गोळ्यांचा
आवाज थांबल्याचं जाणवल्यावर संदीपने गुडघ्यात लपवलेली मान उंचावली, डोकं टेबलाच्या
तळाला आपटलं... पण पुन्हा गोळीबार सुरु झाला नाही. संदीपने टेबलाखालूनच बाहेर बघितलं,
लोक गर्दी करून बारच्या बाहेर पडतांना दिसू लागले, तेव्हा तो कसाबसा टेबलाखालून बाहेर
आला. त्याच्या हृदयाचे ठोके अजूनही दुप्पट वेगाने पडत होते. त्याने चौफेर पाहिलं, सबंध
बारभर गोंधळ होता. ते दोघे बसले होते, त्या सोफ्यावर आनंद कोलमडून पडलेला होता. समोरच्या
सोफ्यावर दिलीपच्या दंडातून भळाभळा रक्त वाहत होतं; प्रचंड वेदनांनी तो अर्धवट शुद्धीत
कण्हत होता. आनंदच्या तोंडून आवाजही येत नव्हता.
इतरही काही लोक जखमी अवस्थेत ओरडत, विव्हळत होते, लोक त्यांना मदत करायला, बाहेर न्यायला
पाहत होते. पोलिसांच्या तीन-चार गाड्या दारातच असाव्या, अँब्युलन्ससकट - सायरन्सचा
आवाज सगळ्या गोंगाटात आणखी भर घालत होता. दार ढकलून इ एम एस आणि पॅरामेडिक्स घाईघाईने
बारमध्ये शिरत होते. समीरने आनंदचा हात हातात घ्यायचा प्रयत्न करताच त्याला जाणवलं,
आता कशाचाच काही उपयोग नाही. एका मेडिकने सर्वप्रथम आनंदचा हात हातात घेऊन पाहिलं आणि
ताबडतोब मॉर्गमध्ये नेण्यासाठी कव्हर आणि स्ट्रेचर मागवलं. एकीकडे तो आनंदच्या देहाभोवतून
मार्करने खुणा आखून घेत होता. दुसऱ्या एकाने नेहमीच्या सफाईने आणि कुशलतेने दिलीपच्या
हाताला तिथल्या तिथे तात्पुरतं बँडेज बांधलं आणि पुढच्या दोन मिनिटात त्याला अँब्युलन्समध्ये
नेलं सुद्धा. इतर पॅरामेडिक्स बारमधल्या इतर जखमींना बघत होते, पोलीस बारची पुरी छाननी
करून अजून कोणी मारेकरी लपला नाही ना त्याची खात्री करून घेत होते, गोळ्या कुठे कुठे
पोचल्या त्याचा शोध घेत होते, लोकांना आधार देऊन बाहेर काढत होते.
संदीप धावत
बाहेर गेला. तिथल्या पोलिसांशी बोलला. दिलीप आणि आनंदचा तो मित्र आहे, त्यांच्याबरोबर
तिथे होता हे ऐकताच एका पोलिसाने त्याला बाजूला घेतलं आणि प्रश्नांना सुरुवात केली.
त्याला स्वतःला काही दुखापत झाली नाही खात्री केल्यावर पहिला प्रश्न: 'मारेकऱ्याला
तू पाहिलं होतं का?'* * *
गोळ्यांचा आवाज कधीच थांबला होता. आजूबाजूचे बरेच लोक बाहेर धावत जात असल्याचं जेनीला जाणवलं होतं. म्हणजे तो मारेकरी इथे नसावा. तेवढ्यात पोलिसचाही आवाज आला - आता नक्कीच सुरक्षित असणार उठून उभं रहायला. मान खाली खुपसून जमिनीवर टाचा गुडघ्यावर ओणावलेली जेनी उठून उभं राहायला गेली, पण तिच्या पायातली ताकदच गेली होती. जे बघितलं असं तिला वाटत होतं ते भयानक होतं - पहिल्या टेबलावर तर अनान होता. डिलपच्या हातातून रक्त येताना तिने पाहिलं होतं. अनान काही दिसला नव्हता तेव्हा. नक्की त्याला पण गोळी लागली असावी. त्यांचा नवीन मित्र पण दिसला नव्हता - ओ गॉड, काय झालं असेल त्यांचं! तेवढ्यात एका पोलिसाने तिला उभं राहायचा प्रयत्न करताना पाहिलं, तिला हात दिला आणि उभं केलं. ती तिथे नोकरी करते कळल्यावर त्याने तिला बाजूला घेऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली. तिला स्वतःला काही दुखापत झाली नाही खात्री केल्यावर पहिला प्रश्न: 'मारेकऱ्याला तू पाहिलं होतं का?'
