आस्तिक-नास्तिक, धर्म, अंधश्रद्धा ह्या भाजणीचं कडबोळं:
परवाच एका पोस्ट मध्ये 'देवा'चा उल्लेख केला, म्हणून तत्काळ 'अंधःश्रध्द आस्तिक' ह्या जॉईंट आरोपाखाली वाळीत का टाकू नये अशी 'कारण दाखवा' नोटीसच आली की हो चक्क घरी.
सुरुवातीचा 'तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या..' इ. इ. भाग ओळखीचा होता, बऱ्याच वेळा ऐकला असल्याने.
पण पुढच्या भागातल्या काही शब्दांनी मात्र चमकलो चांगलाच.
'पूजा-अर्चा, मुहूर्त, नवस-सायास, उपास-तापास, कौल, बाबा-स्वामी' पासून ते पार 'मंगळ-अमंगळ, जात-पात, उच्च-कनिष्ठ' अशा अनंत सरमिसळ जिनसा पोतडीत घालून घेऊन आली होती ही नोटिस बया! आणि लोकांच्या घरी म्हणे पाठुंगळीला खेळण्यांनी भरलेली पोतडी घेतलेला सांताक्लॉज येतो!
म्हटलं, नाही नाही नक्कीच चुकीच्या नावाची, चुकीच्या पत्त्यावर येऊन थडकली असणार बया.
गेलो कोर्टात.
तीन उच्च न्यायाधीश बसले होते - स्वप्रसन्न, स्वयंभू, सर्वज्ञ.
स्वप्रसन्न: काय बचाव आहे तुमचा?
मी: ही नोटीस बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आली आहे. ह्यात लिहिलेले बहुतेक शब्द मला लागू नाहीत हो.
स्वयंभू: तुम्ही पोष्टीत 'देव' शब्द लिहिला होता का?
मी: हो, म्हणजे...
स्वयंभू: ज्यादा बोलायाचा काम नाही. गुन्हा कबूल, तुम्ही आस्तिक! नेक्स्ट!!
सर्वज्ञ: तुमाला वार्निंग पन द्येऊन झालेल्ये. मागं येकदा गनपतीबद्दल आसलंच लिह्यलवतं.
मी: अहो, पण ते नुसतं गणपतीच्या मूर्ती बनवण्याबद्दल होतं. आणि देव शब्द वापरला म्हणजे लगेच देवावर विश्वास आहे असा अर्थ होत नाही.
स्वप्रसन्न: मंग सरळ बोला ना, नास्तिक आहात तर. मग काय वांदाच नाय! अरे गण्या, ह्या सायबांची नोटीस काढून टाक बरं. आलेत ते वठणीवर, आपलं आय मीन ज्ञानाच्या मार्गावर.
मी: पण मी नास्तिक नाहीय. मला काही खात्री नाही देव आहे का नाही. आणि ते शोधत बसणं एवढं महत्वाचंही वाटत नाही. देव आहे का नाही हा मला एक अत्यंत फुटकळ मुद्दा वाटतो.
संतापाने तिघांच्या तोंडातून आलेल्या फेसामुळे त्यांची तोंडं एकाएकी पांढरी शुभ्र झाली. 'फु.. फू.. फुटकळ - बोलू तरी कसं शकता तुम्ही असं!' तिघेही एकसुरात ओरडले.
स्वप्रसन्न: असं बघा साहेब, देवळात जाता का? हात जोडता का?
मी: मुद्दाम वाकडी वाट करून जात नाही; सॉरी सॉरी, कधी कधी जातो हं. सेंट पॉल कॅथेड्रल बघायला, वेस्टमिन्स्टर ऍबी बघायला मुद्दाम चार तास घालवून गेलो होतो; दक्षिणेतली गोपुरं बघायला, उत्तरेतली देवळं बघायला मुद्दाम वेळ काढून जातो. गेलो आणि हात मोडलाबिडला नसला, तर देवाला नमस्कार करायलासुध्दा हरकत नसते. मागत नाही फारसं काही, पण त्याच्या नावाखाली अशी उत्तुंग इमारत उभी करायची, इतकी अप्रतिम कलाकुसर, एवढी दिव्य पेंटिंग्स करायची कोणालातरी बुद्धी झाल्याबद्दल त्याचे आभार मानतो. झालंच तर, सिस्टीन चॅपल, सोमनाथ, अंगकोर वात, स्तूप, शिंटो मंदिरं वगैरे बरंच काही आयुष्यात एकदा तरी बघायचंच असं स्वप्नही बाळगतो. खरं सांगायचं तर मक्का बघायचीही फार इच्छा आहे, पण ते काही बहुतेक ह्या जन्मी जमणार नाही, ह्याची खंतही बाळगतो. म्हणजे, देवळाची ऍलर्जी पण नाही, पण सक्ती पण नाही.
सर्वज्ञ: सायब लय बडबड करता वो तुमी. शंबर शब्द बोलायचं काय कारण हाय का? यवड्या समद्या ठिकानी जौन द्येव नाय बगत तर काय दगडं बगता काय, आमाला बनवतात!
