहीत, त्या आयुष्याकडे बघण्याच्या दोन भिन्न वृत्ती आहेत. काकाजींना सर्रास 'भोगवादी' म्हटलं जात, बहुधा आचार्यांच्या त्यागवादीशी यमक जुळवण्यासाठी असेल. मला काकाजी आनंदवादी वाटतात. आयुष्यातल्या बारीक-सारीक गोष्टींमधला आनंद टिपू शकणारे, क्षुद्र गोष्टींना, घटनांना आणि माणसांना डावलून पुढे जाऊ शकणारे आणि पावसातल्या बेडकांचादेखील खर्ज ऐकू शकणारे काकाजी मला पु.लंचे ही हिरो असावेत अस वाटत आलंय.
पुलंनी आपल्याला काय दिल, ह्यावर अनेकांनी अनेकविध लिहील आहे. इतक्या सगळ्यांना पु.लंनी आपल्याला काही दिल अस वाटावं, ह्यातच खर तर सगळ आलं. माझ्यापुरत बोलायचं तर, पु.लंनी आयुष्याकडे बघण्याची एक अनोखी दृष्टी दिली. विनोदासाठी 'prop' म्हणून त्यांनी 'पुणे आणि पुणेरी वृत्ती' निर्माण केली म्हणा किंवा वापरली म्हणा - पण त्यातून जीवन दृष्टी कशी असू नये याचच उत्तम शिक्षण दिल. आयुष्यात मिळणाऱ्या छोट्या आणि मोठ्या आनंदांबद्दल कृतज्ञता बाळगायला शिकवलं. देव न मानणाऱ्या ह्या देवमाणसानी चार-चौघांसारख्या माणसांच्या वागण्यातला, कलेमधला देवपणा ओळखायला शिकवला. त्यांनी इतक्या विविध भूमिका सुंदर वठवल्या, पण सर्वात उत्कृष्ट भूमिका त्यांनी स्वतःवर घेतली आणि वठवली ती म्हणजे एका असामान्य रसिकाची! आपण त्यांच्या शब्दसंपत्तिनी भुरळून त्यांची पुस्तक वाचायला जातो, तेव्हा ते लेख प्रकाशझोत दुसऱ्याच मोठ्या माणसांवर आणि कलाकारांवर टाकतांना दिसतात. 'गुण गाईन आवडी' हे काही नुसतं त्यांच्या पुस्तकाच नाव नाही, ते त्यांच स्वतःच जीवनगान असाव अस वाटत. माझ्यासारख्या असंख्य छोट्याश्या माणसांची त्यांनी बोट धरून नेउन आकाशाएवढ्या मोठ्या माणसांशी ओळख करून दिली. गम्मत म्हणजे, आम्ही त्यांना आपल्यातलाच एक मानत आलो. एक पाऊल मागे घेतलं की जाणवत, की हा आमच्यातलाच वाटणारा, सदैव हसवणारा असामी स्वतः आभाळाएवढा मोठ्ठा होता. तो ज्यांच गुणगान करत होता, त्याच महंतांच्या मालिकेमधला होता. पु.लंनी आमच आयुष्य खूप सुंदर केल, समृद्ध केल; आणि हसत-खेळत, कुठलीही विद्वज्जड भाषण न देता, स्वतःच्या उदाहरणानी आदर्श आयुष्य कस असाव, ह्याचा परिपाठ घालून दिला.
ही अनमोल देणगी परमेश्वरानी न मागता आम्हाला दिली, ह्याबद्दल फक्त अपरंपार कृतज्ञता आहे!

This comment has been removed by the author.
ReplyDeleteNot bad a conjecture! I am on the other hand a big fan of both. In both my chats with her, she came across as a very sensitive, passionate person - just a sternly principled one :)
ReplyDeleteअप्रतिम भाषण !...खरं तर भाईंविषयी लिहिणं अपुरंच आहे !..''महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व'' ही त्यांच्यावर प्रेम करणा-या अवघ्या गुणीजनांनी दिलेली उपाधी किती आणि कशी समर्पक आहे याचा प्रत्यय पु.लं.नी वाचकांना दिलेल्या प्रत्येक साहित्यकृतीं मधून जाणवते !
ReplyDelete