जेनीने अर्धवट होकारार्थी मान हलवली 'हो, ओझरतंच'.
'त्याला ओळखतेस
का?'
काय उत्तर देणार ह्याला? मला वाटतं ओळखते? पण खात्री कुठे आहे? तो इथे कसा येईल, आणि कशाला? मला नाही वाटत मॉम त्याला कधी बोलली असेल मी इथे असल्याचं. एवढ्या वर्षांनी पाहिलं त्याला, एवढ्या अंतरावरून... कसं खात्रीने सांगणार?
तिला घुटमळतांना बघून पोलिसाने काम सोपं केलं - ' आय मीन, तो इथलाच आहे का? बारमध्ये नेहमी येणाऱ्यातला आहे का?'
हुश्श! 'नाही, मुळीच नाही.'
* * *
सशस्त्र पोलीस एव्हाना बारसमोरच्या जंगलात घुसून मारेकऱ्याचा शोध घेत होते. एवढ्या विस्तीर्ण जंगलात एका अनोळखी माणसाचा माग घेणं अर्थातच मुश्किल होतं. हळूहळू काळोखही दाटत चालला होता. कॅन्सास सिटीहून पोलीस हेलिकॉप्टर बोलावलेलं होतं - ते येईपर्यंत हे गवताच्या गंजीमध्ये सुई शोधण्याचं काम चालू ठेवायलाच हवं.
बारमधल्या लोकांशी बोलून पोलिसांना गोळीबाराच्या थोडाच वेळ आधी घडलेली एका वर्णद्वेषी गोऱ्याचीही हकीकत कळली होती. तो मनुष्य व मारेकरी एकच होते का, ह्याबद्दल थोडा गोंधळ होता. बारमधल्या गर्दीमुळे दोन वेगवेगळ्या गटामधल्या लोकांनी ह्या व्यक्तींना थोडं तरी जवळून पाहिलं होतं. कोणालाच मारेकऱ्याचा चेहऱ्याबद्दल किंवा ओळखीच्या खुणांबद्दल खास काही सांगता येत नव्हतं, त्यामुळे बहुतेकांच्या वर्णनात फक्त ह्या उन्हाळ्यात थोडा खटकणारा जाड फ्लॅनेलचा फुलशर्ट आणि कुठच्यातरी अनोळखी टीमची बेसबॉल हॅट एवढ्याच गोष्टी पुन्हापुन्हा येत होत्या. दोन्ही माणसं गोरी होती, साधारण सारख्याच उंचीची होती - ह्या सगळ्यामुळे शेवटी पोलिसांनी ही दोन्ही माणसं एकच असावी ह्या गृहितावर, आणि उपलब्ध माहितीवर शोध जारी ठेवला. त्या वर्णद्वेषी गोऱ्याचं क्रेडिट कार्ड नाकारलं गेलं होतं, त्यावरून कदाचित त्याचा माग काढता येईल ही एक आशेची गोष्ट होती; पण त्याला थोडा तरी वेळ लागणार - पुन्हा तोच मनुष्य मारेकरी होता हे सिद्ध करणं मुष्किलीचंच!
* * *
गर्द झाडीत थोड्या आडोशाला लपल्यावर मार्टीने एक क्षण थांबून अंदाज घेतला. जवळपास कुठेच पाठलाग करणाऱ्या माणसांचा आवाज येत नव्हता. दाट जंगलामधून तो साधारण काऊंटी रोडच्या बाजूबाजूने मोटेलच्या दिशेने धावत, बारपासून सुमारे अर्धा-पाऊण मैल पोचला असेल. कोणी पाठलाग करत नाही आणि काळोख वाढत चाललाय ह्याचा फायदा घेऊन त्याने थोडं रस्त्याजवळ येऊन बारच्या दिशेने डोकावून बघितलं. पोलिसच्या गाड्या, अँब्युलन्सेस आणि लोकांचे मोठाले घोळके ह्यापलीकडे काही दिसत नव्हतंच. चला, अजून पोलीस ह्या दिशेला येत नाहीयेत तर! खरं तर अजूनही फार उकडत होतं. शर्ट आणि कॅप काढून टाकून देता आली तर? नको, पोलिसांना मिळाले तर वासावरून कुत्री माग काढू शकतील.