मी: पण खरंच आहे ते; दगडच बघतो - ज्यातून इतक्या सुंदर मूर्ती घडवल्या, ज्यातून एवढी अप्रतिम मंदिरं उभारली ते सगळे दगड डोळे भरून बघतो! एका ओबडधोबड फत्तरामध्ये ज्यांना एवढं सौन्दर्य दिसलं, बाजूची अनावश्यक पुटं दूर करून ज्यांनी ते सौन्दर्य तुमच्याआमच्या समोर उलगडून दाखवलं, त्या कारागिरांच्या कल्पकतेनी थक्क होतो. माणसाच्यातल्या चांगल्या गुणांची परमावधी एकवटून देवाची प्रतिमा निर्माण केली. आपल्यातल्या कोणाला प्रत्यक्षात शक्य नाही असं एखाद लक्ष्य किंवा उद्दिष्ट समोर ठेवलं तर काय बिघडलं त्यात? अशा 'देवा' च्या कल्पनांमधूनच तर उत्तुंग मंदिरं आणि वास्तुशिल्पं आणि चित्रं आणि संगीत घडतं ना?
आणि दुसरा असा विचार करा, की समजा अंगावर आलेलं एखादं संकट आपल्या कुवतीबाहेरचं आहे, ह्याच्याशी सामना करायला आपल्यापेक्षा काहीतरी मोठ्या शक्तीची गरज आहे असं एखाद्याला वाटलं, त्याने देवासमोर हात जोडले, मन एकाग्र केलं आणि त्यातूनच त्याला स्वतःलाच, आलेल्या प्रसंगाचा सामना करायचं मानसिक बळ मिळालं; तर काय बिघडलं त्यात? देव नसेलही, पण त्याला त्या क्षणापुरता आधार द्यायला, त्याच्याच आतमध्ये दडून बसलेली शक्ती जागी करायला एखाद्या 'प्रार्थनेची' मदत झाली, तर काय आकाश तर नाही ना कोसळणार?
स्वयंभू: उग्गाच भांजडी करत बसू नगा. द्येव हाये का न्हाई - सिद्दा सवाल. 'मला माहिती नाही' असले लाड चालणार नाहीत.
मी: असं बघा, देव आहे का नाही, आस्तिक आणि नास्तिक हे सगळं सुरु कुठे झालं? आदिमानवाच्या 'को s हं' च्या शोधातून. मी काय आहे, मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जाणार? हा विश्वाचा पसारा 'चालवणारी' नियंत्रक शक्ती आहे का, का हे सगळं निरुद्देश निरर्थक आहे ह्याचा शोध जास्त मनोवेधक आहे. आपल्या अस्तित्वाचा, कुठे जाणार ह्या दिशेचा, भूत, वर्तमान आणि भविष्य ह्या कालवाचक प्रत्ययांना काही अर्थ आहे का, तो अर्थ काय आहे हे सगळे शोध कितीतरी पटींनी जास्त मोहक आहेत. आस्तिक आणि नास्तिक दोन्हीही गट सोपीशी लेबलं चिकटवून दुसऱ्याला मूर्खात काढून हात झटकून टाकतात - त्यांचा वाद फक्त देव ह्या साध्याशा संकुचित कल्पनेबद्दल आहे. ह्या सगळ्या जटील प्रश्नांचं 'देव' असं साधंभोळं उत्तर देऊन आस्तिकांनी पळ काढला आणि हे उत्तर चुकीचं आहे - एवढंच नास्तिक उगाळत राहिले; मूळ प्रश्न राहिले बाजूलाच! देव असला काय आणि नसला काय - हे मूळ प्रश्न अनुत्तरीतच आहेत. म्हणून मी ह्या आस्तिक नास्तिक च्या मृगजळाच्या मागे धावतच नाही.
पण ते जाऊ दे. ह्या बाकी नवस-सायास, अंगारे-धुपारेंचं काय? त्याचा काय संबंध माझ्याशी?
सर्वज्ञ: आता बस काय साह्येब? आस्तिक म्हनलं म्हंजे ह्ये समदं आलं न्हवं त्यात? तुमच्यासारकं शिकल्यालं, मोठी बुकं वाचनारं साह्येब आन एवढं बी कळू नये तुमास्नी. आस्तिक म्हनलं मंजी त्यात ह्ये नवस, प्रदक्शना आन मुहूर्त आन ह्ये समदं आलंच.
मी: पण ते खरं नाहीय, अजिबात नाही. तुम्ही म्हणताय ते सगळं धर्म, कर्मकांड, रूढी-परंपरा, अंधश्रद्धा असं फार लांबलचक मोठं बोचकं आहे, त्याचा देवाच्या संकल्पनेशी, आस्तिक-नास्तिकपणाशी अत्यंत दूरचा बादरायण संबंधच फक्त लावता येईल.
सर्वज्ञ मक्खपणे माझ्याकडे बघत राहिले; मदतीच्या अपेक्षेने मी स्वयंभू आणि स्वप्रसन्न ह्यांच्याकडे मान वळवून पाहिलं.
स्वप्रसन्न सुखेनैव घोरत होते. स्वयंभू त्यांच्या घोरण्याचा आणि माझ्या बडबडीचा त्रास नको म्हणून कानात काडी घालून अनुष्काच्या विराट विवाहाची गुळगुळीत रंगीत चित्रं बघण्यात मग्न होते.
हताश होऊन मागे वळत असतांना सर्वज्ञांचा आवाज कानी आला 'जाऊ द्या हो साहेब. पन्नास हजाराची डोनेशन त्या शास्त्र आणि विज्ञान समितीला द्या आन मिटवून टाका झालं! कायेय शेवटी आपला मराठी माणूसच हाय ना तुमी पन, बगायला लागतं.'

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...