दोन मिनिटं श्वास घेऊन मार्टीने शर्ट काढून कमरेला बांधला आणि तो पुन्हा रस्त्यापासून दूर होऊन झाडांमधून मोटेलच्या दिशेने धावू लागला. त्याचं सामान सगळं गाडीतच होतं, दोनचार कपडे आणि टॉयलेटरीज असतील रूममध्ये, तेवढ्यासाठी वर जाऊन वेळ घालवायची काही गरज नाही. लवकरात लवकर इथून बाहेर पडायला हवं. मिझुरीमध्ये परत जाण्यात अर्थच नाही; लवकरच पोलिसांना क्रेडिट कार्डावरून तिथला पत्ता मिळेल. उलट्या दिशेला, कोलोराडोमध्ये जाणं जास्त बरं होईल - जास्त लांब असलं तरीही. पुढे काय? नंतर बघू!
* * *
रीनाला पिकअप करून, आठवड्याची ग्रॉसरी उरकून सविता शांतपणे घरी येत होती. दोघींनीही बाहेरच पिझ्झा आणि आईसक्रिम एवढी चैन केली होती. त्यामुळे आता घरी पोचल्यावर काही फारसं काम नव्हतं. रीना आता थोडा वेळ टीव्ही बघणार आणि झोपणार. आपण ऑफिसचं अर्धवट सोडलेलं काम पुरं करून टाकू, म्हणजे उद्या परवा निवांत मजा करता येईल - ह्या विचारातच सविताने गाडी ड्राइव्हवेमध्ये घातली सुद्धा. इंजिन बंद करता करता तिला जाणवलं घराबाहेरच्या रस्त्यावर एक पोलिसांची गाडी उभी आहे. विचित्रच वाटलं - ह्या भागात पोलिसच्या गाड्या क्वचितच, त्यात पुन्हा ह्या कॉम्प्लेक्समध्ये... तिच्या दारात? जाऊ दे! ते झटकून टाकून ती गाडीतलं ग्रॉसरी सामान काढू लागली. रीनाही तिला जमेल तेवढ्या गोष्टी आत घेऊन गेली. आता कुठे त्यांच्या ड्राइव्हवेमध्येच, तिच्याच दिशेने चालत येणाऱ्या दोन पोलिसांना तिने बघितलं

तिच्या
काळजाचा ठोका चुकला. तिकीट देताहेत की काय? पण
कशाबद्दल? आणि मी पोचायच्या आधीपासूनच
इथे उभे होते - म्हणजे ह्याचा अर्थ काय? मागे
एकदा आले होते असे, शेजारच्या घरात चोरी झाली तर अमुक अमुक
माणसाला तुम्ही पाहिलंय का विचारायला.
पण
आत्ता त्यांच्या चालीत, देहबोलीत तिला काहीतरी विचित्र जाणवलं. एकदम प्रकाश पडला, दोघे पोलीस नव्हते - एक पोलीस होता
आणि दुसरा कोणीतरी देशी होता. तो तिच्याकडे अर्धवट
कुतूहलाने, अर्धवट दुःखाने बघत होता - त्याने चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला तरी तिला हे सगळं वाचता
आलं. कोण हे? कशाला आलेत?
पोलिसाने
जवळ येऊन शेकहॅण्डसाठी हात पुढे केला, तोच आतून रीनाचा आवाज आला 'मॉ s म! आईल बी
इन माय रूम, ओके?'.
'मिसेस
गॅनपुली?'
'येस?'
'हाय,
आय ऍम ऑफिसर जिम
ब्रॅडशॉ, विथ द टोपीका पुलिस
डिपार्टमेंट. डू यू नो
वन मिस्टर अनान गॅनपुली?'
तिचा
श्वास कोंडला. का, का विचारताय नंदूला
मी ओळखते का? चांगलंच ओळखते, पण कशासाठी? आणि तुमचा काय संबंध? तिच्या तोंडून उत्तरासाठी सुद्धा शब्द फुटेना.
'हॅलो,
सविता वहिनी? नमस्कार, मी संदीप कोल्हटकर
- आनंदचा मित्र.'हा,
हा मराठीत बोलला? ओह, हा तो शाळेतला
मित्र, ह्याला भेटायला नंदू गेला होता. पण, पोलीस कशाला? आणि नंदू कुठे आहे? दिलीप पण जाणार होता
ना? कुठे आहेत ते दोघे?
'ओह
नमस्कार. नंदू तुम्हालाच भेटायला जाणार म्हणाला होता.'
'हो,
आम्ही भेटलो. आम्ही आत येऊ का?
थोडं महत्वाचं बोलायचं आहे.'
...
वरती
बेडरूममध्ये बेडवर पाय ताणून टीव्ही बघत पडलेली रीना आईच्या किंचाळीने जबरदस्त दचकली आणि धावत खाली आली. जिन्यातूनच एक पोलीस आणि
एक कोणीतरी अंकल ह्या दोन अनोळखी पुरुषांसमोर आईला ओक्सबोक्शी रडतांना पाहून ती घाबरून स्तब्ध
झाली.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...